'''अंगठी''' [[हात|हाताच्या]]ाच्या बोटांत घालायचा [[दागिना]] आहे.पुरातन काळापासून आपल्या देशात अंगठ्या घालताची चाल आहे. पुरुष आणि स्त्रिया, दोघेही अंगठी धारण करू शकतात. सहसा अंगठ्या सोने, चांदी, प्लॅटिनम, इ. मौल्यवान धातूंच्या असतात. अंगठ्या वळ्यांसारख्या गोलाकार किंवा एका बाजूस सपाट पृष्ठभाग आणि नक्षी असलेल्या असतात. अनेकदा या सपाट पृष्ठभागावर कोंदण करून त्यात मौल्यवान खडेही बसविले जातात. अंगठीच्या पृष्ठभागावरील नक्षीमध्ये स्वतःची ओळख पटविणारी चिह्ने घालून त्याचा उपयोग मोहोर किंवा शिक्का म्हणून होत असे.<ref>http://www.marathivishwakosh.in/index.php?id=861 मराठी विश्वकोश</ref>
== इतिहास ==
श्राद्धाच्या वेळी यजमान दर्भाची पवित्रके घालतो. त्यासुद्धा एक प्रकारच्या अंगठयाच असे म्हटले पाहिजे.कित्येक धार्मिक लोक आपल्या बोटांत विशिष्ट प्रकारची गाठ असलेले सोन्याचे पवित्रक कायमचे घालून ठेवतात.तजंनीत (अंग्ठ्या जवळील बोट) सोन्याच्या अंगठी घालावी व अनामिकेत (करंगळीजवळ बोट) रुप्याची अंगठी घालाव,असा धार्मिक संकेत आहे.<ref>भारतीय संस्कृती कोष खंड १</ref>
== प्रकार ==
संस्कुत साहित्यात अंगठीचे अनेक प्रकार पुढीलप्रमाणे वर्णिलेले आह द्विहीरक - दोन बांजूस दोन हिरे व मध्ये पाचूचे खडा मिळून बनविलेली अंगठी.
# त्रिहीरक - मध्ये मोठा हिरा व दोन बांजूस दोन लहान हिरे अशी बनवलेली अंगठी.