"कृष्णविवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १०:
 
===कृष्णविवराची रचना===
आकाराने प्रचंड मोठ्या तार्‍याचे जेव्हा कृष्णविवरामध्ये रूतररूपांतर होते तेव्हा तो स्वतःच्याच [[गुरुत्वाकर्षण]]ाने इतका लहान होत जातो की शेवटी तो जवळ जवळ अदृश्यच होतो. यावेळी तो अमर्याद लहान व कमालीचा जड बनतो. या एका अदृश्यरूप बिंदूला 'सिंग्युलॅरिटी' ( Singularity) असे म्हणतात. ही अशी एक अवस्था जी कृष्णविवराच्या केंद्रस्थानी असते की जिथे [[भौतिकशास्त्र]]ाचे कोणतेही नियम लागू होत नाहीत. या बिंदूरूप अवस्थेभोवती अदृश्य कुंपण निर्माण होते. त्या कुंपणाला 'घटना क्षितिज' म्हणजेच 'इव्हेंट होरयझन' ( Event Horizon) असे म्हणतात. 'घटना क्षितिज' हे कृष्णविवराच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणाची सीमाच असते. एक अशी सीमा की जिच्या पलीकडून परतणे शक्य नाही. 'घटना क्षितिजापाशी मुक्तिवेग हा [[प्रकाश]]ाच्या वेगाइतकाच असतो तर त्याच्या आतील कृष्णविवरापासून मुक्तिवेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त असतो. ज्याअर्थी प्रकाशापेक्षा कोणतीही गोष्ट जलद नसतो अशी समजूत असली तरी प्रत्यक्षात 'घटना क्षितिज'च्या पलीकडे मुक्तिवेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त असल्याने प्रकाश देखील इथून बाहेर पडू शकत नाही. बिंदूरूप अवस्थेपासून 'घटना क्षितिज' च्या पर्यंतच्या ( सिंग्युलॅरिटी ते इव्हेंट होरयझन) अंतरालाच श्वार्झश्वाइल्डची [[त्रिज्या]] असे म्हटले जाते. समजा आपल्या [[सूर्य]]ाचे जर कृष्णविवरामध्ये रूपांतर झाले तर त्याची श्वार्झश्वाइल्डची त्रिज्या ३ कि.मी. असेल. सर्वसाधारण कृष्णविवराचे वस्तुमान आपल्या सूर्याच्या १० पट इतके असते. तर त्याची श्वार्झश्वाइल्डची त्रिज्या ३० कि.मी. इतकी असते.
 
=== चंद्रशेखर मर्यादा ===