"बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
→सुरुवातीचे जीवन: 10 facts/25 facts अश्या आलेल्या बातम्या संदर्भ होऊ शकत नाहीत त्यामुळे मजकूर काढला. |
→कोलंबिया विद्यापीठ: पत्ते, अनावश्यक माहिती काढली. |
||
ओळ १०३:
[[चित्र:Dr. Babasaheb Ambedkar in Columbia University.jpg|thumb|right|कोलंबिया विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, १९१३-१६ दरम्यान]]
महाराज बडोदा संस्थान त्यांच्या वतीने काही विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्याच्या विचारात होते. महाराज [[सयाजीराव गायकवाड]] भीमरावांच्या इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वावर प्रसन्न होते. महाराजांनी, भीमरावांना होकार दिल्यामुळे ४ एप्रिल १९१३ रोजी बडोदा संस्थानच्या विद्याधिकाऱ्यांनी परदेशात अभ्यास करण्यासाठी चार विद्यार्थी निवडले, यात भीमराव आंबेडकर एक होते. या प्रत्येकास दरमहा साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यासाठी त्यांना एक करारपत्र लिहून द्यावे लागले. या करारपत्रावर साक्षीदार म्हणून त्रिभुवन जे. व्यास आणि अंताजी गोपाळ जोशी यांनी दिनांक १८ एप्रिल १९१३ रोजी सह्या केल्या. या करारानुसार शिष्यवृत्तीची मुदत १५ जून १९१३ ते १४ जून १९१६ पर्यंत एकूण तीन वर्षांची होती. त्यानंतर बोटीने प्रवास करून भीमराव आंबेडकर २० जुलै १९१३ रोजी दुपारी १२ वाजता अमेरिकेतील [[न्यूयॉर्क]] येथे पोहचले. या शहरातील [[कोलंबिया विद्यापीठ]]ामध्ये [[अर्थशास्त्र]] शाखेत त्यांनी १९१३ ते १९१६ या तीन वर्षांसाठी प्रवेश मिळवला. त्यांनी या विद्याभ्यासाकरता प्रमुख विषय [[अर्थशास्त्र]] व इतर विषय म्हणून [[समाजशास्त्र]], [[इतिहास]], [[राज्यशास्त्र]], [[मानववंशशास्त्र]] आणि [[तत्त्वज्ञान]] हे विषय निवडले
''‘भारताचा राष्ट्रीय लाभांश : इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन''’ (The National Divident of India : A Historical And Analytical Study) हा भीमराव आंबेडकरांचा पीएच.डी. साठीचा विषय होता. त्यांनी इ.स १९१३ ते इ.स. १९१७ या कालावधीत विद्याभ्यासाच्या
९ मे १९१६ रोजी कोलंबिया विद्यापीठामध्ये समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉ. ''[[ए.ए. गोल्डनवायझर]]'' यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित झालेल्या मानववंशशास्त्र या विषयावर चर्चासत्रात आपला नवीन शोधलेख वाचण्याची संधी त्यांना मिळाली. त्यानुसार [[भारतातील जाती]] : त्यांची रचना, उत्पत्ती आणि वृद्धी हा शोधनिबंध वाचून समाजशास्त्राच्या साऱ्या विद्वानांचे लक्ष वेधले. द अमेरीकन जर्नल ऑफ सोसिओलॉजी ''(American Journal of Sociology)'' या समाजशास्त्राच्या नियतकालिकामध्ये डॉ. आंबेडकरांच्या जातीवरील प्रबंधाचा निवडक भाग ‘या महिन्यातले जगातील उत्कृष्ट वाङमय’ ''(World’s Best Literature Of The Month)'' या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आला. या सन्मानार्थ कोलंबिया विद्यापीठाच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी एक मेजवानीही डॉ. आंबेडकरांना दिली. कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये सनातनी समाजरचना विरुद्ध आधुनिक समाजरचना या विषयावर मोठा खल होत असे. या परिसंवादांमध्ये डॉ. आंबेडकर भाग घेत असत. मानववंशशास्त्रांच्या शाखांमार्फत चालणाऱ्या या चर्चांमध्ये विद्वत्ताप्रचुर संशोधनात्मक प्रबंध वाचले जात होते. त्यामुळे या विषयावर खोलवर अभ्यास करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांतील सूक्ष्म ज्ञानामुळे त्यांनी जातीवरील प्रबंध लिहिताना सर्वस्वी नवीन असा सिद्धांत उभा केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/graphics/txt_zelliot1991.html|title=txt_zelliot1991|last=Pritchett|first=Frances|website=www.columbia.edu|access-date=2018-03-31}}</ref> कोलंबिया विद्यापीठात आंबेडकर [[जॉन ड्युई]] यांच्या मार्गदर्शनाखाली शिकले. आंबेडकरांच्या समता आणि सामाजिक न्यायाच्या कल्पनांनी डेव्हीही प्रभावित झाले होते. कोलंबिया विद्यापीठात प्रथमच बाबासाहेब आंबेडकरांनी 'स्वातंत्र्य, समता आणि बंधुता' तत्वांचा प्रथम अनुभव घेतला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/graphics/txt_zelliot1991.html|title=txt_zelliot1991|last=Pritchett|first=Frances|website=www.columbia.edu|access-date=2018-03-31}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.forwardpress.in/2017/05/john-dewey-pragmatism-communication-and-bhimrao-ambedkar/|title=The like-mindedness of Dewey and Ambedkar|date=2017-05-19|work=Forward Press|access-date=2018-04-01|language=en-US}}</ref> “कोलंबिया विद्यापीठातील जॉन डेव्ही, जेम्स शॉटवेल, एडविन सेलिगमन आणि जेम्स हार्वे रॉबिन्सन हे महान प्राध्यापक मला लाभले आणि येथेच आयुष्यातील अनेक चांगले मित्र येथे मिळाले.”, असे त्यांनी म्हटले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/graphics/txt_zelliot1991.html|title=txt_zelliot1991|last=Pritchett|first=Frances|website=www.columbia.edu|access-date=2018-03-31}}</ref> कोलंबिया विद्यापीठात असताना तीन वर्षाच्या काळात एक पीएचडी व दोन मास्टर पदवींसह त्यांनी ६० अभ्यासक्रमाचे (कोर्सवर्क) शिक्षण घेतले ज्यात अर्थशास्त्राचे २९ अभ्यासक्रम, इतिहासाचे ११, समाजशास्त्राचे ६, तत्त्वज्ञानाचे ५, मानववंशशास्त्राचे ४, राज्यशास्त्राचे ३, [[फ्रेंच]] आणि [[जर्मन]] विषयाचे प्रत्येकी एक.<ref>रजिस्ट्रार ऑफ कोलंबिया युनिव्हर्सिटी ऑफिस</ref> डॉ. आंबेडकरांनी ३ वर्षांसाठी मिळालेल्या शिष्यवृत्तीचा वापर करून अमेरिकेतील अभ्यासक्रम केवळ २ वर्षांतच पूर्ण केला आणि इ.स. १९१६ मध्ये लंडनला गेले.
|