बदलांचा आढावा नाही
छो (महत्वाची) |
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
{{हा लेख|इंग्लिश भाषा|इंग्लिश}}
इंग्लंड देशात राहणार्या लोकांना इंग्रज म्हणतात, आणि त्यांच्या भाषेला इंग्रजी. संस्कृतमध्ये इंग्रजीला आंग्लभाषा म्हणत असल्याने मराठीसह अनेक भारतीय भाषांमध्ये इंग्रजी भाषा ही आंग्लभाषा म्हणूनही ओळखली जाते. '''इंग्रजी''' भाषा (इंग्लिश) ही पश्चिम जर्मेनिक भाषाकुळातील एक भाषा आहे. ही भाषा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]], [[कॅनडा]], [[इंग्लंड]], [[ऑस्ट्रेलिया]] व [[न्यूझीलंड]] ह्या देशांमध्ये प्रमुख भाषा आहे. ( [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन संयुक्त संस्थानांमध्ये]] इंग्लिश प्रमुख भाषा असली तरी तिला राज्यघटना अथवा इतर कोणत्याही कायद्याद्वारे अधिकृत भाषेचा दर्जा नाही. कॅनडामध्ये इंग्लिश व फ्रेंच ह्या दोन अधिकृत भाषा आहेत.) कित्येक देशांची ''दुसरी भाषा'' व ''शासकीय भाषा'' आहे. जगभरात सर्वांत जास्त शिकवल्या जाणार्या व समजल्या जाणार्या भाषांत इंग्लिश भाषेची गणना होते.
३५ कोटी लोकांची इंग्रजी ही मातॄभाषा आहे तर जवळजवळ १५ कोटी लोकांची ''दुसरी भाषा''. जगभरात सुमारे १०० कोटी लोक या भाषेत साक्षर आहेत. इंग्रजी ही विज्ञान-तंत्रज्ञान, व्यापार, इंटरनेटसह अनेक विषयात अत्यंत समॄद्ध आहे.
इंग्लिश ही पश्चिम-जर्मेनिक भाषा आहे. अँग्लो-सॅक्सन कुळातील ''जुन्या इंग्लिश'' भाषेपासून इंग्लिश भाषेची उत्पत्ती झाली आहे. इंग्लिशची मुळे जर्मेनिक भाषांत आहे व व्याकरण जुन्या इंग्लिशचे आहे. ब्रिटिश साम्राज्यातून पसरलेल्या इंग्लिश भाषेला आंतरराष्ट्रीय महत्त्व [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] महासत्ता झाल्यामुळे आले. जागतीकरणामुळे इंग्लिशचे महत्त्व अनन्यसाधारण झाले आहे. संपर्क, रोजगार, शिक्षण इत्यादींकरता इंग्लिशचे किमान ज्ञान असणे गरजेचे आहे. भारत हा इंग्लिश ही दुसरी भाषा असणारा महत्त्वाचा देश आहे व भारतीय इंग्लिश ही इंग्लिशची एक महत्वाची बोलीभाषा म्हणून ओळखली जाते.
== स्वर ==
|