"पक्षी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ १०३:
पक्षीनिरीक्षणासाठी जंगलात जावे लागते असे नाही. आपल्या घराजवळशहरी बगिच्यात,रहदारीच्या रस्त्यावर सुद्धा पक्षी असतात. अर्थात प्रत्येक ठिकाणी त्यांची विविधता कमी अधिक प्रमाणात असते. त्यामळे आपणास जमेल तसे पक्षीनिरीक्षणास सरुवात करता येते.खूप दूरच्या ठिकाणी जाणे शक्य नसल्यास आपल्या परिसरातील मोजक्या पक्ष्यांची वर्तणूक अधिक सखोल निरीक्षणे नोंदवून ठेवावीत. त्यामुळे आपल्याला पक्ष्यांच्या जीवनात डोकावून
बघता येईल. कुठल्याही गावाच्या, खेड्याच्या बाहेर असलेले माळरानझुडूपी जंगल, नदी नाले कितीतरी प्रजातीच्या पक्ष्यांचा अधिवास असते. अशा ठिकाणी पक्षीनिरीक्षणाला गेल्यास वेळ सत्कारणी लागतो.
 
'''पक्षी निरीक्षणाला कधी जावे'''
 
बहुतेक प्रजातीचे पक्षी (दिवाचार) सकाळी व सायंकाळी जास्त क्रियाशील असतात. त्यामुळे सकाळी व सायंकाळी पक्षी निरीक्षणाला सल्यास जास्त गतिविधि बघायला मिळते. पक्ष्यांचे गायन, उदा. दयाळ (Oriental Magpie Robin ), नाचण (Fantail), भूकस्तूर (Grounthrush), शामा (Shama), कोकीळ ऐकायचे असतील तर मात्र सूर्योदयापूर्वी इच्छित स्थळी पोचने पाहिजे. काही पक्षी मात्र सायंकाळी व रात्री कार्यशील (निशाचर) असतात, उदा. घुबड, पिंगळारातवा, करवानक (Stone-Curlew or Thick-knee). हे पक्षी बघायचे असतील, त्यांचे आवाज ऐकायचे असतील मात्र सायंकाळी अथवा रात्री बाहेर पडायला हवे. हिवाळ्यात आपल्या देशात अनेक प्रजातीचे पक्षी स्थलांतर करून येतात. पावसाळ्यात व उन्हाळ्यात अनेक स्थानिक पक्षी वीण करतात. त्यामुळे तिन्ही ऋतू पक्षी निरीक्षण करायला चांगले असतात.
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पक्षी" पासून हुडकले