"रितेश देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Changing template: Cite news
ओळ ३६:
 
==जीवन==
रितेश यांचा जन्म [[लातूर]]मधील बाभळगाव या गावी झाला. माजी केंद्रीय अवजड उद्योग व विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत श्री.[[विलासराव देशमुख]] व '''वैशाली देशमुख''' यांचे ते दुसरे सुपुत्र आहेत. रितेश यांचे ज्येष्ठ बंधू [[अमित देशमुख]] हे माजी राज्यमंत्री तथा [[लातूर]] शहराचे विद्यमान आमदार आहेत तसेच छोटे बंधू [[धीरज देशमुख]] हे लातूर युवक काँग्रेसचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य आहेत.
रितेश यांचे शालेय शिक्षण लातूर येथेच झाले आहे तसेच त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण जि.डी.सोमाणी मेमोरिअल स्कूल येथे झाले आहे. कमला रहेजा महाविद्यालय,मुंबई या महाविद्यालयातून त्यांनी आर्किटेक्ट ही पदवी प्राप्त केली.
२००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या [[तुझे मेरी कसम]] चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट सृष्टीत अभिनेता म्हणून पदार्पण केले. या चित्रपटाद्वारे जोडी जमलेल्या [[जेनेलिया डिसुझा]] यांना रितेश यांनी आयुष्याचा जोडीदार(पत्नी) म्हणून पसंत केले व २०१२ मध्ये हिंदू व ख्रिस्चन या दोन्ही रितीरिवाजानुसार ते '''जेनेलिया''' यांच्या सोबत विवाहबद्ध झाले. '''जेनेलिया''' या अभिनेत्री असुन त्यांनी आजवर अनेक हिंदी व तेलुगु चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.
रितेश यांच्या दोन्ही वहिनी [[आदिती घोरपडे]] ('''आदिती अमित देशमुख''') व [[दीपशिखा भगनानी]] ('''दीपशिखा धीरज देशमुख''') या देखील चित्रपटसृष्टीशी निगडीत आहेत. मोठ्या वहिनी आदिती यांनी हिंदी मालिकांमध्ये अभिनेत्री म्हणून काम केले आहे तर धाकट्या वहिनी दीपशिखा या स्वतः निर्मात्या असुन सुप्रसिद्ध निर्माते [[वासू भगनानी]] यांच्या त्या कन्या आहेत.
रितेश आणि जेनेलिया यांना २ अपत्य असुन रिआन व राहील अशी त्यांची नावे आहेत.
 
 
==सामाजिक कार्य==