"समर्थ रामदास स्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ १८०:
[[File:Ramdas aarati.jpg|thumb|श्री लवथवेश्वराचे पूजन]]
 
समाजाविषयीच्या अपार तळमळीतून समर्थांनी विपुल वाङ्‌मय निर्मिती केली. रोखठोक विचार, साधी सरळ भाषा आणि स्पष्ट निर्भीड मांडणी ही त्यांची वैशिष्ट्ये होती. [[दासबोध]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://web.bookstruck.in/book/show?id=90|title=दासबोध|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref>, [[मनाचे श्लोक]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://web.bookstruck.in/book/show?id=89|title=मनाचे श्लोक|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref>, [[करुणाष्टके]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://web.bookstruck.in/book/show?id=225|title=करुणाष्टके|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref>, [[मारुति स्तोत्र|भीमरूपी स्तोत्र]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://web.bookstruck.in/book/show?id=1128|title=भीमरूपी स्तोत्रे|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref>,अनेक आरत्या उदाहरणार्थ 'सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची' ही [[गणपती|गणपतीची]] आरती, 'लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा' ही [[शंकर|शंकराची]] आरती, कांही पदे इत्यादि त्यांच्या लेखनकृती प्रसिद्ध आहेत. [[समर्थ रामदास स्वामींच्या आरत्यांनी]] घरांघरांत स्थान मिळवले आहे 'युगे अठ्ठावीस विटेवरी उभा' ही संत नामदेवांनी लिहिलेली आरती प्रसिद्ध आहे. याचा अर्थ नामदेवांच्या काळात देवांच्या आरत्या मंदिरात म्हटल्या जात होत्या. पुढे मोगलांच्या आक्रमणामुळे देवांचे उत्सव बंद पडले, अनेक मंदिरे उद्ध्वस्त झाली. त्यामुळे आरती वाङ्‌मय जनमानसाच्या स्मृतीतून नाहीसे झाले.... समर्थांनी या वाङ्‌मयाचे पुनरुज्जीवन केले. आपण ज्या विविध आरत्या म्हणतो, त्यांपैकी अनेक समर्थ रामदासांनी लिहिल्या आहेत. मोरगावला गणपतीच्या दर्शनाला गेले असताना तेथील पुजार्‍याला आरती येत नाही हे पाहून त्यांनी 'सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची' ही गणपतीची आरती केली. तुळजापूरची भवानी माता ही तर समर्थांची कुलस्वामिनी. तिचे दर्शन घेतांना समर्थांना 'दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी' ही आरती स्फुरली. 'सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी' ही मारुतीची आरती म्हणताना तर अंगात वीरश्रीचा संचार होतो.
 
समर्थांनी शंकराची आरती लिहिली, त्याची कथा मोठी गमतीशीर आहे. तीर्थयात्रा करताना समर्थ जेजुरीला आले. तिथे खंडेरायाचे दर्शन घेऊन ते लवथेश्वराला आले.जो कोणी मंदिरात झोपतो तो रात्रीच मरण पावतो, अशी या मंदिराची ख्याती होती.हे कळल्यावर समर्थांनी मुद्दाम मंदिरातच झोपायचे ठरवले. ग्रामस्थांनी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला पण समर्थ तसे जिद्दी होते. सकाळी ग्रामस्थांनी मंदिरात भीत भीतच प्रवेश केला. पाहतात तर काय ! समर्थ भगवान लवथेश्वराची पूजा करीत होते. त्याच वेळी 'लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा' या प्रसिद्ध आरतीची निर्मिती झाली. समर्थांनी खंडेराया, दत्तात्रय, विठ्ठल, श्रीकृष्ण, दशावतार अशा विविध देवांच्या आरत्या केल्या आहेत.