"शकुंतला परांजपे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ५४:
 
'''शकुंतलाबाई परांजपे''' यांचा जन्म १७ जानेवारी १९०६ रोजी झाला. प्राथमिक शिक्षण घरीच झाले. माध्यमिक शिक्षण पुण्याच्या '''हुजूरपागा''' शाळेत झाले. मॅट्रीक झाल्यानंतर [[फर्ग्युसन महाविद्यालय|फर्ग्युसन महाविद्यालयातून]] बी. एस्सी. झाल्या. वडिलांसारखे त्यांना [[रँग्लर]] व्हायचे होते. त्यासाठी १९२६ मध्ये शकुंतलाबाई परांजपे इंग्लंडला गेल्या.
केंब्रिज येथे न्यू हॅम कॉलेज मधून त्या गणितात एम. ए. झाल्या. [[पॅरिस]] आणि [[कोलोन]] येथे जाऊन त्या फ्रेंच आणि जर्मन भाषाही शिकल्या. गणितातली अवघड [[ट्रायपास]] पदवी त्यांनी प्राप्त केली. महाराष्ट्रातील समाजसेविका होत्या. त्यांनी भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, कुटुंबनियोजनाचा पुरस्कार केला. त्यांनी [[केंब्रिज विद्यापीठ|केंब्रिज विद्यापीठातून]] गणितात अधिस्नातक पदवी मिळवली होती. त्यांनी १० वर्षे [[युरोप|युरोपमध्ये]] राहून '''जिनेव्हा इंटरनॅशनल लेबर ऑफिस''' मध्ये काम करून अनुभव मिळविला. कुटुंब नियोजनाच्या पहिल्या प्रचारक, शिक्षणतज्ज्ञ, लेखिका, आमदार, खासदार, उत्तम वक्त्या, परखड व स्वतंत्र विचारांच्या विचारवंत, अशा विविध व्यक्तीमत्व असलेल्या शकुंतलाबाई परांजपे होत. [[व्ही. शांताराम|व्ही शांताराम]] यांच्या [[कुंकू (चित्रपट)|कुंकू]] चित्रपटात सुद्धा शकुंतलाताईनी काम केले होते. <ref>{{स्रोत पुस्तक|title=१०१ कर्तुत्ववान स्रिया|last=कर्वे|first=स्वाती|publisher=उत्कर्ष प्रकाशन|year=२०१४|isbn=978-81-7425-310-1|location=पुणे|pages=१२५}}</ref>
 
== व्यक्तिगत माहिती ==
त्यांचे वडील [[रँग्लर परांजपे]] हे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते. आई मॅट्रीक (संस्कृतमध्ये) प्रथम आलेल्या होत्या. त्यामुळे घरात वातावरण बौद्धिक , उच्चशिक्षित, वाचन, व्यासंगाने परिपूर्ण होते. [[सई परांजपे]] ही त्यांची कन्या आहे. आपल्या आईच्या जीवनावर सई परांजपे यांनी पस्र्वेशन हा लघुपट बनविला. शकुंतलाबाई परांजपे या लेखिकाही होत्या. यांनी काही पुस्तके आणि नाटकेही लिहिली आहेत.
 
युरोपमध्ये काम करत असतांना त्यांचा युरा या रशियन चित्रकाराशी परिचय झाला आणि मग लग्न झाले. दीड वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेतला आणि लहान मुलीसह त्या भारतात परतल्या.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/vishesh-news/shakuntala-paranjpe-349727/|title=एकमेवाद्वितीय! माझी आई.. शकुंतला परांजपे|last=परांजपे|first=सई|date=१७ जानेवारी २०१४|work=लोकसत्ता|access-date=४ जुलै २०१८|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref> [[सई परांजपे]] ही त्यांची कन्या आहे. आपल्या आईच्या जीवनावर सई परांजपे यांनी पस्र्वेशन हा लघुपट बनविला. शकुंतलाबाई परांजपे या लेखिकाही होत्या. यांनी काही पुस्तके आणि नाटकेही लिहिली आहेत.
 
==लेख==