"प्रजननसंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्रमुख मुद्दे - शीर्षके
मानवी प्रजननसंस्थेसंबंधीचा मजकूर मानवी प्रजननसंस्था या लेखात हलवला
ओळ १८:
 
== सूक्ष्म जीव ==
 
===पुरुष प्रजनन संस्था===
मानवी क्रमविकासामध्ये अर्भक, बाल्य, कुमार, यौवन, प्रौढ , आणि वार्धक्य अशा अवस्था आहेत. अर्भकाचा जन्म झाल्यापासून बालक पुरुष आणि स्त्री अवयव युक्त असले तरी कुमारावस्थेमध्ये प्रजननाशी संबंधित इंद्रियांच्या विकासास प्रारंभ होतो. युवावस्थेमध्ये हा विकास पूर्ण होऊन युवक-युवती प्रजननक्षम होतात. (पहा पौगंडावस्था) पुरुष प्रजनन संस्था आणि त्यातील अवयव प्रामुख्याने शुक्राणू तयार करणे, ते सुस्थितीत कार्यक्षम राखणे आणि योग्य त्या वेळी त्यांचे वहन करणे व समागमाच्या वेळी स्त्री जनन संस्थेमध्ये त्यांचे क्षेपण करणे यासाठी विकसित झालेले असतात. पुरुष प्रजजन संस्थेमधील बहुतेक इंद्रिये बाहेरून दृश्य असतात. पुरुष प्रजजन संस्थेमधील बाहेरून दिसणारी प्रमुख इंद्रिये म्हणजे शिस्न, वृषणकोश आणि वृषण.
 
[[शिस्न]] : हे समगमाचे पुरुष इंद्रिय आहे. [[शिस्न|शिस्नाचे]] तीन भाग असतात. त्याचा प्रारंभीचा भाग पोटास चिकटलेला असतो. मध्यभाग दंडगोलाकृति असतो आणि टोकाशी शिस्नमणि. शिस्नमण्यावर एक सैल त्वचावरण असते. काहीं जमातीमध्ये त्वचा शस्त्रक्रियेने काढून टाकण्यात येते. शिस्नाच्या टोकावर मूत्रनलिका उघडते. या नलिकेतून मूत्र आणि वीर्य वहन होते. शिस्नावर संवेदी चेतातंतूंची टोके असतात. शिस्नाचा दंडगोलाकृति भागामध्ये तीन वर्तुळाकृति पोकळ्या असतात. यामध्ये स्पंजासारख्या पोकळ उती असतात. या उतीमध्ये रक्त साठून राहिले म्हणजे शिस्न ताठ होते. समागमाच्या वेळी या शिस्नावाटे वीर्य स्त्री जननेंद्रियामध्ये क्षेपित करता येते. शिस्नावरील त्वचा सैल असल्याने शिस्नाचा आकार मोठा झाला तरी ते शिस्नास सामावून घेते. शिस्न ताठ झाल्यानंतर मूत्रनलिकेतील मूत्रप्रवाह तात्पुरता खंडित होतो. समागमाच्या वेळी वीर्यस्खलनास अडथळा न येण्यासाठीची ही योजना आहे.
 
[[वृषण|वृषणकोश]] : शिस्नाच्या खालील बाजूस पोटाजवळ असलेली सैल त्वचेची पिशवी म्हणजे वृषणकोश. वृषणकोशामध्ये वृषणे असतात. याना होणारा रक्तपुरवठा आणि चेता वृषणकोशा मध्ये प्रवेशतात. वृषणकोश वृषणाचे तापमान नियंत्रित करते. वृषणामध्ये शुक्रजंतू निर्मितीचे कार्य शरीराच्या तापमानापेक्षा थोड्या कमी तापमानास सुरळीतपणे होते. वृषणकोशाच्या स्नायूमुळे वृषणकोश सैल किंवा आकुंचन पावण्यास मदत करतात. थंडीमध्ये वृषणकोश शरीराजवळ तर उन्हाळ्यात ते शरीरापासून थोडेसे दूर ठेवले जातात. यामुळे वृषणाचे तापमान आवश्यकतेनुसार नियंत्रित होते. अति घट्ट अंतर्वस्त्रे वापरल्याने वृषणकोशाचे तापमान शरीराएवढे होते आणि शुक्रजंतू निर्मितीमध्ये अडथळा येतो. शुक्रजंतूंची संख्या कमी होण्याचे हे एक कारण आहे.
 
