"मुंज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
सुधारणा केली
परिच्छेद व प्रारुपण
ओळ १:
'''मुंज'''/'''उपनयन''' हा एक [[हिंदू]] धार्मिक [[सोळा संस्कार|संस्कार]] आहे.हा कुमाराचा एक प्रमुख संस्कार आहे.
परंपरेनुसार, हा संस्कार [[ब्राह्मण]], [[क्षत्रिय]] व [[वैश्य]] या [[चातुर्वर्ण्य|तीन वर्णांतील]] पुरुषांसाठीच सांगितला आहे. याला मौंजीबंधन व व्रतबंध अशीही नावे आहेत.

उपनयनाची संस्कृतमध्ये व्याख्या अशी- गृह्योक्तकर्मणा येन समीपं नीयते गुरो:| बालो वेदाय तत् योगात् बालस्योपनयं विदु:|| अर्थ:ज्या गृह्यसूत्रोक्त कर्माने बाळाला वेदाध्ययनासाठी गुरूजवळ नेले जाते त्याला "उपनयन" असे म्हणतात.
 
या संस्कारानंतर संस्कारित व्यक्ती आपल्या पालकांपासून दूर होऊन स्वतःच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करते. या संस्कारात [[यज्ञोपवीत]] (जानवे) धारण करणे हा मुख्य विधी असतो. लहानग्या बटुला लंगोट नेसवून इंद्रियनिग्रह समजावणारा हा महत्त्वाचा संस्कार आहे.
 
Line ११ ⟶ १४:
===महत्त्व===
शास्त्रतः हा संस्कार त्रैवर्णिकांना करण्याचा अधिकार आहे. परंतु सध्या हा संस्कार विशेषतः ब्राह्मणात, फार थोड्या क्षत्रियात आणि वैश्यात करण्यात येतो. याला दुसरा जन्म मानण्याची चाल आहे.म्हणूनच मुंज झालेल्या व्यक्तीला 'द्विज'म्हणतात. पहिला जन्म आई-बापांपासून आणि दुसरा जन्म गायत्री मंत्रापासून आणि आचार्य यांच्यामुळे प्राप्त होतो, असे या संस्काराचे महत्त्व वेदांत वर्णिलेले आहे.
 
उपनयन म्हणजे गुरुंच्या जवळ जाणे. गुरुच्या जवळ राहून , ब्रह्मचारी म्हणून चांगल्या प्रकारे ,एकाग्रचित्ताने अभ्यास करण्यासाठी काही नियम पाळणे आवश्यक असते. त्या नियमांनी व व्रतांनी स्वत:ला बांधून घेणे म्हणजेच व्रतबंध. ही व्रते नियमाने पाळण्यासाठी निश्चयशक्तीची जोडही त्याला द्यावी लागते. सारांश, ब्रह्मचारी म्हणून स्वत:च्या शरीराला , मनाला आणि बुद्धीला जाणीवपूर्वक वळण लावावे लागते. ज्याप्रमाणे कंदिलाच्या बाहेरची काच जर खराब असेल तर दिव्याच्या वातीचे तेज बाहेर नीट पडत नाही ; त्यासाठी कंदिलाची काच स्वच्छ असावी लागते त्याप्रमाणे योगाची जी आठ अंगे आहेत त्यांचे अनुष्ठान केल्याने चित्तातील अशुद्धीचा क्षय होत जातो आणि ज्ञानशक्ती प्रदीप्त होते आणि प्रज्ञेचा विकास होतो. १ भारतीय संस्कृतीत प्रत्येक आश्रमानुसार ब्रह्मचर्याचे स्वरूप वेगवेगळे सांगितले आहे. पण प्रत्येक टप्प्यावर ब्रह्मचर्याचा अभ्यास करीत असताना आपली संयमशक्ती वाढविण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. यासाठीही योगाभ्यासाचा उपयोग होऊ शकतो.<ref>योगाङ्ग्नुष्ठानाद्शुद्धिक्षये ज्ञानदीप्तिराविवेकख्याते: | पातञ्जल योगसूत्र २.२८</ref>
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मुंज" पासून हुडकले