"लाला लजपत राय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भर घातली.
माहिती जोडली.
ओळ ४१:
 
लहानपणापासूनच देशसेवा करण्याची राय यांची तीव्र इच्छा होती. त्यामुळे देशाची पारतंत्र्यातून सुटका करण्याची त्यांनी शपथ घेतली. त्याच वर्षी त्यांनी [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची]] हिस्सार जिल्हा शाखा स्थापन केली. तसेच बाबू चूडामणी, चंदूलाल तयाल, हरीलाल तयाल आणि बालमुकुंद तयाल हे तयाल बंधू, डॉ. रामजी लाल हुडा, डॉ.धनी राम, आर्य सामाजी पंडित मुरारी लाल, शेठ छाजू राम जाट आणि देव राज संधीर यांच्याबरोबर आर्य समाजाची स्थापना सुद्धा केली. कॉंग्रेसच्या [[अलाहाबाद]] येथील वार्षिक अधिवेशनात हिसार जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी त्यांची १८८८ आणि १८८९ मध्ये निवड झाली. १८९२ मध्ये काहोर उच्च न्यायालयात वकिली करण्यासाठी ते लाहोर येथे गेले.स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारताच्या राजकीय धोरणाला आकार देण्यासाठी ते पत्रकारिता सुद्धा करत. त्यांनी द ट्रिब्युन सहित अनेक वृत्तपत्रांमध्ये नियमितपणे लेखन केले.
 
१८८६ मध्ये त्यांनी महात्मा हंसराज यांना दयानंद अंग्लो-वैदिक स्कूल,लाहोरची स्थापना करण्यास मदत केली. भारताच्या १९४७ साली झालेल्या फाळणीनंतर या विद्यालयाचे रुपांतर इस्लामिया कॉलेज, लाहोर मध्ये झाले.
 
१९१४ मध्ये स्वातंत्र्यलढ्यात योगदान देण्यासाठी लजपत रायांनी वकीलीला रामराम ठोकला. १९१४ मध्ये ते ब्रिटनला गेले आणि नंतर १९९७ मध्ये [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेला]] गेले. ऑक्टोबर १९१७ मध्ये त्यांनी [[न्यू यॉर्क शहर|न्यूयॉर्क]] मध्ये भारतीय होम रूल लीगची स्थापना केली. ते १९२७ ते १९३० पर्यंत अमेरिकेत होते.