"केतकी मोडक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखन- नियमानुसार बदल केले, आणि मजकूरामध्ये भर घातली.
Added External Links
ओळ ७:
प्रा.डॉ. केतकी मोडक पुण्यातील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी च्या गरवारे वाणिज्य महाविद्यालयात मराठी भाषेचे अध्यापन करतात. या महाविद्यालयात त्या उपप्राचार्य या पदावरही त्या कार्यरत आहेत. त्या 'महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी'च्या नियामक मंडळाच्या त्या सदस्य आहेत.
 
श्रीअरविंद सोसायटी, पुडुचेरी येथून प्रकाशित होणाऱ्या [http://abhipsamasik.blogspot.com/ 'अभीप्सा' (Aspiration towards Divine)] या मासिकाच्या त्या संपादक आहेत.
 
==लेखन==
इ.स. २००५ साली प्रथम प्रकाशित [[iarchive:KadkadoniVijNimaleeThayeecheThayee|'कडकडोनी वीज निमाली ठायींचे ठायी. संत मुक्ताबाई : व्यक्ती आणि वाङ्‍‍मय']] या संशोधन ग्रंथात [[संत मुक्ताबाई|संत मुक्ताबाईंच्या]] जीवनचरित्र, कार्यकर्तृत्व, त्यांचे वाङमय, आणि इतर समकालीन व उत्तर कालीन मराठी संतांवरील प्रभाव यांचा शोध घेतला आहे. संत मुक्ताबाईंना नेमके कोणते गोरोबा भेटले आणि गोरोबांना भेटलेल्या मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर भगिनी संत मुक्ताबाई या व्यक्ती दोन की एकच या विषयाचाही या ग्रंथाच्या माध्यमातून शोध घेतला गेला आहे. संत मुक्ताबाईंच्या समग्र अभंगांचा अर्थ प्रथमच या ग्रंथाच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिला गेला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=5182967898442406387&PreviewType=books|title=Kadakadoni Veej Nimali Thayinche Thayi|website=www.bookganga.com|access-date=2018-04-25}}</ref> या ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद, पुणे नगर वाचन मंदिर, संगमनेर इतिहास संशोधन मंडळ, ज्ञानप्रबोधिनी निगडी या संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
 
या ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद, पुणे नगर वाचन मंदिर, संगमनेर इतिहास संशोधन मंडळ, ज्ञानप्रबोधिनी निगडी या संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
 
Principles of Integral Education and its possible implementation in existing educational system या विषयावर त्यांनी विद्यापीठ अनुदान मंडळाद्वारे मिळालेल्या अनुदानातून लघु संशोधन प्रकल्प सादर केला आहे.