२७,९३७
संपादने
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भ क्षेत्रात बदल. |
छो (सांगकाम्या_द्वारे_सफाई) |
||
[[File:Kalidas.jpg|thumb|महाकवी कालिदासाची काल्पनिक मूर्ती]]
'''कालिदास''' हे एक [[संस्कृत]] [[नाटककार]] आणि [[कवी]] होते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?hl=en&lr=&id=GNALtBMVbd0C&oi=fnd&pg=PR7&dq=Kalidas+sanskrit+writer&ots=f2Gb8pq0om&sig=kI7PKiGsiiqs_6Ut1YYH5MsJLRI#v=onepage&q&f=false|
==गौरव==
पुरा कवीनां गणनाप्रसंगे, कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः | अद्यापि तत्तुल्यकवे: अभावात्, अनामिका सार्थवती बभूव || या शब्दात महाकवी कालिदासाचा गौरव [[संस्कृत]] साहित्यक्षेत्रात केला जातो.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=v0RWnRKTWp0C&printsec=frontcover&dq=myth+about++kalidas&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiV0caAodfaAhXDpY8KHY1rCVkQ6AEIPjAE#v=onepage&q&f=false|
==साहित्यिक म्हणून वैशिष्ट्ये==
[[File:Kalidas Smarak Ramtek.jpg|thumb|रामटेक येथील कालिदास स्मारक]]
संस्कृत भाषेतील अन्य रचनाकार आणि कालिदास यांच्यामध्ये काही मूलभूत फरक आहे. अभ्यासकांनी याविषयी आपापली मते नोंदविलेलली आहेत. कालिदासाच्या काव्याचे वैशिष्ट्य म्हणजे [[निसर्ग]] आणि [[मानव]] यांच्या परस्पर संबंधांवर केलेले भाष्य. निसर्गावर,पशू आणि पक्षी यांच्यावर मानवी भाव-भावनांचा केलेला वापर हे त्याचे वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल, संस्कृत भाषेतील विविध अलंकार आणि त्यांचा वापर हे त्याच्या काव्यात अनुभवाला येते. नाट्यकृतीत संस्कृत भाषेवरील त्यांचे प्रभुत्व दिसून येत असून सहज,सोपी भाषा हे आणखी एक वैशिष्ट्य म्हणून नोंदविता येते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=HwHk-Y9S9UMC&pg=PA42&dq=importance+of+kalidas+in+sanskrit+literature&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjL3uTY2NnaAhUDGpQKHUiTDawQ6AEIRjAF#v=onepage&q=importance%20of%20kalidas%20in%20sanskrit%20literature&f=false|
== काल ==
== जीवन ==
आख्यायिका:- कालिदास हा बालपणी न शिकलेला व कमी बुद्धी असलेला होता. त्याची पत्नी ही प्रकांड पंडिता व विदुषी होती. लग्न झाल्यावर त्यास त्याच्या पत्नीने विचारले :'''अस्ति कश्चित वाग्विशेषः'''? (वाङ्मयाबद्दल काही विशेष ज्ञान आहे काय?). कालिदास या बाबतीत अगदीच अनभिज्ञ होता. पत्नीचे बोलणे अपमानास्पद वाटून त्याने जंगलाची वाट धरली आणि तेथे काली देवीची प्रार्थना व तपस्या करून वरदान मिळविले. परत आल्यावर त्याने पत्नीच्या प्रश्नाला उत्तर म्हणून ’अस्ति’, कश्चित’ आणि ’वाग्’ या आरंभीच्या तीन शब्दांनी सुरू होणारे साहित्य रचले.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=tyX2DAAAQBAJ&pg=PT8&dq=kalidas+and+his+wife&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiItsCD29naAhVDhrwKHWLpDw8Q6AEIKDAA#v=onepage&q=kalidas%20and%20his%20wife&f=false|
’अस्ति’पासून - '''अस्ति उत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजः । पूर्वापरौ तोयनिधी विगाह्य स्थितः पृथिव्या इव मानदण्डः॥''' ...कुमारसंभव <br />
