[[चित्र:LL.D. Degree Certificate of Dr. B. R. Ambedkar from Columbia University.jpg|thumb|कोलंबिया विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिलेली एल.एल.डी. (डॉक्टर ऑफ लॉज्) ही मानध.]]
[[चित्र:Dr. Ambedkar with Mr. Wallace Stevens at Columbia University, New York (USA), while receiving LL.D. (Doctorate of Laws) for being the 'Chief Architect of the Constitution of India'.jpg|thumb| ५ जून १९५२ रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठाची मानध एल.एल.डी. ही डॉक्टरेट पदवी स्वीकारल्यानंतर त्यांच्यासोबत वॅलन्स स्टीव्हन्स.]]
[[५ जून]] [[इ.स. १९५२|१९५२]] रोजी बाबासाहेब आंबेडकरांना संविधान निर्मिती, सामाजिक कार्याबद्दल आणि मानवी हक्कांचा पहारेकरी या भूमिकेबद्दल कोलंबिया विद्यापीठाने 'एलएलडी' (डॉक्टर ऑफ लिटरेचर) ही सन्माननीय डॉक्टरेट पदवी बहाल केली. ‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मंत्रिमंडळाचे सदस्य आणि राज्यसभेचे सदस्य, भारतीय नागरिकांपैकी एक प्रमुख नागरिक, एक महान सुधारक आणि मानवी हक्काचा आधारस्तंभ असणारा एक पराक्रमी पुरुष’ असं कोलंबिया विद्यापीठाने त्यांना दिलेल्या मानपत्रात संबोधण्यात आले आहे.{{संदर्भ हवा}}
==== डी.लिट. ====
[[चित्र:D.Litt. Degree Certificate of Dr. B. R. Ambedkar from Osmania University.jpg|thumb|१२ जानेवारी १९५३ रोजी, हैदराबादच्या [[उस्मानिया विद्यापीठ]]ाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दिलेली डी.लिट्. ही मानद पदवी]]
हैदराबादच्या [[उस्मानिया विद्यापीठ]]ाने १२ जानेवारी १९५३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दिलेली डी.लिट्. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) ही मानद पदवी प्रदान केली.{{संदर्भ हवा}}
=== बोधिसत्व ===
भारतीय बौद्ध विशेषतः [[नवयान]]ी अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘महान [[बोधिसत्व]]’ व [[मैत्रेय]] म्हणतात.<ref>{{Citation|last=Vipassana Dhamma|title=बोधिसत्व थे डॉ. बाबासाहेब आंबेडकर। -सत्यनारायण गोयन्का|date=2017-03-17|url=https://m.youtube.com/watch?v=HqXKDu97T5I|accessdate=2018-03-16}}</ref><ref>{{Citation|last=VIPASSANA MEDITATION by S N Goenka|title=S N Goenka-Question & Answer,बाबा साहब को बोधिसत्व क्यु कहते है in Hindi|date=2017-03-28|url=https://m.youtube.com/watch?v=H4XETKduX5k|accessdate=2018-03-16}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|author= Fitzgerald, Timothy|शीर्षक= The Ideology of Religious Studies|दुवा=https://books.google.com/books?id=R7A1f6Evy84C&pg=PA129| year=2003|प्रकाशक= Oxford University Press|isbn= 978-0-19-534715-9|page=129}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|author=M.B. Bose|editor=Tereza Kuldova and Mathew A. Varghese|शीर्षक=Urban Utopias: Excess and Expulsion in Neoliberal South Asia |दुवा=https://books.google.com/books?id=6c9NDgAAQBAJ&pg=PA144 |year=2017|प्रकाशक=Springer|isbn=978-3-319-47623-0|pages=144–146}}</ref> इ.स. १९५५ मध्ये, [[काठमांडू]], [[नेपाळ]] येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेत सहभागी बौद्ध [[भिक्खू]]ंनी त्यांना ‘बोधिसत्व’ ही उपाधी प्रदान केली. त्यानंतर [[दलाई लामा]] एकदा डॉ. आंबेडकरांना भेटले असता लामांनी सुद्धा त्यांना 'बोधिसत्व' संबोधले होते.<ref>डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लेखक - धनंजय कीर</ref> बाबासाहेब हे [[बोधीसत्व]] होते परंतु त्यांनी कधीही स्वतःला बोधीसत्व म्हटले नाही.{{संदर्भ हवा}}
=== भारतरत्न ===
[[चित्र:Dr. Ambedkar was posthumously awarded the highest civilian honour of 'Bharat Ratna'.jpg|thumb|डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिलेला ‘[[भारतरत्न]]’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार [[भारताचे राष्ट्रपती]] [[रामस्वामी वेंकटरमण]] यांचे हस्ते स्वीकारताना डॉ. सविता तथा माईसाहेब आंबेडकर. [[१४ एप्रिल]] [[इ.स. १९९०|१९९०]] हा त्यांचा शताब्धी जयंती दिन होता. हा पुरस्कार सोहळा [[राष्ट्रपती भवन]]ातील दरबार हॉल/अशोक हॉलमध्ये संपन्न झाला.]]
