"अनिल अवचट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५२:
* साहित्यक्षेत्रात -
 
१९६९ मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक पूर्णिया हे प्रसिद्ध केले. तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले आहे. आतापर्यंत त्यांची २२ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. वृत्तपत्रे आणि नियतकालिके यामध्ये त्यांचे लेखन प्रसिद्ध होत असते.स्वतःचे छंद, अनुभव , कथा असे विविधांगी लेखन ते  करतात.<ref name=":0">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://anilawachat.wordpress.com/|title=Anil Awachat (अनिल अवचट)|website=Anil Awachat (अनिल अवचट)|language=en-US|access-date=2018-07-14}}</ref>
 
*मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र -
ओळ ६०:
डॉ. अनिल अवचट हे स्वत: [[पत्रकार]] असले तरी त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नेहमीच नकार दिला आहे. त्यांनी आपली पत्रकारिता नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली आहे. डॉ. अनिल अवचट यांनी [[मजूर]], [[दलित]], [[भटक्या जमाती]], [[वेश्या]] यांच्या प्रश्नांविषयी विपुल लिखाण केले आहे. विविध प्रश्नांवर लढा देताना आपले संपूर्ण आयुष्य एखाद्या प्रश्नासाठी खर्च केलेल्या कार्यकर्त्यांवर लेखन केले आहे. डॉ. अवचट यांचे लेखन हे प्रेरणादायी आहे. सर्व सामाजिक लढ्यांमागच्या चांगल्या गोष्टी त्यांनी नेहमीच अधोरेखित केल्या आहेत.
*छंद-
डॉ. अनिल अवचट हे केवळ लेखक व सामाजिक कार्यकर्तेच नसून ते एक कलाकारही आहेत. त्यांची चित्रे, लाकडातील शिल्पे, छायाचित्रे,ओरिगामी, बासरी वादन यांतून त्यांच्या अंगभूत गुणांची ओळख पटते.<ref name=":0" />
 
==उल्लेखनीय==
"https://mr.wikipedia.org/wiki/अनिल_अवचट" पासून हुडकले