"दंडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
गल्लत
ज यांनी केला प्रताधिकार भंग
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
{{गल्लत|दण्डी}}
{{प्रताधिकारित मजकूर शंका
दंडी हा संस्कृतमधील एक महान लेखक आणि कवी समजला जातो.
| कॉपीव्हायो-वृत्तांत=https://tools.wmflabs.org/copyvios?lang=mr&project=wikipedia&oldid=1535128&action=compare&url=https%3A%2F%2Fmaharashtratimes.indiatimes.com%2Feditorial%2Fsamwad%2Fkavya%2Farticleshow%2F48625513.cms
| मजकूर =दंडी हा संस्कृतमधील एक महान लेखक आणि कवी समजला जातो.
 
'अवंतीसुंदरी' कथा व 'अवंतीसुंदरीकथासार' या ग्रंथांवरून त्याच्या चरित्राची काही माहिती मिळते. त्याच्या प्रपितामहाचे नाव दामोदर, पितामहाचे नाव मनोरथ, पित्याचे नाव वीरदत्त तर, आईचे नाव गौरी असे होते. तो कांची येथील पल्लवांच्या राजसभेतील कवी होता. महाकवी भारवी दक्षिण भारतातील कांचीपूर नगरीतील सिंहविष्णू नावाच्या पल्लव राजाच्या राजसभेत होता. भारवीला तीन मुलगे झाले त्यातील मनोरथ नावाच्या मुलाला वीरदत्त नावाचा पुत्र झाला. वीरदत्ताची पत्‍नी गौरी. वीरदत्त आणि गौरी यांच्या पोटी प्रसिद्ध कवी दंडी याचा जन्म झाला. यावरून कवी दंडी हा महाकवी भारवीचा पणतू आहे, हे लक्षात येते. तीच भारवीच्या काव्याची परंपरा दंडीला लाभली. अभ्यासकांच्या मते तो इ. स. ६०० च्या सुमारास होऊन गेलेला असावा.
Line १३ ⟶ १५:
 
'त्रयो दण्डिप्रबन्धाश्च' यासारख्या वचनांमधून दंडीने तीन ग्रंथ लिहिले आहेत, असे सांगितले जाते. परंतु काव्यदर्श आणि दशकुमारचरित याशिवाय वरील संदर्भानुसार नेमका तिसरा कोणता ग्रंथ दंडीचा हे सांगता येणे अवघड आहे. त्याने आपल्या ग्रंथांत महाराष्ट्रीय प्राकृताची स्तुती केली आहे. वैदर्भी ‌रीतीला श्रेष्ठ मानले आहे. आपल्या काव्यात त्याने आंध्र, चोळ, कलिंग व विदर्भ या दक्षिणेतील देशांचे विपुल वर्णन केले आहे. त्याच्या काव्यात कावेरी नदीचा व दक्षिणी चालीरीतीचा वारंवार उल्लेख येतो. यावरून विद्वानांनी असा निष्कर्ष काढला आहे, की दंडी हा दाक्षिणात्य कवी होता.
}}
 
 
==त्रयो दण्डिप्रबन्धाश्च==
"https://mr.wikipedia.org/wiki/दंडी" पासून हुडकले