"अंत्येष्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दुवा
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
ओळ १:
 
माणसाच्या मृत्यूनंतर केले जाणारे दाहकर्म व [[श्राद्ध]] हे संस्कार [[हिंदू]] जीवनशैलीत प्रचलित आहेत. दिवंगताविषयी आस्था, प्रेम, सद्भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून [[दशक्रिया|दाहकर्म]] व श्राद्ध या विधींकडे पाहिले पाहिजे असे वाटते. 
 
भारतीय संस्कृतीचे मूलाधार असणा-या [[वैदिक]] साहित्यात मृत्यूनंतर केल्या जाणार्‍या दहनाचे व दफनविधीचे संदर्भ आढळतात. दहनप्रसंगी म्हटल्या जाणा-र्‍या प्रार्थनेत मृत शरीराला स्वतःमध्ये सामावून घेण्याची विनंती अग्नीला केली आहे. 
 
[[ब्रह्म पुराण|ब्रह्म पुराणात]]ात असा उल्लेख सापडतो की जी व्यक्ती खोटे बोलत नाही, जी [[आस्तिक]] वृत्तीची आहे, जी देवपूजा परायण आहे, जी ब्राह्मणाचा सत्कार करते, जी कृतघ्नपणे वागत नाही, जी कोणाची [[ईर्ष्या]] करीत नाही अशा व्यक्तीला सुखावह मृत्यू येतो.(२१४.३४-३९)<ref>धर्मशास्त्राचा इतिहास-डॉ. [[पां.वा. काणे]]</ref>
 
भारतीय [[तत्त्वज्ञान]] असे मानते की मृत्यूच्या वेळी व्यक्तीच्या मनात जे विचार येतात त्यानुसार त्या व्यक्तीला पुढचा जन्म मिळतो. त्यामुळे [[देव|परमेश्वर]] सन्निध असण्यासाठी अशा वेळी ओं नमो भगवते वासुदेवाय | असा जप करावा से सांगितले जाते. गीतेमध्ये श्रीकृष्णाने असे सांगितले आहे की जी व्यक्ती अंतकाळी माझे स्मरण करते ती मृत्यूनंतर माझ्यापाशी येते. उत्तरायणात आलेला मृत्यू हा पुण्यकारक मानला जातो असेही [[भगवद्‌गीता|गीतेत]] सांगितले गेले आहे.<ref>धर्मशास्त्राचा इतिहास-डॉ. [[पां.वा. काणे]]</ref>
 
दिवंगत व्यक्तीच्या शरीराचे दहन व्यवस्थितपणे व्हावे. जे तपाच्या योगाने अजिंक्य झाले, उच्च पदाला पोहोचले अशा थोर लोकांकडे दिवंगताने गमन करावे असेही अग्नीला सांगितले जाते.. आपण मृत झालेल्या अचेतन शरीराला प्रेत असे सामान्यत: संबोधतो. प्रेत म्हणजे अपवित्र असा अर्थ नसून  प्र+ इत म्हणजे जो या लोकाच्या (पृथ्वीलोकाच्या) पलीकडे गेला आहे असा.  त्यामुळे '''दिवंगत व्यक्तीच्या अचेतन शरीराची योग्य ती व्यवस्था करीत असताना त्यामध्ये मनात पवित्र भाव आणि दिवंगताविषयी आदरभाव असावा.''' 
Line १२ ⟶ ११:
एके काळी अंत्येष्टीत (मरणानंतर केलेल्या जाणार्‍या संस्कारात) पाळल्या जाणार्‍या काही जुन्या हिंदू प्रथा :
 
द्वि व त्रि [[पुष्कर योग]], [[पंचक]], इत्यादी [[कुयोग]] टाळून त्यानुसार, संमतविधी करून मृताचा [[दहनविधी]] करावा. वर्ज्य वार व वर्ज्य नक्षत्रे टाळून [[अस्थिसंचय]] करावा. त्यानंतर दहा दिवसांच्या आंत, अस्थी तीर्थात नेऊन विसर्जित कराव्यात. नंतर यथाकाल [[श्राद्ध|श्राद्धविधी]]विधी करावा.
 
अन्त्येष्टी संस्कारामध्ये [[यम]] देवतेची स्तुती केली जाते. यमाला विनंती केली जाते की दिवंगताचे दहन व्यवस्थित पूर्ण होवो. त्याचे चर्म होरपळून टाकू नकोस. या दिवंगताला तू त्याच्या पितरांकडे ने. आमच्या कन्या-पुत्र यांना अयोग्यवेळी (लहान वयात) तू मारू नकोस आणि आमच्यावर कृपादृष्टी ठेव.
Line १८ ⟶ १७:
गरुड पुराणात सांगितले आहे की शव उचलण्यापूर्वी घरात एक पिंड द्यावा. शवयात्रा सुरु करण्यापूर्वी दरवाजात दुसरा पिंड द्यावा. शवयात्रा चौकात आल्यावर एक पिंड द्यावा. स्मशानात विसाव्याच्या ठिकाणी एक पिंड द्यावा आणि चितास्थानी एक पिंड द्यावा, असे एकूण पाच पिंड द्यावेत. त्यानंतर दहनाचा विधी करावा. त्यावेळी पवित्रीकरण, प्राणायाम, संकल्प, जानव्याचे अपसव्य, यमाला नमस्कार, यमाची स्तुती, स्मशानभूमीची प्रार्थना, स्मशानातीला जलाची प्रार्थना, भूमिप्रोक्षण, अग्निस्थापना, रेखाकरण, चितीकरण, सूक्त पिंडदान (प्रेताच्या कपाळ, मुख,हात व पाय या ठिकाणी सातूचे पिंड ठेवणे, शवाला पाणी पाजणे, अग्निसंस्कार, [[अग्नी]], [[पितर]] व मृताला प्रार्थना, घटाचा स्फोट, अप्रदक्षिणा, [[तिलांजली]] असे सर्व विधी केले जातात.<ref>अंतिमा-चंद्रकांत बारहाते</ref>
 
== बाह्य दुवे ==
* http://www.santrika.org/
 
== संदर्भ ==
# सुलभ जोतिष शास्त्र- लेखक ज्योतिराचार्य कृष्णाजी विठ्ठल सोमण
# [[ज्ञान प्रबोधिनी|ज्ञान प्रबोधिनी,पुणे]] प्रकाशित दाहकर्म संस्कार पोथी
 
{{सोळा संस्कार}}
 
[[वर्ग:सोळा संस्कार]]
[[वर्ग:लाल दुवे असणारे लेख]]