"सत्यपाल चिंचोलीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई |
||
ओळ ५२:
| संकीर्ण =
}}
'''सत्यपाल चिंचोलीकर''' (जन्म: [[इ.स. १९५२]]) '''सत्यपाल महाराज''' नावाने प्रसिद्ध, हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] समाज प्रबोधक [[कीर्तनकार]] आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.nagpurtoday.in/nmc-to-organise-musical-programme-discourse-of-satyapal-maharaj-on-apr-20/04191200|
==जन्म व कारकीर्द==
ओळ ५९:
अकोला जिल्ह्यातील [[अकोट]] गाव हे सत्यपाल चिंचोलीकर यांचे निवासस्थान आहे. आतापर्यंत देशभरातील १४,०००हून अधिक गावांत समाजप्रबोधनपर कीर्तने त्यांनी केली आहेत. जेथे अस्वच्छता दिसते तेथे सत्यपाल महाराज स्वतः हातात झाड़ू घेऊन तो परिसर स्वच्छ करतात. सत्यपाल महाराज आपली खंजिरी वाजवून एखाद्या सार्वजनिक गावच्या ठिकाणी किंवा गावाच्या पारावर लोकांना एकत्र करतात आणि प्रबोधनाचे कीर्तन सुरू करतात. "सामाजिक विषयांना आध्यात्मिकतेची आणि साथीला वादन कलेची जोड दिली की तो विषय थेट लोकांना भिडतो," असे सत्यपाल चिंचोलीकरांचे म्हणणे आहे. ग्रामीण आदिवासी क्षेत्रातील अशिक्षित लोकांना संगीत व कलेची जोड देत मनोरंजनातून प्रबोधन करण्याचा त्यांचा मानस असतो.
आपल्या भजनातून ते सत्य परिस्थिती आणि सामाजिक विषय मांडतात. त्यांनी खंजिरी या ग्रामीण भागातील [[चर्मवाद्य|चर्मवाद्याला]] विकसित करुन सप्तखंजिरी म्हणजेच ७ खंजिरी एकत्र करून विविध आवाज काढायला सुरुवात केली. परिसर स्वच्छ करून ते आपल्या दिवसाची सुरुवात करतात. दिवसभर वाचन लेखन आणि रात्री गावात जाऊन कीर्तने करणे हा त्यांचा दिनक्रम आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=https://m.maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/constitution-gave-the-right-to-life/articleshow/63850918.cms|
भारत देशातील परिवर्तनाच्या चळवळीतील बहुजनवादी संतांचे योगदान समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी २१ व २२ मे २०११ रोजी [[पुणे]] शहरात [[अखिल भारतीय बहुजन संत साहित्य संमेलन|अखिल भारतीय बहुजन संत साहित्य संमेलनाचे]] आयोजन करण्यात आले होते. २१ तारखेला सकाळी दहा वाजता महाराष्ट्राचे तत्कालीन बांधकाम मंत्री [[छगन भुजबळ]] यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. सत्यपाल महाराज या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते तर [[हनुमंत उपरे]] हे स्वागताध्यक्ष होते.
|