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य, मजूर व स्त्रियांच्या उद्धारासाठी केलेले कार्य, स्वतंत्र [[भारताची राज्यघटना]] निर्मितीचे केलेले राष्ट्रीय कार्य तसेच आयुष्यभर [[समता]] स्थापनेसाठी केलेला प्रखर संघर्ष यासाठी ‘[[भारतरत्न]]' हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार (मरणोत्तर) देण्याचे [[भारत सरकार]]ने एप्रिल १९९०च्या पहिल्या आठवड्यात जाहिर केले. आणि [[१४ एप्रिल]] [[इ.स. १९९०|१९९०]] रोजी त्यांना मरणोत्तर [[भारतरत्न]] या पुरस्काराने गौरवले गेले. डॉ. आंबेडकरांना दिलेला ‘[[भारतरत्न]]’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार [[भारताचे राष्ट्रपती]] [[रामस्वामी वेंकटरमण]] यांचे हस्ते डॉ. सविता तथा [[माईसाहेब आंबेडकर]] यांनी स्वीकारला. [[१४ एप्रिल]] [[इ.स. १९९०|१९९०]] हा त्यांचा शताब्धी जयंती दिन होता. हा पुरस्कार सोहळा [[राष्ट्रपती भवन]]ातील दरबार हॉल/अशोक हॉलमध्ये संपन्न झाला होता.<ref>डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लेखक - विजय सुरवदे</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://www.thehindu.com/news/national/All-you-need-to-know-about-the-Bharat-Ratna/article10956951.ece|title=All you need to know about the Bharat Ratna|date=2014-12-24|work=The Hindu|access-date=2018-04-05|others=PTI|language=en-IN|issn=0971-751X}}</ref>
=== कोलंबिया विद्यापीठाच्या १०० बुद्धिमान विद्यार्थांमध्ये अव्वल ===
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन २००४ मध्ये [[कोलंबिया विद्यापीठ]]ाने गौरव केला.
इ.स. २००४ मध्ये विद्यापीठ स्थापन होऊन मध्ये २५० वर्ष झाले, त्यानिमित्त विद्यापीठाने आपल्या विद्यापीठ शिकलेल्या सर्वात बुद्धिमान अशा १०० विद्यार्थ्यांची 'द कोलंबियन्स अहेड ऑफ देअर टाइम' नावाची यादी जाहिर केली आहे, आणि त्यात 'भीमराव आंबेडकर' हे नाव पहिल्या स्थानावर होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://c250.columbia.edu/c250_celebrates/remarkable_columbians/bhimrao_ambedkar.html|title=Bhimrao Ambedkar|website=c250.columbia.edu|access-date=2018-03-19}}</ref> बाबासाहेब आंबेडकर हे 'पहिले द कोलंबियन अहेड ऑफ देअर टाइम' ठरले. शिवाय या यादीत ते एकमेव भारतीय व्यक्ती होते. अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष [[बराक ओबामा]] यांच्या हस्ते [[कोलंबिया विद्यापीठ]]ात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं समारंभपूर्वक अनावरण करण्यात आलं. त्यानंतर विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअरच्या हॉलमध्ये बाबासाहेबांचे पेंटिंग दिमाखात लावण्यात आलं. कोलंबिया विद्यापीठाने जगभरातील राष्ट्रांच्या राज्यघटना आणि कायद्याच्या अभ्यासासाठी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन' स्थापन केलं. या ठिकाणी बाबासाहेबांचं शिल्प आणि त्यांच्या कामाचा गौरव करणारे साहित्यही ठेवण्यात आले आहे. १९१३ मध्ये बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठात शिकायला गेले होते. तेथे त्यांनी १९१५ साली त्यांनी एमएची पदवी मिळवली व पुढे १९१६ मध्ये याच विद्यापीठातून त्यांनी पीएचडी घेतली.