== उपमा कालिदासस्य ==
कालिदासाच्या साहित्य रचनेत "उपमा" या साहित्यातील अलंकार प्रकाराला महत्वाचे स्थान दिलेले दिसते. त्याच्या या भाषाशैलीमुळे आणि त्यावरील प्रभुत्वामुळे कालिदासाने रचलेल्या श्लोकांना उपमा कालिदासस्य या शब्दात गौरविले जाते. त्याची काही उदाहरणे-
*[[विदर्भ]] देशाची राजकन्या इंदुमती हिचे स्वयंवर मांडले आहे. देशोदेशीचे राजेमहाराजे या स्वयंवरात भाग घेण्यासाठी आपापल्या लवाजम्यासह दाखल झाले आहेत. प्रत्यक्ष स्वयंवराला प्रारंभ झाल्यावर तो विस्तीर्ण राजप्रासाद देशोदेशींच्या राजेरजवाडय़ांनी आपापली आसने भूषविल्यानंतर अधिकच शोभायमान झाला आहे. पृथ्वीवरचे सगळे ऐश्वर्य, शौर्य, सौंदर्य जणू काही अतिविशाल स्वयंवर मंडपात एकवटले आहे. स्वरूपसुंदर इंदुमती कोणाला माळ घालील याची उत्सुकता सर्वांच्या चेहर्यावर दाटून राहिली आहे. इंदुमती आपली प्रिय सखी सुनंदा हिच्यासोबत त्या मंडपात दाखल झाली. हातात वरमाला घेतलेली इंदुमती एकेका राजाचे सूक्ष्म निरीक्षण करीत सावकाश एकेक पाऊल टाकत पुढे पुढे जाऊ लागली. चतुर सुनंदा मोठ्या मार्मिक शब्दांत एकेका राजाचे वर्णन करू लागली. हा प्रसंग रंगवून सांगतांना महाकवी कालिदासाने एक अतिरम्य अशी उपमा वापरली आहे. '''उपमा कालिदासस्य''' असे म्हणतातच<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://bharatdiscovery.org/india/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%95%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE|
{{वचन|'''संचारिणी दीपशिखेव रात्रौ यं यं व्यतीयाय पतिंवरा सा ।'''
==कालिदासाचे साहित्य==
[[File:Ravi Varma-Shakuntala.jpg|thumb|राजा रविवर्मा यांनी काढलेले शकुंतलेचे चित्र]]
* अभिज्ञानशाकुंतलम् (नाटक)-हस्तिनापूरचा राजा दुष्यंत आणि कणव मुनींची मानसकन्या यांचे प्रेम,गांधर्वविवाह, दुर्वास ऋषीच्या शापामुळे त्या विवाहाचा राजाला पडलेला विसर आणि शकुंतलेची राजाला ओळख पटवून देण्यासाठी राजाने तिला दिलेल्या "अंगठीची" खूण असा एकूण कथाभाग या नाटकात आलेला आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=g7mWCnM-nicC&printsec=frontcover&dq=shaakuntala+by+kalidas&hl=en&sa=X&ved=0ahUKEwi22Pi-0dnaAhXCXLwKHeghAqUQ6AEIMTAB#v=onepage&q=shaakuntala%20by%20kalidas&f=false|
* [[ऋतुसंहार]] (काव्य)- यात कालिदासाने सहा ऋतूतील निसर्गाचे वर्णन, झाडे, वेली व पशू-पक्षी यांवर होणारा परिणाम, निसर्गाचे रूप यांचे सहा सर्गांत वर्णन केले आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=apqnZoC3T40C&printsec=frontcover&dq=ritusamhara+by+kalidas&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiD4YT909naAhWDi7wKHfhtDW4Q6AEIKzAB#v=onepage&q&f=false|
* [[कुमारसंभव]] (महाकाव्य)- शिव आणि पार्वती यांचा शृंगार आणि कुमार कार्तिकेयाच्या जन्माचे वर्णन या महाकाव्यात केलेले आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=eYFmnRXasEIC&printsec=frontcover&dq=kumarsambhav+by+kalidas&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiPwODH1dnaAhWCUrwKHdzbBv8Q6AEIMDAB#v=onepage&q&f=false|
* गंगाष्टक (काव्य)-गंगा नदीचे श्लोकबद्ध वर्णन यात केलेले आहे.
