"क्युबन क्रांती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ २:
'''क्युबन क्रांती''' ({{lang-es|Revolución cubana}}) ही [[क्यूबा]] देशामध्ये [[फिडेल कॅस्ट्रो]]ने [[हुकुमशहा]] [[फुल्गेन्स्यो बतिस्ता]]च्या विरूद्ध चालवलेली एक लष्करी चळवळ होती.
 
मार्च १९५२ मध्ये माजी राष्ट्राध्यक्ष [[फुल्गेन्स्यो बतिस्ता]] ह्याने एका लष्करी बंडामध्ये क्यूबाची सत्ता बळकावली व तेथे आपली [[हुकूमशाही]] प्रस्थापित केली. त्याच्या कम्युनिस्टविरोधी धोरणांमुळे बतिस्ता [[अमेरिका|अमेरिकेचा]] पाठिंबा मिळवण्यात यशस्वी झाला परंतु क्यूबाच्या जनतेमध्ये त्याच्याविरुद्ध असंतोष पसरू लागला. फिडेल व [[राउल कॅस्ट्रो]] या दोघांनी एक लहान फौज तयार करून बतिस्ताच्या सैन्याशी गनिमी काव्याने लढा देण्याचे प्रयत्‍न सुरू केले. सुरूवतीला त्यांना बरेचदा अपयश आल्यानंतर त्यांनी [[मेक्सिको]]मध्ये पळ काढला व तेथून हा लढा चालू ठवला. १ जानेवरी १९५९ रोजी बतिस्ताने [[डॉमिनिकन प्रजासत्ताक]]मध्ये पलायन केले. फिडेल कॅस्ट्रोच्या सेनेने संपूर्ण क्यूबावर ताबा मिळवून सशस्त्र लढा संपुष्टात आणला. तेव्हापासून ते थेट २००६ सालापर्यंत क्यूबाची सूत्रे फिडेल कॅस्ट्रोच्या हातात राहिली.
 
२६ जुलै १९५३ ते १ जानेवारी १९५९ दरम्यान चाललेल्या ह्या चळवळीची परिणती बतिस्ताची सत्ता उलथवण्यात झाली. फिडेल कॅस्ट्रोने स्थापन केलेली ''२६ जुलै चळवळ'' ह्या संस्थेचे कालांतराने क्यूबा [[कम्युनिस्ट पक्ष]] ह्या [[साम्यवाद]]ी संघटनेमध्ये रूपांतर झाले.