"चाफेकर बंधू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
साचे लावले
ओळ १:
{{विकिकरण}}
[[चित्र:Chaphekar Brother's.jpg|इवलेसे|चाफ़ेकर चौक, चिंचवड गाव येथील स्मारक]]
वासुदेव चापेकर व त्यांचे बंधू हे आद्य भारतीय [[क्रांतिकारक|क्रांतिकारकांमध्ये]] गणले जातात.
 
वासुदेव चापेकरांचा जन्म [[इ.स. १८८०|१८८०]] मध्ये [[कोकण|कोकणात]] एका [[चित्पावन ब्राह्मण]] कुटुंबात झाला. त्यांनी मराठी भाषेमधून शिक्षण घेतले. कालांतराने ते पुण्यातील चिंचवड येथे स्थायिक झाले.{{तारीख}} वडील ‍हरिपंत हे पुणे व मुंबई येथे हरिकथा सांगायचे. बालवयात तिघेही भाऊ हरि [[कीर्तन|कीर्तनात]] वडिलांना मदत करायचे. त्यांमुळे चापेकर बंधूंच्या शिक्षणात खंड पडला.{{संदर्भ हवा}}
 
वासुदेव चापेकर यांनी दामोदर चापेकर आणि बाळकृष्ण चापेकर या त्यांच्या बंधूंसह राजकारणात आणि क्रांतिकारी कारवायांमध्ये भाग घेतला. त्यांनी भारतीय तरुणांना शस्त्रांचे प्रशिक्षण दिले.{{तारीख}}{{संदर्भ हवा}}
 
[[पुणे|पुण्यातील]] राजकीय घडामोडींनी प्रेरित होऊन हे भाऊ क्रांतिकारक चळवळीकडे वळले. ब्रिटिशांनी आणलेल्या संमती वयाच्या विधेयकास त्यांचा तीव्र विरोध होता. भारतीय संस्कृतीत हस्तक्षेप करणार्‍या ब्रिटिशांविरुद्ध [[लोकमान्य टिळक|टिळकांनी]] [[केसरी|केसरीमधून]] घणाघाती प्रहार करायला सुरुवात केली होती. या आवाहनाने तीनही भाऊ प्रेरित झाले. त्यांनी लोकसंघटन केले. याचवेळी पुण्यात प्लेगच्या साथीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्याने ब्रिटिशांनी वॉल्टर चार्ल्स रँडला भारतात पाचारण केले. रँडने रोग निवारण करण्याच्या उपायांची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली. हे करताना त्याने सामाजिक पायदंड पायदळी तुडवून लोकांचा असंतोष ओढवून घेतला. यामुळे चाफेकर बंधूच्या मनात [[ब्रिटिश|ब्रिटिशाविरुद्ध]] तिरस्कार निर्माण झाला. या सार्‍यांचा सूड घेण्याची योजना त्यांनी तयार केली.{{तारीख}}
 
रँडच्या पुण्यातील लोकांना दिलेल्या वाईट वागणुकीबद्दल या भावांनी त्याच्या वधाचा कट रचला. त्यावेळी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा हीरकमहोत्सव साजरा करण्यात येत होता. सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती. तसेच [[मेजवानी]]चे आयोजन करण्यात आले होते. दामोदर चाफेकर या तरुणाने गाडी काढली व गणेश खिंड येथे वाट पाहत २२ जून १८९७ रोजी मध्यरात्री निवासस्थानातून बाहेर पडलेल्या रँडवर जवळून गोळ्या झाडल्या. रँड हा काही काळ कोमात राहिला व कालांतराने ३ जुलै १८९७ रोजी मरण पावला.
याचवेळेस दामोदराच्या भाऊ बाळकृष्णाने रॅड सोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिस्टवर गोळ्या झाडल्या.{{संदर्भ हवा}}
 
चाफेकर बंधू निसटण्यास यशस्वी झाले तरी नंतर, तिघाही भावांना पकडण्यात आले. दामोदराला मुंबईत अटक झाली व १८ एप्रिल १८९८ रोजी त्यास येरवडा तुरुंगात फासावर चढवण्यात आले. त्यापाठोपाठ वासुदेवाला ८ मे १८९९ व बाळकृष्णाला १६ मे १८९९ रोजी फासावर चढवण्यात आले, व तीनही चापेकर बंधू [[शहीद]] झाले.{{संदर्भ हवा}}
 
=== आधारित चित्रपट===
चापेकर बंधूंवर आणि रँडच्या खुनाच्या घटनेवर '२२ जून १८९७' हा मराठी चित्रपट निघाला.{{संदर्भ हवा}}
 
==स्मारक==
पुण्यानजीक असलेल्या चिंचवड गावाजवळच्या चौकाला चाफेकर चौक म्हणतात. या चौकात मध्यभागी एका टॉवरमध्ये दामोदर चापेकर यांचा १९७१मध्ये उभारलेला पुतळा होता. मात्र तो पुतळा रस्ता रुंदीकरणाच्या व उड्डाणपुलाच्या कामाच्या कारणाने २०१० मध्ये हलविण्यात आला. त्यानंतर चौकातच चापेकर बंधूंच्या समूह शिल्पाचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र हे काम या ना त्या कारणावरुन सतत रखडत होते. क्रांतिकारकांचे पुतळे तीन ते साडेतीन फुटांचे आणि त्यांखाली एक छोटा चौथरा अशा पद्धतीने काम चालू होते. परंतु क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे गिरीश प्रभुणे, बाळकृष्ण पुराणिक आदींनी या प्रकल्पातील त्रुटी निदर्शनास आणल्या. त्यानंतर तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. [[श्रीकर परदेशी]] यांनी चालू काम थांबवून नव्याने आराखडा करण्यास सांगितले.{{संदर्भ हवा}}
 
नव्या आराखड्यानुसार या चाफेकर चौकात दामोदर चाफेकर व बाळकृष्ण चाफेकर यांचे १२ फूट उंचीचे उभे आणि वसुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांचे बसलेले सात फूट उंचीचे पुतळे उभारण्यात आले आहेत. (१०-७-२०१६){{संदर्भ हवा}}
 
=== नोट ===
सर्वसामान्यपणे चापेकर असा उल्लेख चुकीचा होत असला तरी या क्रांतिकारक बंधूंचे आडनाव 'चाफेकर' असे होते. चापे या नावाचे गाव कोकणात नाही. या खुनाच्या घटनेनंतर चाफेकर बंधू हे आमचे नातेवाईक नाहीत हे पटवण्यासाठी अनेक चाफेकरांनी आपले आडनाव चापेकर आहे असे सांगावयास सुरुवात केली.{{स्पष्टिकरण हवे}}{{संदर्भ हवा}}
 
 
 
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]]