"विकिपीडिया:तटस्थ दृष्टीकोन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
 
ओळ ९४:
विकिपीडिया असे कित्येक विषय हाताळतो, ज्यांच्यावर जगात तसेच ज्ञानकोशाच्या संपादकांमध्ये तीव्र वादविवाद असतात. विकिपीडियाचा सर्वच विषयांबाबत निष्पक्षपाती दृष्टिकोण ठेवण्याचा प्रयत्न असतो, तरी अशा विषयांबाबत तो अधिक गरजेचा असतो.
 
=====अतिरेकी सिद्धांत आणि ढोंगी विज्ञान====
ढोंगी वैज्ञानिक सिद्धांत त्यांच्या समर्थकांकडून विज्ञान म्हणून मांडले जातात, पण ते विज्ञानाच्या प्रमाणांमध्ये आणि निकषांमध्ये कमी पडतात. उलटपक्षी, वैज्ञानिक सहमति हा एखाद्या विषयाबाबतचा शास्त्रज्ञांमधील बहुमताचा दृष्टिकोण असतो. तेव्हां, आपण जेव्हां ढोंगी विज्ञानातील एखाद्या विषयाबद्दल बोलत असतो, तेव्हां आपण दोन परस्परविरोधी दृष्टिकोण समान असल्याप्रमाणे त्यांचे वर्णन करू नये. कधी कधी, एखाद्या लेखात त्यासंबंधातील ढोंगी वैज्ञानिक दृष्टिकोण लक्षणीय असू शकतो, पण तरी, त्यामुळे शास्त्रज्ञांमधील बहुसंख्यांचा जो दृष्टिकोण असेल, तो धूसर होऊ नये. ढोंगी वैज्ञानिक दृष्टिकोणाचा समावेश करतांना त्यांना अवाजवी वजन देऊ नये. ढोंगी वैज्ञानिक दृष्टिकोण स्पष्टपणॆ तसाच सांगितला पाहिजे. ढोंगी वैज्ञानिक दृष्टिकोणाबद्दल शास्त्रज्ञांची प्रतिक्रिया काय आहे, ते ठळकपणे मांडले पाहिजे. यामुळे विविध दृष्टिकोणांचे वर्णन न्याय्य पद्धतीने करायला मदत होते. हे इतर अतिरेकी विषयांना सुद्धा लागू होते, उदाहरणार्थ, ऐतिहासिक सुधारणावादासाठी पुरावा नसतो किंवा ते जाणूनबुजून पुराव्याकडे काणाडोळा करतात, जसे की पोप जॉन पॉल १ चा खून झाला, किंवा अपोलोचे चंद्रावर उतरणे हे खोटे होते असे म्हणणे.
 
एखादा विषय ढोंगी विज्ञानात मोडतो की नाही हे ठरविण्यासाठी विकिपीडियाने ढोंगी विज्ञानासाठीची मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत.
 
====धर्म====
श्रद्धा आणि व्यवहार या विषयांवरील विकिपीडियातील लेखांमध्ये ज्या व्यक्ति कांही विशिष्ट श्रद्धा बाळगतात आणि त्यानुसार व्यवहार करतात, त्या तसे करण्यासाठी कशामुळे प्रवृत्त होतात याचाच फक्त समावेश न करता, अशा श्रद्धा आणि व्यवहार कसे विकसित झाले, याचा सुद्धा आढावा घेतला पाहिजे. इतिहास आणि धर्म यावरील विकिपीडियातील लेख धर्मग्रंथांमधून संदर्भ घेतात, तसेच आधुनिक पुरातत्त्व, ऐतिहासिक आणि वैज्ञानिक स्रोतांचा आधार घेतात.
 
ओळ ११०:
विकिपीडियाच्या निष्पक्षपाती दृष्टिकोणाच्या धोरणाबाबत जे आक्षेप आणि चिंता व्यक्त केलेल्या आहेत, त्या खालीलप्रमाणे -
 
====तटस्थ असणे====
⦁ निष्पक्षपातीपणा असे कांही नसतेच
तत्त्वज्ञानाचा चांगला अभ्यास असलेल्या सर्वांना हे माहीत असते की आपणा सर्वांचे आपापले कल असतात. मग, आपण निष्पक्षपाती दृष्टिकोणासंबंधातील धोरण गंभीरपणे कसे घेऊ शकणार?
ओळ ११८:
या धोरणाच्या एका पूर्वीच्या विभागात, ज्याचा मथळा होता, "एक स्पष्ट मांडणी", त्यात असे म्हटले होते, "वस्तुस्थिति आणि वस्तुस्थितीबद्दलची मते ठामपणॆ मांडा, पण मते ठामपणॆ मांडू नका." याचा अर्थ काय?
 
====निरनिराळ्या दृष्टिकोणात समतोल साधणे====
⦁ विरोधकासाठी लिहिणे
"विरोधकासाठी लिहिणे" याबद्दल तुम्ही काय म्हणता, ते मला समजत नाही. मला विरोधकांसाठी लिहायचे नाही आहे. जी विधाने खोटी असल्याचे दाखवून देता येते, ती वस्तुस्थिति आहे असे ते सांगतात. तुम्हाला असे म्हणायचे आहे काय की लेख लिहितांना निष्पक्षपाती राहाण्यासाठी मी खोटे बोलले पाहिजे, जेणेकरून मी ज्या दृष्टिकोणाशी सहमत नाही, तो पण मांडला जावा?
ओळ १२४:
हॉलोकॉस्ट नाकारणे यासारख्या दृष्टिकोणांचे काय, जे बहुसंख्य वाचकांना नैतिकदृष्ट्या आक्षेपार्ह वाटतात, पण कांही लोकांचा तो दृष्टिकोण खरोखरच असतो? आपण त्याबाबत नक्कीच निष्पक्षपाती असायला नको?
 
====संपादकांमधील वाद====
⦁ पक्षपाती लेखकांना हाताळणॆ
 
ओळ १३३:
निष्पक्षपातीपणाबाबतचे सततचे आणि न संपणारे झगडे कसे टाळायचे?
 
====इतर आक्षेप====
⦁ आंग्ल-अमेरिकी भर