* [[मालविकाग्निमित्रम्]] (नाटक)-नृत्यांगना मालविका आणि राजा अग्निमित्र यांच्या प्रेमाची कथा या नाटकात आलेली आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=dyehAwAAQBAJ&printsec=frontcover&dq=malvikagnimitram++by+kalidas&hl=en&sa=X&ved=0ahUKEwj31Ij31NnaAhXHk5QKHcmQAiYQ6AEILjAB#v=onepage&q&f=false|
* [[मेघदूत]] (खंडकाव्य)-वियोगामुळे व्याकुळ झालेल्या यक्षाने आपल्या प्रिय पत्नीला मेघाबरोबर पाठविलेला संदेश म्हणजे कालिदासाच्या प्रतिभेचा विलासच होय.
[[कुबेर|कुबेरा]]च्या सेवेत कसूर झाल्यामुळे कुबेराची यक्षाला एक वर्ष अलका नगरीतून हद्दपार होण्याचा आदेश दिला. पत्नीच्या प्रेमात असलेल्या यक्षाला हा विरह सहन करणे कठीण होते. अलका नगरीतून रामगिरी पर्वतावर आलेल्या यक्षाने आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी दिसलेल्या मेघाला आपला दूत बनविले आणि अलका नगरीत असलेल्या आपल्या प्रिय पत्नीला त्याने संदेश पाठविला हसी या काव्याची कथा आहे. पूर्वमेघ आणि उत्तरमेघ अशा दोन भागात या काव्याची रचना आढळते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=BQLbDgAAQBAJ&printsec=frontcover&dq=meghdoot+by+kalidas&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjTvNqL0dnaAhWGGJQKHdx4BjUQ6AEIMjAC#v=onepage&q=meghdoot%20by%20kalidas&f=false|
* [[रघुवंश]] (महाकाव्य)- यामध्ये [[इक्ष्वाकु]] वंशातील दिलीप ते अग्निवर्ण अशा राजांचे चरित्र आले आहे. रघु या प्रजाहितदक्ष राजाचे विशेष वर्णन यामध्ये आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=vjZbAAAAQAAJ&printsec=frontcover&dq=raghuvansh+by+kalidas&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiQgIqq1tnaAhWDspQKHT_4C3cQ6AEIMDAB#v=onepage&q&f=false|
* विक्रमोर्वशीयम् (नाटक)-अप्सरा [[उर्वशी]] आणि राजा पुरूरवा यांच्या प्रणयाची कथा या नाटकाचा विषय आहे. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=I7nXDgAAQBAJ&printsec=frontcover&dq=Vikramorvasiyam+by+kalidas&hl=en&sa=X&ved=0ahUKEwi6guHk1tnaAhXEi5QKHdsRA6UQ6AEILjAB#v=onepage&q=Vikramorvasiyam%20by%20kalidas&f=false|
* शृंगारतिलक (काव्य)<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=N8fBQ5vH34gC&printsec=frontcover&dq=Literature+of+Kalidas&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjI1N-ypNfaAhXMsY8KHQNpBx0Q6AEIMzAC#v=onepage&q&f=false|
कालिदासाच्या कलाकृती या भावी पिढ्यात चित्रकार,शिल्पकार यांना विषयवस्तू उपलब्ध करून देण्यासाठी प्रोत्साहनपर ठरल्या आहेत.चित्रकला,शिल्पकला, नाट्य यामध्ये कालिदासाच्या साहित्याची अभिव्यक्ती आधुनिक काळातही दिसून येते.
;कालिदास सन्मान पुरस्कार
{{मुख्य|कालिदास सन्मान पुरस्कार}}
महाकवी कालिदास यांच्या नावाने साहित्य आणि कलाक्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी [[कालिदास सन्मान पुरस्कार]] भारतातील [[मध्य प्रदेश]] राज्य शासनातर्फे इ.स. १९८० सालापासून देण्यात येतो. या सन्मानाला विशेष महत्व आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.mp.gov.in/en/web/guest/awards1|
;कालिदास पुरस्कार
|