"सुभाषचंद्र बोस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ११५:
[[इ.स. १९३९|१९३९]] मध्ये जेव्हा नवीन काँग्रेस अध्यक्ष निवडण्याची वेळ आली, तेव्हा सुभाषबाबूंना अध्यक्षपदावर कुणी अशी व्यक्ती हवी होती, जी ह्या बाबतीत कोणत्याही दबावासमोर झुकणार नाही. अशी कोणती दुसरी व्यक्ती समोर न आल्यामुळे, सुभाषबाबू स्वतः पुन्हा काँग्रेस अध्यक्ष बनू इच्छीत होते. पण [[महात्मा गांधी|गांधीजी]] आता ते नको होते. [[महात्मा गांधी|गांधीजीनी]] अध्यक्षपदासाठी [[पट्टाभि सितारमैय्या]] ह्यांची निवड केली. कविवर्य [[रवींद्रनाथ ठाकूर]] ह्यांनी [[महात्मा गांधी|गांधीजींना]] पत्र लिहून सुभाषबाबूंनाच पुन्हा अध्यक्ष बनवण्याची विनंती केली. [[प्रफुल्लचंद्र राय]], [[मेघनाद साहा]] सारखे वैज्ञानिकही पुन्हा सुभाषबाबूंनाच अध्यक्ष करावे ह्या मताचे होते. पण [[महात्मा गांधी|गांधीजींनी]] ह्या प्रश्नावर कुणाचेच म्हणणे ऐकले नाही. शेवटपर्यंत तडजोड न होऊ शकल्यामुळे, अनेक वर्षांनंतर, काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली गेली.
 
सर्वजण समजत होते की जेव्हा स्वतः [[महात्मा गांधी|महात्मा गांधीनी]] [[पट्टाभि सितारामैय्या]] ह्यांना साथ दिली आहे, तेव्हा तेच ही निवडणूक आरामात जिंकणार. पण घडले वेगळेच. सुभाषबाबूंना निवडणुकीत १५८० मते मिळाली तर [[पट्टाभि सितारामैय्या|पट्टाभी सितारमैय्यांना]] १३७७ मते मिळाली. [[महात्मा गांधी|गांधीजींनी]] विरोध करूनही सुभाषबाबूंनी २०३ मतांनी ही निवडणूक जिंकली.
 
पण निवडणुकीच्या निकालाने पेच मिटला नाही. [[पट्टाभि सितारामैय्या|पट्टाभि सितारामैय्यांची]] हार ही आपली स्वतःची हार मानून, [[महात्मा गांधी|गांधीजींनी]] आपल्या साथीदारांना असे सांगितले की त्यांना जर सुभाषबाबूंची कार्यपद्धती मान्य नसेल, तर ते काँग्रेसमधून बाहेर पडू शकतात. ह्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीच्या १४ पैकी १२ सदस्यांनी राजीनामा दिला. [[जवाहरलाल नेहरू|पंडित जवाहरलाल नेहरू]] तटस्थ राहिले व एकटे शरदबाबू सुभाषबाबूंच्या बाजूने उभे राहिले.
 
[[इ.स. १९३९|१९३९]] सालचे वार्षिक काँग्रेस अधिवेशन [[त्रिपुरी]] येथे झाले. ह्या अधिवेशनाच्या वेळी सुभाषबाबू तापाने इतके आजारी होते, की त्यांना स्ट्रेचरवर पडून अधिवेशनाला उपस्थित रहावे लागले. [[महात्मा गांधी|गांधीजी]] ह्या अधिवेशनाला उपस्थित राहिले नाहीत. [[महात्मा गांधी|गांधीजींच्या]] साथीदारांनी सुभाषबाबूंशी बिलकुल सहकार्य केले नाही.