"ख्रिस्तजन्म तारीख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो अभय नातू ने लेख ख्रिस्ताचा जन्म नक्की कधी झाला वरुन ख्रिस्तजन्म तारीख ला हलविला: शीर्षकलेखन संकेत
बदल साचा
ओळ १:
{{बदल}}
'''येशु ख्रिस्ताचा जन्म नक्की कधी झाला ?'''
 
नाताळ हा ख्रिस्ती धर्मियांचा महत्वाचा सण असला तरी ख्रिस्ती धर्माच्या संस्थापनेनंतर बरीच वर्ष हा सण साजरा करण्याची प्रथा पडली नव्हती. मानवमुक्तीसाठी ख्रिस्ताने स्वीकारलेला मृत्यू आणि त्याचे पुनरुज्जीवन या घटनांना पूर्वी अधिक प्राधान्य देण्यात येत होते. म्हणून त्या घटनांचे सण अधिक महत्वाचे गणले जात. ख्रिस्ताच्या पुनरुज्जीवनाचा म्हणजेच इस्तरचा सण तर अगदी प्रारंभापासून साजरा केला जात होता. रविवार हा प्रभूचा दिवस म्हणून साप्ताहिक इस्तर म्हणून साजरा केला जाई. मात्र नाताळ म्हणजे ख्रिस्तजन्माचा सण साजरा केला जात नव्हता. ख्रिस्ताच्या मृत्युनंतर जवळजवळ १०० वर्षांनी ख्रिस्तजन्माचा सणसाजरा करण्याची कल्पना पुढे आली. तरी फार थोड्या ठिकाणी हा सण साजरा होऊ लागला. चवथ्या शतकानंतरच साऱ्या ख्रिस्ती जगतात हा सण साजरा होऊ लागला. आणि इसवी सन ५३४ मध्ये सार्वजनिक रजेत याचा समावेश केला गेला.