"रामकृष्ण विठ्ठल लाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Changing to standardized template.
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
ओळ ६:
शालेय शिक्षणानंतर लाडांना एल्फिन्स्टन विद्यालयातच शिकवण्याची नोकरी मिळाली. या काळात त्यांनी प्राचीन संस्कृत वाङ्मय अभ्यासले व संस्कृत साहित्यिकांच्या जीवनकाळाबद्दल, कालनिश्चितीबद्दल, तसेच [[गुप्त साम्राज्य|गुप्तकालीन]] इतिहासाबद्दल त्यांनी मोलाचे संशोधन केले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेजात प्रवेश घेतला. [[इ.स. १८५०|१८५०]] साली वैद्यकीचा अभ्यासक्रम पुरा करणाऱ्या पदवीधरांच्या पहिल्या तुकडीत ते होते.
 
[[इ.स. १८५१|१८५१]] साली त्यांनी मुंबईत डॉक्टरकी आरंभली. वैद्यकीय पेशास अनुसरत त्यांनी वैद्यकीतही संशोधन केले. महारोगावरील औषधाचा त्यांनी लावलेला शोध, हे त्यांचे वैद्यकशास्त्रातील मोठे योगदान आहे.<ref>{{स्रोत बातमी | url=http://navshakti.co.in/mumbai/29781/ | titleशीर्षक=शतकोत्तर वस्तुसंग्रहालय… | work=नवशक्ति | accessdate=19 सप्टेंबर 2013 | author=संकेत सातपुते | location=मुंबई}}</ref> त्यांच्या कामामुळे मुंबईतील एतद्देशीय व इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका इत्यादी परदेशांतील वैज्ञानिक सोसायट्यांनी त्यांना मानद सभासदत्व बहाल केले. सामाजिक सुधारणेच्या कार्यक्रमांतही त्यांचा सक्रिय सहभाग होता. विधवा पुनर्विवाह, स्त्रीशिक्षणव अंधश्रद्धा निर्मूलन यांविषयीच्या उपक्रमांना त्यांनी पाठबळ पुरवले. मुंबईतील प्रशासकीय, राजकीय सुधारणांमध्येही त्यांनी स्वारस्याने सहभाग घेतला. [[इ.स. १८६९|१८६९]] व [[इ.स. १८७१|१८७१]] सालीं अशा दोन वेळा ते मुंबईच्या नगरपालपदासाठी निवडले गेले.
 
[[मे ३१]], [[इ.स. १८७४|१८७४]] रोजी लाडांचे निधन झाले.