"नानाजी देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
सुधारले
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
No edit summary
ओळ ५६:
 
==चरित्र ==
[[हिंगोली]] जिल्ह्यातील [[कडोळी]] या गावी [[ब्राह्मण]] कुटुंबात जन्मलेल्या नानाजींनी प्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून कार्य केले. पुढे काही वर्षे त्यांनी देशाच्या राजकारणात प्रमुख भूमिका निभावली. राजकारण किंवा सत्ताकारणाच्या मर्यादा लक्षात घेऊन अखेरीस त्यांनी शाश्र्वत विकास साधणारे समाजकार्य करायचे ठरवले{{स्पष्टिकरण हवे}} लहानपणी भाजी विकून पैसे मिळवून शिक्षण पूर्ण करणारे नानाजी संघसंस्थापक डॉ. [[केशव बळीराम हेडगेवार|हेडगेवार]] यांच्या संपर्कात आले व संघाशी कायमचे जोडले गेले. भारतीय संस्कृतीच्या आधारावर मनुष्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो या विचाराला मध्यवर्ती स्थान देऊन रचनात्मक कामाचे अनेक प्रकल्प नानाजी देशमुख यांनी देशभरात उभे केले.{{तारीख}}
 
प्रथम [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे]] [[स्वयंसेवक]] व नंतर [[उत्तर प्रदेश|उत्तर प्रदेशात]] पूर्णवेळ कार्यकर्ते असलेल्या नानाजींनी संघाचे तत्कालीन प्रमुख ([[सरसंघचालक]]) श्री [[गोळवलकर गुरुजी]] यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय चारित्र्याच्या आधारावर एक नवीन राजकीय पक्ष उभा करण्यासाठी प्रयत्न केले. यातूनच [[जनसंघ|जनसंघाची]] स्थापना झाली. [[दीनदयाळ उपाध्याय]], [[सुंदरलाल भंडारी]], [[अटलबिहारी वाजपेयी]] व [[लालकृष्ण अडवाणी]] यांच्यासमवेत नानाजी जनसंघ पक्षाच्या माध्यमातून कार्यरत होते. नंतर [[जनता पक्ष|जनता पक्षाच्या]] माध्यमातूनही ते राजकारणात सक्रिय सहभागी झाले. [[पांचजन्य]], [[राष्ट्रधर्म]] व [[स्वदेस]] या नियतकालिकांचे कामही त्यांनी काही काळ पाहिले. दरम्यानच्या काळात आचार्य [[विनोबा भावे|विनोबा भावेंच्या]] [[भूदान चळवळ|भूदान चळवळीतही]] ते सहभागी झाले होते. सुमारे दोन महिने ते विनोबाजींबरोबर प्रवास करत होते. पण त्यानंतरच्या काळात मनुष्यविकास व सामाजिक विकास याबाबतच्या पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्मिक मानवतावाद या तत्त्वज्ञानाचा प्रभाव त्यांच्यावर पडला. याच तत्त्वज्ञानाच्या आधारावर रचनात्मक, विधायक कामांची उभारणी करण्याचा ध्यास घेतलेल्या नानाजींनी जनता पक्षाच्या सरकारमध्ये मंत्रीपदमंत्रिपद नाकारले. त्या काळात राजनीतीतील चाणक्य म्हणून त्यांचा दिल्लीत दबदबा होता, अनेक महत्त्वाची सत्तापदे त्यांच्याकडे सहजगत्या येत होती. पण त्यांनी तो मोह निग्रहाने नाकारून, राजकारण-संन्यास घेऊन अखंडपणे सेवाकार्य करण्याचा निर्णय घेतला. या विचारातूनच त्यांनी [[दीनदयाळ संशोधन संस्था]] स्थापन केली.{{संदर्भ हवा}}
 
पुढील काळात त्यांनी दीनदयाळ शोध संस्थानच्या माध्यमातून सर्वप्रथम [[उत्तर प्रदेश|उत्तर प्रदेशामधील]] [[गोंदा जिल्हा|गोंडा जिल्ह्यात]] सिंचनाचे कार्य केले. सुमारे ४०,००० कूपनलिकांच्या माध्यामातून त्याठिकाणच्या शेतकऱ्यांना सिंचनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचे काम केले. त्यानंतर मध्य प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात ८० दुर्गम, पहाडी गावांमधील जनतेला विविध प्रकल्पांच्या माध्यमातून आत्मनिर्भर व उद्योगशील बनवण्यावर त्यांनी मुख्य लक्ष केंद्रीत केले. पाणी अडवा - पाणी जिरवा या माध्यमातून सिंचनक्षेत्रात वाढ, गोवंशसंवर्धन, पारंपरिक कृषी पद्धतींचा विकास व प्रसार, गुरुकुल पद्धतीने शालेय शिक्षण,उद्योजकता विद्यापीठाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराला प्राधान्य, आरोग्यधाम योजनेअंतर्गत आयुर्वेदिक वनौषधींविषयी संशोधन व याच पद्धतीचे अनेक प्रकल्प चित्रकूट परिसरात कार्यान्वित केलेले आहेत. येथेच नानाजींनी [[चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालय]] हे भारतातील पहिले ग्रामीण विद्यापीठ स्थापन केले. हे प्रकल्प सक्षमतेने चालवण्यासाठी त्यांनी समाजसेवेची इच्छा असणाऱ्या दांपत्यांना त्यांनी समाजशिल्पी बनवले. या समाजशिल्पींच्या माध्यमातून दीनदयाळ शोध संस्थेची विधायक, विकासात्मक कामे वेगाने,योग्य दिशेने व निष्ठेने चालू आहेत. आर्थिक, औद्योगिक व सामाजिकदृष्ट्या स्वयंपूर्ण गावांची संकल्पना येथे अस्तित्वात आलेली दिसते.{{संदर्भ हवा}}