[[वृषण]] : मानवी वृषणकोशामध्ये दोन वृषणे असतात. सैल बंधनाने वृषणे वृषणकोशामध्ये स्थिर केलेली असतात. वृषणकोशाभोवती असलेल्या श्वेत प्रावरण आणि परिवृषण अशा दोन थरामुळे वृषणाचे संरक्षण होते. वृषणामध्ये रेतोत्पादक नलिकांचे मोठ्याप्रमाणात जाळे आणि अंतराली उतक व सर्टोली पेशी असतात. वृषणाच्या सूक्ष्म रचनेमध्ये रेतोत्पादक नलिकांचे मोठ्या प्रमाणात असलेले जाळे, अंतराली उतक आणि त्यातील अंतस्त्रावी पेशी असे असते. रेतोत्पादक नलिकेमध्ये शुक्रजनन पेशी आणि सर्टोलि पेशी असतात. शुक्रजनन पेशींचे विभाजन होऊन शुक्राणू तयार होतात. पेशीच्या आकाराचे शुक्राणूंचे पोषण सर्टोलि पेशीमधून होते. या वेळी त्यांचा आकार बदलून शुक्रजंतूसारखा होतो. रेतोत्पादक नलिकामध्ये दररोज तीन कोटि शुक्राणू तयार होतात. गुंतागुंतीच्या नलिका जालामधून सर्टोलि पेशींमधून स्त्रवलेला द्रव आणि शुक्राणू शुक्राणूवाहक नलिकेमध्ये वीर्याच्या स्वरूपात साठून राहतात.
 
पुरुष प्रजनन संस्थेमध्ये असलेल्या बाह्य इंद्रियाबरोबर बाहेरून न दिसणारी काहीं इंद्रिये म्हणजे अधिवृषण,रेतोवाहिनी, स्खलन वाहिनी, मूत्रनलिका, रेताशय, पुरस्थ ग्रंथी, आणि काउपर ग्रंथी. अधिवृषण वृषणाच्या वरील बाजूस असते यामध्ये असलेल्या जालिकेमध्ये शुक्राणूंचे मॅच्युरेशन होते. पण हे शुक्राणू हालचाल करू शकत नाहीत. अधिवृषणामधील शुक्राणू पुढे सरकून रेतोवाहिनीमध्ये साठून राहतात. रेतोवाहिनीच्या पुढील टोकास एक फुगीर भाग असतोत्यास स्खलन वाहिनी असे म्हणतात. समागमाच्या वेळी स्खलनवाहिनीचे आकुंचन झाले म्हणजे शुक्राणू मूत्रनलिकेमधून शिस्नावाटे स्त्री जननेंद्रियामध्ये क्षेपिले जातात. याच वेळी शुक्राणूबरोबर रेताशय आणि पुरस्थ ग्रंथीमधील स्त्राव शुक्राणूबरोबर मिसळून वीर्य तयार होते. रेताशयामध्ये फ्रुक्टोज शर्करा तयार होते.फ्रुक्टोज शर्करा हे शुक्राणूंना ऊर्जा देते. पुरस्थ ग्रंथीमध्ये फायब्रिनोजेन हे गोठण द्रव्य आणि सी जीवनसत्व तयार होते. हे सर्व घटक वीर्याच्या निर्मितीसाठी आवश्यक आहेत.
मेंदूमधील पियुषिका या अंतस्त्रावी ग्रंथीमधील संप्रेरके आणि वृषणामध्ये स्त्रवणारी पुरुष संप्रेरके यांच्या समन्वयाने पुरुष जननसंस्थेचे नियंत्रण होते. बाल्यावस्थेत असता जननेंद्रियांची वाढ होत नाही. पण कुमारावस्थेत म्हणजे वय 10-12 च्या दरम्यान अग्र पोषग्रंथीमधून (पियुषिकेमधून) पुटक उद्दीपक संप्रेरक (फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन) तयार होण्यास प्रारंभ होतो. याच वेळी पीतपिंडकारी संप्रेरक (ल्युटिनायझिंग हार्मोन) पियुषिकेमधून स्त्रवण्यास सुरवात होते. पीतपिंडकारी संप्रेरकाच्या परिणामामुळे वृषणामधील अंतराली उतकामधील लायडिख पेशीमधून टेस्टोस्टेरोन हे पुरुषसंप्रेरक स्त्रवते. टेस्टोस्टेरोनमुळे सर्व जननेंद्रियाची वाढ होते आणि ती कार्यान्वित होतात. कुमारावस्था आणि पौगंडावस्थेमध्ये जननांगाची वाढ , पुरुष शरीरामधील स्नायू आणि हाडे बळकट होणे, अंडकोशावर आणि श्रोणिभागावर केस येणे, चेह-यावर दाढी मिशा येणे, आवाज फुटणे, त्वचा तेलकट होणे, आणि आपण लहान राहिलो नाही अशी जाणीव होणे असे शारिरिक आणि मानसिक बदल होतात.यासाठी टेस्टोस्टेरोन हे पुरुष संप्रेरक कारणीभूत आहे. पियुषिकेतील पोष संप्रेरक, पुटक उद्दीपक संप्रेरक ,पीतपिंडकारी संप्रेरक आणि वृषणामधील टेस्टोस्ट्रीरोन या संप्रेरकामुळे बालकाचे पौगंडावस्थेमधील पुरुषामध्ये रूपांतर होते. पौगंडावस्थेमध्ये चालू झालेली शुक्राणू निर्मिती अखेरपर्यंत टिकून राहते. फक्त वार्धक्यामध्ये शुक्राणु निर्मितीचा वेग कमीहोतो.
 