भारत देशाच्या कोलंबिया विद्यापीठाशी असलेल्या दीर्घकालीन नात्याची आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आंबेडकरांच्या नावाने या कोलंबिया विद्यापीठातल्या विधी विद्यालयात अध्यासन स्थापन करण्यात आले आहे. याशिवाय तेथे शिक्षण घेण्यासाठी भारत सरकारची एक शिष्यवृत्ती आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.law.columbia.edu/media_inquiries/news_events/2010/April2010/india-bhagwati|title=India Endows Chair Devoted to Indian Constitutional Law, Jagdish Bhagwati Fellowship|website=Columbia Law School|language=en|access-date=2018-03-16}}</ref> शिवाय कोलंबिया विद्यापीठात आंबेडकर अध्यासनातर्फे संवैधानिक कायद्याचा अभ्यास करणारे अनेक विद्यापीठीय कार्यक्रम आयोजित केले जातात, त्यामध्येच राज्यशास्त्राचे जेष्ठ अभ्यासक [[रामचंद्र गुहा]] ह्यांची व्याख्यानमाला या अध्यासना २०१२ मध्ये आयोजित केली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.law.columbia.edu/media_inquiries/news_events/2012/march2012/Ambedkar-Lecture-Series|title=Ambedkar Lecture Series to Explore Influences on Indian Society|website=Columbia Law School|language=en|access-date=2018-03-16}}</ref>
=== सर्वात महान भारतीय ===
{{Main|सर्वात महान भारतीय (सर्वेक्षण)}}
भारतीय स्वातंत्र्यानंतर भारतासाठीचे अद्वितीय योगदान व भारतातील कोट्यवधी जनतेच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवून आणणारा ‘[[सर्वात महान भारतीय]] कोण’? या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी २०१२ मध्ये आयोजित केलेल्या सर्वात मोठ्या 'द गेटेस्ट इंडियन' सर्वेक्षणाच्या निष्कर्षाचे उत्तर आहे — डॉ. बाबासाहेब आंबेडकर. बहुसंख्य भारतीय जनतेचा हा कौल आहे.<ref>{{Citation|last=democracyandequality|title=The Greatest INDIAN Dr. B. R. AMBEDKAR Part 1|date=2012-08-20|url=https://m.youtube.com/watch?v=Dcp1MKjW9YE|accessdate=2018-03-26}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.indiainfoline.com/article/lifestyle-buzz/dr-b-r-ambedkar-is-%E2%80%98the-greatest-indian-after-the-mahatma%E2%80%99-113110105773_1.html|title=Dr. B R Ambedkar is ‘The Greatest Indian after the Mahatma’|last=indiainfoline.com|access-date=2018-03-26|language=en}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.thehindubusinessline.com/news/Dr-B.R.-Ambedkar-voted-as-%E2%80%98Greatest-Indian%E2%80%99/article20485049.ece|title=Dr B.R. Ambedkar voted as ‘Greatest Indian’|work=@businessline|access-date=2018-03-26|language=en}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.firstpost.com/politics/watch-why-ambedkar-was-voted-as-the-greatest-indian-423570.html|title=Watch: Why Ambedkar was voted as the greatest Indian – Firstpost|website=www.firstpost.com|access-date=2018-03-16}}</ref>
सीएनएन-आयबीएन व हिस्ट्री १८ या नामांकित दूरचित्रवाहिन्यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समाजजीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवणाऱ्या १०० नामवंतांची यादी करून त्यातील [[सर्वात महान भारतीय]] कोण? असा सवाल भारतीय जनतेसमोर ठेवला होता. तीन वेगवेगळ्या पद्धतीने लोकांची मते जाणून घेण्यात आली. [[दूरध्वनी]], [[मोबाईल फोन|मोबाईल]] व [[इंटरनेट]]द्वारे सर्वसामान्य माणसांना आपलं मत नोंदविण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. याव्यतिरिक्त वेगवेगळ्या क्षेत्रातील २८ नामांकित व्यक्तींना ज्यूरी म्हणून नेमण्यात आलं. त्यांनाही पसंतीक्रम नोंदविण्यास सांगण्यात आलं होतं. लोकांची मतं, मार्केट रिसर्च आणि ज्यूरी अशा सर्वेक्षणाच्या तीन पद्धतीतून निघालेले निष्कर्ष वेगवेगळे आहेत. मात्र तिन्ही सर्वेक्षणाचा एकंदरीत निष्कर्ष बाबासाहेब आंबेडकरांना ‘‘द ग्रेटेस्ट