"स्क्रू ड्रायव्हर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
(रचनेबद्दल माहिती वाढवली)
हातात पकडण्याची मूठ आणि धातूचा दांडा अशी हाताने वापरल्या जाणाऱ्या स्क्रू ड्रायवरची सामान्य रचना असते. स्क्रू ड्रायव्हर च्या दांड्याचे टोक स्क्रू च्या डोक्यावर अडकवून हाताने मूठ फिरवून, स्क्रू लावता, घट्ट करता किंवा काढता येतो. स्क्रू ड्रायव्हर स्क्रूच्या डोक्यावर अडकवून स्क्रू लावण्या, काढण्यासाठी बल लावण्याची आवश्यकता असते.
 
स्क्रू ड्रायव्हरची मूठ ही काम करण्याच्या सोयीच्या दृष्टीने प्रामुख्याने लाकडीलाकूड, प्लास्टिक, रबर या पासून बनवलेली असते. स्क्रू ड्रायवर चा दांडा पोलाद, इतर मिश्र धातूंचा बनवलेला असतो. काही स्क्रू ड्रायव्हर च्या दांड्याचे टोक चुंबकीय बनवलेले असते. अतिशय छोट्या आकाराचे स्क्रू किंवा अशा काही जागा जिथे हाताने स्क्रू हाताळणे अवघड असते, अशा ठिकाणी स्क्रू पकडून ठेवण्यासाठी चुंबकीय टोक असलेला स्क्रू ड्रायव्हर वापरला जातो. प्रमाणित स्क्रूच्या डोक्याच्या आकार आणि प्रकारावरून वरून, स्क्रू ड्रायवरच्या दांड्याच्या टोकाचे आकार आणि प्रकार निश्चित केलेले आहेत.
 
उत्पादन क्षमता वाढावी म्हणून, स्क्रू ड्रायवरच्या एकाच मुठीमध्ये बदलता येणारे दांडे अशी रचना असलेला स्क्रू ड्रायवर वापरला जातो.
 
=== प्रकार ===
प्रमाणित स्क्रूच्या डोक्याच्या आकार आणि प्रकारावरून वरून, स्क्रू ड्रायवरच्या दांड्याच्या टोकाचे आकार आणि प्रकार निश्चित केलेले आहेत.
 
खूप मोठ्या मुठीच्या व पात्याची एकूण लांबी छोटी असलेल्या स्क्रू ड्रायव्हरला 'चबी स्क्रू ड्रायव्हर' म्हणतात.
 
२६

संपादने