"सरोजिनी बाबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो संदर्भ
ओळ ३८:
स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा प्रगाढ अभ्यास त्यांनी त्यांच्या आयुष्यभर केला. लोकसाहित्याचे अतिशय उत्तम प्रकारे संशोधन, संपादन आणि संकलन करून या संस्कृतीचा फार मोठा ठेवा त्यांनी महाराष्ट्राला कायमचा उपलब्ध करून दिला आहे.
 
सरोजिनी बाबर या महाराष्ट्र विधानसभा (१९५२-५७), महाराष्ट्र विधानपरिषद (१९६४-६६) व भारतीय राज्यसभा (१९६८-१९७४) या सभागृहांच्या सदस्या होत्या. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांनी दुर्मीळ आणि अप्रकाशित लोकसाहित्य संकलित केले आणि ’लोकसाहित्य शब्दकोश’ आणि ’भाषा व संस्कृती’ या पुस्तकांमधून प्रकाशित केले. "समाज-शिक्षण माला" हे मासिक त्यांनी अनेक वर्षे चालवले. त्यांची भाषा शैली सोपी आणि प्रत्यक्ष संवाद करणारी अशी होती.<ref>{{स्रोत पुस्तक|title=१०१ कर्तुत्ववान स्त्रिया|last=कर्वे|first=स्वाती|publisher=उत्कर्ष प्रकाशन|year=२०१४|isbn=978-81-7425-310-1|location=पुणे|pages=१०३}}</ref>
 
महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री बाळासाहेब देसाई यांनी यशवंतराव चव्हाणांच्या सल्ल्याने सुरू केलेल्या महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीवर सरोजिनी बाबर यांनी सभासद म्हणून काम केले. सुरुवातीला श्री [[चिं.ग. कर्वे]] अध्यक्ष होते. त्यानंतर डॉ.सरोजिनी बाबर यांची या समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. हे काम त्यांच्या अतिशय आवडीचे आणि जबाबदारीचे होते. लोकसाहित्य, लोककला आणि एकूणच लोकजीवनाच्या अभ्यासाचे क्षितिज आणखी विस्तारले. समितीने महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागातल्या लोक वाङ्मयाचा खूप मोठा संग्रह केला. यात ओव्या, गीते, कथा, कहाण्या, म्हणी, खेळगाणी, उखाणे मोठ्या प्रमाणात समाविष्ट आहेत. महाराष्ट्रातील देवधर्माची, सण-उत्सवांची, रीतीरिवाजांची, अनेक कलांची माहिती आहे.
ओळ १९३:
* १२ एप्रिल १९९६ ला र.ना.चव्हाण प्रतिष्ठानतर्फे विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार दिला गेला .
* २७ डिसेंबर १९९६ ला साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे सरोजिनी बाबर यांचा फोटो महाराष्ट्र साहित्य परिषदेत लावण्यात आला.
 
==संदर्भ==
 
{{मराठी साहित्यिक}}