"प्रीतिलता वड्डेदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

भारतीय महिला स्वातंत्र्यवीर
Content deleted Content added
नवीन पान: '''प्रीतिलता वड्डेदार''' (जन्मः ५ मे १९११, मृत्युः २३ सप्टेंबर १९...
(काही फरक नाही)

१२:३०, २९ जून २०१८ ची आवृत्ती

प्रीतिलता वड्डेदार (जन्मः ५ मे १९११, मृत्युः २३ सप्टेंबर १९३२) या एक आघाढीच्या महिला क्रांतीकारक होत्या. त्यांचा जन्म अखंड हिंदुस्थानातील चित्तगांव जवळील ढोलघाट या गावी झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव जगबंधू वड्डेदार व आईंचे नाव प्रतिभा वड्डेदार होते.

सुरुवातीचे जीवन

लहानपणापासूनच प्रीतिलता पुराणातील दुर्गा, इतिहासातील जिजाबाई, राणी पद्मिनी, राणी चेन्नमा, राणी लक्ष्मीबाई इत्यादी वीरांगनींच्या गोष्टी एेकून प्रेरित झाल्या होत्या. त्यांच्या मनात आपणही देशासाठी काहीतरी करावे अशी भावना लहानपणापासूनच निर्माण झाली होती.

इ.स. १९२७ मध्ये त्या विषेश प्राविण्य प्राप्त करून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर त्यांनी कोलकत्याला काॅलेज मध्ये प्रवेश घेतला. काॅलेजमध्ये असतानाच त्यांनी कल्पना दत्त, कमला मुखर्जी, रेणू रे या मैत्रिणींसह हिंदूस्थान रिपब्लिकन आर्मी चे सदस्यत्व स्वीकारले. इ.स. १९३० त्या बी.ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या.

क्रांतीकार्य

ढोलघाटला परतून प्रीतिलतांनी नंदनकानन शाळेची मुख्याध्यापिका म्हणून पदभार स्वीकारला. पुढे हिंदूस्थान रिपब्लिकन आर्मी मधील त्यांचे सहकारी सूर्यसेन यांनी त्यांच्यावर इंग्रज अधिकाऱ्यांच्या क्लबवर हल्ला करण्याची जबाबदारी सोपवली. ४ सप्टेंबर १९३२ ला रात्री ९.३० वाजता प्रीतिलता आणि इतर सात सहकाऱ्यांनी पहाडतळी रेल्वेस्टेशनजवळील क्लबमध्ये एकत्रित झालेल्या इंग्रज अधिकाऱ्यांवर हल्ला केला. त्यांनी १५ अधिकाऱ्यांना यमसदनी पाठविले आणि त्या क्लबच्या इमारतीवर बॅाम्ब टाकून तेथील शस्त्रसाठा उध्वस्त केला. स्वीकारलेले कार्य पूर्णत्वास नेणाऱ्या पुरुषी वेशातील प्रीतिलताने त्यानंतर स्वतः सायनाईड प्राशन करून आत्मबलिदान केले.