"मदनलाल धिंग्रा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
 
[[भारतीय]] स्वातंत्र्य-चळवळीतील एक थोर [[हुतात्मा]]. त्यांचा [[जन्म]] [[अमृतसर]] येथे उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील एक ख्यातनाम [[डॉक्टर]] होते आणि बंधू [[बॅरिस्टर]] होते. मदनलालांचे शिक्षण अमृतसरला झाले. ते [[पंजाब]] विद्यापीठातून बी. ए. झाले व १९०६ मध्ये उच्च शिक्षणासाठी [[इंग्लंड]]ला गेले. तत्पूर्वी विद्यार्थिदशेतच त्यांचा [[विवाह]] झाला. इंग्लंडमध्ये त्यांनी [[स्थापत्य अभियांत्रिकी]]चा अभ्यास केला. तेथील वास्तव्यात त्यांचा [[स्वातंत्र्यवीर सावरकर]], [[श्यामजी कृष्णवर्मा]], [[हरदयाळ शर्मा]] वगैरे क्रांतिकारकांशी स्नेह जमला. ते [[होमरूल लीग]] व सावरकरांच्या अभिनव [[भारत]] या संस्थांचे सभासद झाले. त्यांच्या भावनाप्रधान मनावर [[खुदिराम बोस]] व [[कन्हैयालाल]] या क्रांतिवीरांच्या बलिदानाचा फार मोठा परिणाम झाला. सशस्त्र क्रांतिवीरास साजेसे शिक्षण त्यांनी घेतले. पुढे त्यांनी भारतमंत्र्याचा स्वीय साहाय्य्क कर्नल विल्यम कर्झन वायली याच्या खुनाचा कट केला. त्यांचा पहिला बेत फसला. पुढे १ जुलै १९०९ रोजी इंपीरियल इन्स्टिट्यूटच्या जहांगीर हाउसमध्ये [[इंडियन नॅशनल असोसिएशन]]च्या सभेच्या वेळी त्यांनी कर्झन वायली यावर गोळ्या झाडल्या; त्या वेळी कोवास लालाकाका हाही मध्ये आला. दोघेही मरण पावले. मदनलाल यांना अटक होऊन [[फाशी]]ची शिक्षा देण्यात आली. पेन्टोनव्हिल (लंडन) तुरुंगात ते ‘भारत माता की जय’च्या उद्‌घोषात फाशी गेले.
 
==नाटक==
मदनलाल धिंग्रा आणि सावरकर यांच्या जीवनावर मराठीत 'चॅलेंज' नावाचे नाटक आले आहे. पहिले दहा प्रयोग मोफत किंवा 'नाटक पाहा आणि आवडेल तेवढे पैसे द्या' या तत्त्वावर आहेत.
 
[[चित्र:Madanlal.jpg]]