इंडियन’’ ठरवून गेला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.news18.com/videos/india/the-greatest-indian-11-498738.html|title=The Greatest Indian after Independence: BR Ambedkar|website=News18|access-date=2018-03-26}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.news18.com/videos/india/the-greatest-indian-ambedkar-499990.html|title=The Greatest Indian: Know all about BR Ambedkar|website=News18|access-date=2018-03-26}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.outlookindia.com/magazine/story/the-greatest-indian-after-gandhi/281103|title=The Greatest Indian After Gandhi|work=https://www.outlookindia.com/|access-date=2018-03-26}}</ref>
सर्वसामान्य माणसांनी टेलिफोन व सोशल नेटवर्किग साईटद्वारे नोंदविलेल्या मतांपैकी सर्वाधिक '''१९ लाख ९१ हजार ७३४''' मते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मिळाली आहेत. त्याखालोखाल '''१३ लाख ७४ हजार''' मते एपीजे अब्दुल कलाम यांना मिळाली आहेत. सर्वसामान्य भारतीयांच्या मनातून नेहरू चांगलेच खाली उतरले आहेत, असे सर्वेक्षणाचे निष्कर्ष सांगतात. लोकांच्या मतांमध्ये नेहरू शेवटच्या म्हणजे दहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांना अवघे ९,९२१ मते मिळाली आहेत. त्या तुलनेत त्यांची कन्या इंदिरा गांधी अधिक लोकप्रिय असल्याचे सर्वेक्षण सांगते. लोकांनी त्यांना आठवा क्रमांक दिला आहे. मार्केट रिसर्चमध्ये त्या एपीजेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://bestmediainfo.com/2012/06/history-tv18-cnn-ibn-kicks-off-nationwide-poll-for-the-greatest-indian/|title=History TV18 & CNN-IBN kick-off nationwide poll for 'The Greatest Indian'|website=www.bestmediaifo.com|access-date=2018-03-26}}</ref>
;सीएनएन-आयबीनच्या सर्वेक्षणातील मते<ref>{{Citation|last=Ambedkar Archive|title=▶ Nehru and Ambedkar: Was Ambedkar greater than Nehru and Patel {{!}}{{!}} IBN DEBATE|date=2013-01-04|url=https://m.youtube.com/watch?v=5HThcki2mDY|accessdate=2018-03-26}}</ref>
# डॉ. बाबासाहेब आंबेडकर – १९,९१,७३४.
# [[एपीजे अब्दुल कलाम]] – १३,७४,४३१,
# [[वल्लभभाई पटेल]] – ५,५८,८३५,
# [[अटलबिहारी वाजपेयी]] – १,६७,३७८,
# [[मदर तेरेसा]] – ९२,६४५,
# [[जे.आर.डी. टाटा]] – ५०,४०७,
# [[सचिन तेंडुलकर]] – ४७,७०६,
# [[इंदिरा गांधी]] – १७,६४१,
# [[लता मंगेशकर]] – ११,५२०,
# [[जवाहरलाल नेहरू]] – ९,९२१
== व्यक्तित्वाचे विविध पैलू ==
=== चित्रकार ===
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना चित्रकलेत विशेष रुची होती. "पेंटिंग ॲज अ पास्ट टाईम' या चर्चिलच्या पुस्तकाने त्यांच्यात चित्रकलेची आवड निर्माण झाली होती. बी. आर. मडिलगेकर यांच्याकडून त्यांनी चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले होते. चित्रकलेचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी अनेक पुस्तके विकत घेतली होती. चित्रे काढण्यात आणि रंगविण्यात ते तल्लीन होऊन जात असत. बाबासाहेब व्हायोलीन वाजवत.
=== शिल्पशास्त्रज्ञ ===
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबादच्या मिलिंद विज्ञान महाविद्यालयाचे वसतीगृह, कला महाविद्यालयाचे वसतीगृह व शेजारी असलेल्या मिलिंद हायस्कुल या ईमारतीचे आराखडा स्वतः बाबासाहेबांनी तयार केला होता. यासाठी त्यांनी इतर कोणी वास्तुशात्रज्ञ बोलविला नव्हता.
बाबासाहेब आंबेडकर हे शिल्पशास्त्रातही पारंगत होते. डॉ. आंबेडकर व्हाईसरॉयच्या एक्झिक्यूटीव्ह कौन्सीलमध्ये मजूरमंत्री असतांना त्यांच्याकडे (PWD) सार्वजनिक बांधकाम विभागाचे खातेही होते. तेव्हा स्वःप्रयत्नाने त्यांनी शिल्पशास्त्रात प्रावीण्य मिळविले होते. मजुरमंत्री असतांनाच एकदा त्यांनी अभियंत्यांच्या परिषदेसाठी देशभरातून आलेल्या अभियंत्यांसमोर शिल्पशास्त्रावर भाषण केले होते .
== निष्ठावंत सहयोगी ==
|