"मिठाचा सत्याग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
 
== दांडी यात्रा आणि सत्याग्रह ==
मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात दांडी यात्रेने झाली. ही दांडी यात्रा (मोर्चा) [[साबरमती आश्रम|साबरमती आश्रमा]]<nowiki/>पासून १२ मार्च १९३० रोजी सुरू झाली. गांधीजींच्या बरोबर त्यांचे ७८ निवडक अनुयायी होते.<ref>{{जर्नल स्रोत|last=कर्वे|first=मीना (अनुवादक)|date=१५ ऑगस्ट २०१८|title=मीठ आणि महात्मा|url=http://www.sandarbhsociety.org/wp-content/uploads/2015/08/San76-Jun-Jul12.pdf|journal=शैक्षणिक संदर्भ|volume=|pages=७६|via=}}</ref> यात्रा जसजशी पुढे निघाली, तसतशी सहभागी लोकांची गर्दी वाढतच गेली. ही यात्रा २४ दिवस चालली आणि तिच्यातील लोक ३८५ कि.मी.पर्यंत पायी चालले. यात्रा दांडी येथे समुद्रकिनारी ६ एप्रिल १९३०ला पोहोचली. त्या दिवशी जेव्हा सकाळी साडे सहा वाजता गांधीजींनी चिमूटभर मीठ उचलून कायदेभंग केला, तेव्हा कायदेभंगाच्या मोठ्या प्रमाणावरील चळवळीची ती सुरुवातच ठरली. दांडीनंतर गांधीजी मीठ बनवत आणि सभांमध्ये भाषणे करत ते [[समुद्र]] किनाऱ्याने दक्षिणेकडे जात राहिले. दांडीच्या दक्षिणेला २५ मैलांवर असलेल्या धारासणा या ठिकाणी मिठाचा [[सत्याग्रह]] करण्याचे कॉंग्रेस पक्षाने ठरवले. दांडी यात्रा आणि [[धारासणा]] येथील [[सत्याग्रह]] यामुळे सर्व जगाचे लक्ष [[भारताचा स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्या]]कडे वेधले गेले.
 
 
 
मिठाचा सत्याग्रह म्हणजे असहकार चळवळीचा एक भाग होता. प्रत्यक्षात मिठावरचा कर हे केवळ निमित्त होते. गांधींना त्या मिषाने लोकसंघटन आणि लोकजागृती साधायची होती.