"भारताचा ध्वज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
टंकन
ओळ ६०:
ध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी करू नये. कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे कापड घेता येणार नाही. तसेच राष्ट्रध्वज गादी, रुमालावर काढू नये. राष्ट्रध्वजावर कुठेलीही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही जाहिरात केली जात नाही. ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही.
 
केवळ [[भारतीय प्रजासत्ताक दिन|प्रजासत्ताक दिन]][[स्वातंत्र्य दिन (भारत)|स्वातंत्र्य दिन]] याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो. राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत. शासकीय पोषाखात असलेले सरकारी अधिकारी ध्वजाला मानवंदना देतील. जेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात असेल व तो सावधान स्थितीत उभा राहिल. सरकारी अधिकार्‍यांच्या जवळून ध्वज जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे. आदरणीय व्यक्ती डोक्यावर टोपी न घालताही राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊ शकतात. <ref>[http://marathi.webdunia.com/miscellaneous/special08/iday/0808/14/1080814001_1.htm (स्रोत- वार्ता)]</ref>
 
==ध्वजांचा इतिहास==
ध्वजाची परंपरा भारतात प्राचीन काळापासून आहे. अर्जुनाच्या कपिध्वजाचा उल्लेख महाभारतात सापडतो.छत्रपती [[शिवाजी महाराज|शिवाजी]] महाराज यांचा जरीची झालर लाभलेला भगवा ध्वज प्रसिद्ध आहे.
 
१८३१साली राजा राममोहन राॅय बोटीने इंग्लंडला जात असताना त्यांनी एका फ्रेंच जहाजावर फ्रान्सचा तिरंगी झेंडा पाहिला व स्वातंत्र्य समता बंधुता यांचे प्रतीक असलेला ध्वज आपल्या देशालाही लाभावा असे त्यांना वाटले.पुढे १८५७च्या यूद्धात देशभक्तीच्या भावनेतून एक ध्वजगीतही निर्माण झाले.