"बानू कोयाजी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
removed Category:सामाजिक कार्यकर्ते; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ ७:
| चित्रशीर्षक_पर्याय =
| जन्मनाव =
| जन्म_दिनांक = [[२२ ऑगस्टसप्टेंबर]], [[इ.स. १९१८१९१७]]
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = [[१५ जुलै]], [[इ.स. २००४]]
ओळ ५२:
| संकीर्ण =
}}
''डॉ.'' '''बानू कोयाजी''' ([[२२ ऑगस्ट]], [[इ.स. १९१८]] - [[१५ जुलै]], [[इ.स. २००४]]) ह्या [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक डॉक्टर व समाजसेविका होत्या.
 
==शिक्षण==
 
''डॉ.'' '''बानू कोयाजी''' ([[७ सप्टेंबर]], [[इ.स. १९१७]] - [[१५ जुलै]], [[इ.स. २००४]]) ह्या [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक डॉक्टर व समाजसेविका होत्या. बानू कोयाजी यांनी अनेक प्रकारचे सामाजिक कार्य तसेच कुटुंबनियोजनाचे देखील कार्य केले आहे. ७ सप्टेंबर १९१७ रोजी बानू कोयाजी यांचा जन्म मुंबई येथे झाला. वडील पेस्तनजी कापडिया स्वतः एम.डी. होते. बानुबाईंची आवड ओळखून वडिलांनी त्यांना वैद्यकीय शिक्षण देण्याचे ठरविले. १९४६ मध्ये बानूबाई मुंबईतील प्रसिद्ध ग्रॅॅण्ड मेडिकल कॉलेज मधून एम.डी. झाल्या. काही वर्षे त्यांनी पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणूनही काम केले. बानुबाई स्त्रीरोग आणि प्रसुतीशास्त्रात एम.डी. झाल्या. अध्यापनापेक्षा प्रत्यक्ष रुग्णसेवेत त्यांना जास्त रस होता.
जहांगीर कोयाजी यांच्या बरोबर त्यांचा विवाह झाला. जहांगीर कोयाजी यांनी बानूबाईंना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कार्यात साथही दिली. बानूबाईंवर वैद्यकीय कार्याच्या दृष्टीने खरा प्रभाव पडला तो त्यांचे मोठे दीर डॉ. एडलजी कोयाजी यांचा. डॉ. एडलजी कोयाजी गरिबांसाठी अतिशय आस्थेने, मनापासून काम करीत. त्यांचे काम बघूनच वैद्यकीय ज्ञान केवळ पैसा मिळविण्याचे साधन नसून त्यातून समाजसेवा करणेही महत्वाचे आहे. याची त्यांना जाणीव झाली. "आपल्या समाजात स्त्रियांच्या आरोग्याच्या संदर्भात जास्त प्रश्न आहेत. समाजाला स्त्रीरोग तज्ञ, प्रसूती तज्ञाची गरज आहे. तू स्त्रीरोग तज्ञ हो." असा सल्ला डॉ. एडलजी कोयाजी यांनी दिला. बानूबाईंच्या दिरांच्या सूचनेला मान देऊन आपल्या ज्ञानाची व कार्याची दिशा निवडली. प्रथम सहा महिन्यांसाठी बानुबाई के.ई.एम. हॉस्पिटल मध्ये आल्या होत्या. परंतु त्या कायमच्या के.ई.एम. च्या बनल्या.के.ई.एम. त्यांचे झाले. पुण्यातील के.ई.एम. म्हणजे डॉ.बानू कोयाजी असे समीकरणच तयार झाले. केवळ ४० कॉटस् सुरुवातीला असणारे के.ई.एम. हॉस्पिटल डॉ.बानूबाईंनी टप्याटप्याने वाढवीत आणले.
==कामाचा विषय==
डॉ.बानूबाईंनी आपले काम के.ई.एम. पुरते मर्यादित ठेवले नाही. आपल्या समाजातील स्त्रियांचे आरोग्य, त्या विषयीचे प्रश्न, त्यातील समस्या याविषयी त्यांना अचूक भान होते. ग्रामीण भागात वैद्यकीय कामाचे १९७८ पासून प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली. १९४० मध्ये श्री.र.धो. कर्वे यांच्यापासून प्रेरणा घेऊन काही वर्षे डॉ. बानूबाईंनी कुटुंबनियोजनाचे काम प्रतिकूल परिस्थितीत केले होते. तेच काम नव्याने त्यांनी ग्रामीण भागात करण्याचे ठरविले. वडू येथे त्यांनी प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी केली. ७ ते ११ वर्षे वयोगटातील मुलींचा गट त्यांनी त्यासाठी निवडला होता. ६०० हून अधिक मुलींना त्यांनी प्रशिक्षित केले. स्त्रियांना कुटुंबनियोजनाचे महत्व समजावे म्हणून शिबिरे भरवली. कुटुंबनियोजनाचा प्रसार केला. ३०० गावांमध्ये कुटुंबनियोजनाच्या विविध योजना राबविल्या. ग्रामीण महिलांना रोजगार उपलब्ध होईल असेही प्रकल्प बानूबाईंनी सुरु केले. स्त्रियांसाठी 'इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च' या संस्थेची स्थापना त्यांनी केली. याशिवाय अनेक वैद्यकीय संस्था, सामाजिक संस्था तसेच शैक्षणिक संस्थांशी बानुबाई संबंधित होत्या. पुणे विद्यापीठाच्या विधीसभा, तसेच विद्या परिषदेच्या त्या सदस्या होत्या.
डॉ. बानू कोयाजी यांच्या कार्याचा एक स्वतंत्र विभाग होता. तो म्हणजे '''सकाळ वृत्तपत्र''' वृत्तपत्र सामुहात त्यांनी केलेले काम. 'सकाळ' चे संपादक डॉ. ना.भि. परुळेकर यांच्या बरोबर त्यांचा परिचय होता. डॉ. परुळेकरांच्या विनंतीवरून डॉ. कोयाजी १९५५ पासून 'सकाळ' च्या संचालक मंडळात काम करू लागल्या. डॉ. परुळेकरांच्या निधनानंतर डॉ. कोयाजी 'सकाळ'च्या संचालक झाल्या. 'सकाळ' पवार उद्योग समूहाकडे गेल्यानंतरही डॉ. कोयाजी 'सकाळ' संचालक मंडळाशी संबंधित होत्या. 'सकाळ'चे इंडिया फौंडेशन सारखे सर्व उपक्रम सकाळ रिलीफ फंड यांचे कामही बानुबाईंनी डॉ. परुळेकरांनंतर चालू ठेवले.
आनंदी, उमद्या स्वभावाच्या, मृदू बोलणाऱ्या डॉ. बानुबाई कोयाजी पारशी असूनही अतिशय उत्तम मराठी बोलत असत. १५ जुलै २००४ रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी डॉ. बानू कोयाजी यांचे निधन झाले.
 
==पुरस्कार==
*१९८९- पद्मभूषण
*१९९१- पुण्यभूषण
*१९९३- रामेश्वर बिर्ला राष्ट्रीय सन्मान
*१९९३- एस.एन.डी.टी. विद्यापीठाची डी.लिट
*१९९५- पुणे विद्यापीठ सन्मान
{{विस्तार}}