"ज्ञानकोश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
{{अशुद्धलेखन}}
[[चित्र:Brockhaus Lexikon.jpg|thumb|300px|[[Brockhaus Enzyklopädie|Brockhaus Konversations-Lexicon]], 1902]]
'''ज्ञानकोश''' हे एक संदर्भसाधन असतेहा. हा कोशसाहित्याचा एक प्रकार आहे. ज्ञानकोशाच्या धोरणानुसार त्यात संबंधित विषयाची माहिती लहान, मध्यम किंवा मोठ्या लेखांच्या स्वरूपात देण्यात येते. ही माहिती संक्षिप्त स्वरूपात, साधार व वस्तुनिष्ठपणे मांडलेली तसेच ती शक्य तितकी अद्ययावत असावी असा संकेत आहे.
 
ज्ञानकोशातील अशा तऱ्हेने माहिती देणाऱ्या लेखाला नोंद अशी संज्ञा आहे. ज्ञानकोश हा अशा नोंदींचा संग्रह असतो. मात्र ह्या नोंदींच्या संग्रहाला विशिष्ट रचना असणे आवश्यक असते. ज्ञानकोशातील नोंदी विशिष्ट तार्किक क्रमाने लावण्यात येतात. हा क्रम विषयानुसार, कालक्रमानुसार, नोंदींच्या शीर्षकांनुसार अकारविल्हे इ. विविध प्रकारचा असू शकतो. परस्परांशी संबंध असलेल्या नोंदींतील संबंध दाखवण्याची काही एक योजना ज्ञानकोशाच्या रचनेत सामान्यतः केलेली असते. त्यामुळे एका नोंदीचा दुसऱ्या नोंदीशी असलेला संबंध स्पष्ट होणे सुकर होते. एखाद्या विषयाची तोंडओळख करून घ्यायला ज्ञानकोश हे उत्तम साधन आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/ज्ञानकोश" पासून हुडकले