===स्त्री प्रजनन संस्था===
मानवी स्त्री प्रजनन संस्था अंडाशय, फॅलोपियन नलिका, अंडवाहिनी, गर्भाशय, योनी या इंद्रियानी आणि प्रघ्राणग्रंथीनी बनलेली असते.
स्त्रीच्या जीवनामध्ये अर्भकावस्था, बाल्यावस्था, कुमारावस्था,पौगंडावस्था,प्रौढावस्था आणि वार्धक्य असे भाग पडतात. बाल्यावस्थेपर्यंत बालक स्त्रीलिंगी जन्मलेले असले तरी जनन इंद्रियांची फारशी वाढ होत नाही. वयाच्या बारा वर्षापासून बाह्य आणि अंतर्गत जनन इंद्रियामध्ये झपाट्याने बदल होऊन ती मोठी होतात. हे सर्व बदल पोष ग्रंथीमधील एफएसएच (पुटक उद्दीपक संप्रेरक) आणि एलएच ( पीतपिंड संप्रेरक) या दोन्ही संप्रेरकामुळे अंडाशयामध्ये स्त्री संप्रेरक इस्ट्रोजेन आणि प्रोगेस्टेरॉन ही संप्रेरके आवशकतेनुसार तयार होतात.
 
स्त्री प्रजनन संस्थेमध्ये काहीं इंद्रिये बाहेरून दिसणारी व काहीं शरीरांर्गत असतात. बाह्य जनांगाचे कार्य शुक्राणूंचा शरीरात प्रवेश होण्यास मदत होणे आणि आंतरिक जननांगाचे संसर्गापासून रक्षण करणे. स्त्रीमधील बाह्य जननांगामध्ये योनिमुख आणि त्याभोवती असणारे भाग यांचा समावेश होतो. दुहेरी असते. भगशिस्न,भगप्रकोष्ठ,बृहत्भगोष्ठ, लघुभगोष्ठ, आणि भगग्रंथी हे बाह्य जननेंद्रियांचे भाग आहेत.भगशिस्न हा पुरुषाच्या शिस्नाशी समजात असून उथ्थानक्षम असतो. पुरुषाप्रमाणे मूत्रमार्गाशी याचा संबंध येत नाही. स्त्रीचा मूत्रमार्ग स्वतंत्रपणे बाह्य जननेंद्रियात उघडतो. बृहत्भगोष्ठ आणि लघुभगोष्ठ त्वचेच्या घड्यानी बनलेले असते. या भागास रक्तवाहिन्यांचा आणि चेतातंतूंचा पुरवठा झालेला असतो. योनिमुखाच्या दोन्ही बाजूस प्रघ्राणग्रंथीच्या (बार्थोलिन ग्रंथीं) नलिका उघडतात. समागमाच्या वेळी किंवा उत्तेजित झाल्यानंतर या ग्रंथीमधून पाझरलेला स्त्राव योनिमार्गामध्ये स्नेहनाचे कार्य करतो.
 
