"शारदीय नवरात्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ १२८:
२००४ साली [[मुंबई]]च्या महालक्ष्मी मंदिरात देवीला नऊ दिवस नेसवल्या जाणाऱ्या साड्यांचे रंग '[[महाराष्ट्र टाइम्स]]'मध्ये प्रसिद्ध झाले. मुंबईभरातल्या महिलांनी नऊ दिवस त्या त्या रंगांच्या साड्या नेसून त्याला प्रचंड प्रतिसाद दिला आणि त्यानंतर हे दरवर्षी घडत गेले. आता नवरात्रीत वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या ’आजच्या रंगाने’ मुंबई रंगून जाऊ लागली.. लोकल ट्रेन्स, सरकारी बिन-सरकारी ऑफिसे, महिलामंडळे एवढेच काय पण हॉस्पिटल्सही या रंगांच्या साड्यांनी रंगून जातात. आता मुंबईच नाही तर, पुणे, [[नाशिक]], [[धुळे]], [[जळगाव]] अशा अनेक गावांत नवरात्रीच्या नऊ दिवसांत रंगांची ही उधळण पहायला मिळते.
 
ही नवरात्रीच्या दिवसांच्या नऊ रंगांची कल्पना [[महाराष्ट्र टाइम्स]]ने बहुसंख्य सामान्य आणि तमाम नोकरदार स्त्रीवर्गात जरी लोकप्रिय केली असली, तरी रंगांची मूळ कल्पना एकोणीसाव्या शतकात, अगदी पेशवाईच्या काळातही अस्तित्वात होती. (१८१८ सालचे पंचांग पहावे). उगवत्या सूर्याचा रंग केशरी म्हणून रविवारचा रंग केशरी, [[चंद्र]] पांढरा म्हणून सोमवारचा रंग पांढरा, मंगळ लाल म्हणून मंगळवारचा रंग लाल या रीतीने नवरात्रीच्या पहिल्या आठवड्यातल्या दिवसाचे रंग ठरवले आहेत. बुधवारचा निळा, गुरुवारचा पिवळा, शुक्रवारचा हिरवा आणि शनिवारचा रंग करडा असतो. आठवडा संपल्यानंतर नवरात्रातले शेवटचे दोन दिवस उरतात. त्यांच्यासाठी मोरपिशी हिरवा, जांभळा, आकाशी आणि गुलाबी हे रंग राखून ठेवले आहेत.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://web.bookstruck.in/book/chapter/52325|शीर्षक=नवरात्र {{!}} नवरात्रातील नऊ रंग|access-date=2018-09-19|language=en}}</ref>
 
==इसवी सन २०१४ सालच्या नवरात्रीतील दैनिक रंग==