"शकुंतला परांजपे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
ओळ ५७:
शकुंतलाबाईंचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. माध्यमिक शिक्षण पुण्याच्या '''हुजूरपागा''' शाळेत झाले. मॅट्रिक झाल्यानंतर त्या [[फर्ग्युसन महाविद्यालय|फर्ग्युसन महाविद्यालयातून]] बी. एस्‌सी. झाल्या. रँग्लर र.पु. परांजपे या आपल्या वडिलांसारखे त्यांना [[रँग्लर]] व्हायचे होते. त्यासाठी १९२६मध्ये शकुंतलाबाई परांजपे इंग्लंडला गेल्या.
 
केंब्रिज येथे न्यू हॅम कॉलेज मधून त्या गणितात एम. ए. झाल्या. [[पॅरिस]] आणि [[कोलोन]] येथे जाऊन त्या फ्रेंच आणि जर्मन भाषाही शिकल्या. गणितातली अवघड [[ट्रायपास]] पदवी आणि [[केंब्रिज विद्यापीठ|केंब्रिज विद्यापीठातून]] गणितात अधिस्नातक पदवी मिळवली. त्यांनी १० वर्षे [[युरोप|युरोपमध्ये]] राहून '''जिनेव्हा इंटरनॅशनल लेबर ऑफिस'''मध्ये काम करून अनुभव मिळविला. त्या महाराष्ट्रातील समाजसेविका होत्या. त्यांनी भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, कुटुंबनियोजनाचा पुरस्कार केला. शकुंतलाबाई परांजपे यांचे व्यक्तिमत्त्व कुटुंब नियोजनाच्या पहिल्या प्रचारक, शिक्षणतज्ज्ञ, लेखिका, आमदार, खासदार, उत्तम वक्त्या, परखड व स्वतंत्र विचारांच्या विचारवंत, असे विविधांगी होते. [[व्ही. शांताराम|व्ही शांताराम]] यांच्या [[कुंकू (चित्रपट)|कुंकू]] चित्रपटात सुद्धा शकुंतलाताईनी काम केले होते. <ref>{{स्रोत पुस्तक|titleशीर्षक=१०१ कर्तृत्ववान स्त्रिया|last=कर्वे|first=स्वाती|publisher=उत्कर्ष प्रकाशन|year=२०१४|isbn=978-81-7425-310-1|location=पुणे|pages=१२५}}</ref>
 
== व्यक्तिगत माहिती ==
त्यांचे वडील [[रँग्लर परांजपे]] हे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते. आई मॅट्रिक (संस्कृतमध्ये) प्रथम आलेल्या होत्या. त्यामुळे घरात वातावरण बौद्धिक, उच्चशिक्षित व वाचनव्यासंगाने परिपूर्ण होते.
 
युरोपमध्ये काम करत असतांना त्यांचा युरा या रशियन चित्रकाराशी परिचय झाला आणि मग लग्न झाले. दीड वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेतला आणि लहान मुलीसह त्या भारतात परतल्या.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/vishesh-news/shakuntala-paranjpe-349727/|titleशीर्षक=एकमेवाद्वितीय! माझी आई.. शकुंतला परांजपे|last=परांजपे|first=सई|date=१७ जानेवारी २०१४|work=लोकसत्ता|access-date=४ जुलै २०१८|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref> [[सई परांजपे]] ही त्यांची कन्या आहे. आपल्या आईच्या जीवनावर सई परांजपे यांनी पर्स्वेशन हा लघुपट बनविला. शकुंतलाबाई परांजपे या लेखिकाही होत्या. यांनी काही पुस्तके आणि नाटकेही लिहिली आहेत.
 
==लेख==