स्त्री प्रजनन संस्थेमधील बाहेरून न दिसणा-या इंद्रियामध्ये अंडाशय,अंडवाहिनी, गर्भाशय आणि योनि यांचा समावेश आहे.
'''बीजांडकोश''' : गर्भाशयाच्या प्रत्येक बाजूस एक असे दोन [[बीजांडकोश]] श्रोणिगुहेमध्ये असतात. त्यांचा आकार बदामासारखा असतो. बीजांडकोशामधे बीजांडे तयार होतात. बीजांडकोशामधे पोष ग्रंथीमधील एफएसएच आणि एलएच या संप्रेरकांच्या स्त्रवण्याप्रमाणे ईस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ही संप्रेरके स्त्रवतात. या संप्रेरकामुळे गर्भाशयातील अंत:त्वचा, निषेचित अंड्याचे गर्भाशयात रोपण, गर्भारपण, आणि मासिक पाळी यांचे नियंत्रण होते.
 
'''अंडवाहिनी''': दोन्ही बीजांडकोशांजवळ प्रत्येकी एक अंडवाहिनी असते. गर्भाशयाजवळील अंडवाहिनीचा भाग फनेलच्या आकाराचा असून त्याच्या कडा झालरयुक्त असतात. झालरीच्या आतील बाजूस असलेल्या पक्षाभिकेमुळे अंडाशयातून उदरगुहेत मुक्त झालेले अंडपुटक अंडवाहिनीमध्ये वाहून नेले जाते. अंडवाहिनी सु 10-11.5 सेमी लांब असते. अंडवाहिनीची आतील बाजू श्लेश्मकलेने युक्त असते. श्लेष्मकलेवरील पक्षाभिकेमुळे आणि अंडवाहिनीच्या आकुंचनामुळे अंडपुटक अंडवाहिनीच्या गर्भाशयाच्या तोंडाकडे वाहून नेले जाते. निषेचित किंवा अनिषेचित अंड शेवटी गर्भाशयात जाते. निषेचित अंड्याचे गर्भाशयात रोपण होते. अनिषेचित अंड मासिक स्त्रावाबरोबर शरीराबाहेर जाते.
 
'''गर्भाशय''': ही स्नायूंची त्रिकोणी पिशवी आहे. गर्भाशयाचे स्नायू अनैच्छिक असतात. गर्भाशयाची जाडी दोन सेमी आणि लांबी 7.5 सेमी असते. गर्भाशयाच्या अंत:त्वचेमध्ये पोष ग्रंथीमधील संप्रेरकांच्या संहतिनुसार बदल होतो. गर्भाशयाचे मुख्य भाग आणि मानेसारखा निमुळता ग्रीवा असे दोन भाग असतात. ग्रीवा योनिमार्गामध्ये उघडते. गर्भाशयाचे मुख्य कार्य गर्भधारणा, गर्भाच्या वाढीस मदत करणे आणि गर्भाची पूर्ण वाढ झाल्यानंतर प्रसूती आहे. गर्भाची पूर्ण वाढ होईपर्यंत गर्भ सुरक्षित ठेवणे हे महत्त्वाचे कार्य गर्भाशयाचे आहे.
[[योनि]]- गर्भाशयमुख आणि बाह्य जननांगे यामधील मांसल नलिकेस योनि म्हणतात. यास जन्मनलिका असेही म्हणतात. तरुण स्त्रीमध्ये त्याची लांबी सु. 10 सेमी असते. योनिच्या बाह्य छिद्रावर एक मांसल पडदा असतो त्यास योनिच्छद असे म्हणतात. योनीचा गर्भाशयाकडील भाग बंद असून तो ग्रीवेला चारीबाजूनी चिकटलेला असतो. समागमाच्या वेळी योनी शिस्नास सामावून घेते क्षेपण झालेले वीर्य साठवून ठेवते. तारुण्यावस्थेमध्ये योनीचा आतील भाग अधिक स्तरीय होतो. योनी अंत:त्वचेमधील पेशीमध्ये असलेल्या ग्लायकोजेनचे लॅक्टिक आम्लात रूपांतर झाल्याने योनिमार्गामध्ये परजीवींची सहसा वाढ होत नाही.
 
मुलीचा जन्म होताना तिच्या अंडाशयामध्ये सु दहा लाख बीजांडे असतात. वयात येताना मासिक पाळी सुरू होईपर्यंत त्यातील सु तीन लाख शिल्लक राहतात. स्त्रीच्या 20 -24 वर्षांच्या प्रजनन कालात त्यातील फक्त 300 ते 400 अंडपुटके बीजांडवाहिनीपर्यंत येऊ शकतात. मासिक पाळी अनियमित झाल्यास किंवा गर्भारपणात त्यांचा –हास होतो.
 
[[वर्ग:शरीरशास्त्र]]