"विकिपीडिया:तटस्थ दृष्टीकोन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
(या पानावरील मजकूर हे [https://en.wikipedia.org/wiki/Wikipedia:Neutral_point_of_view|मूळ इंग्रजी पानावरील] मजकुराचे भाषांतर आहे
==विकिपीडिया : निष्पक्षपाती दृष्टिकोण==
ओळ ९१:
याबाबतीत कोणताही नियम घालून देणे अवघड आहे, पण पुढील तत्त्वाचा उपयोग होऊ शकेल - एखाद्या विशिष्ट पानावर एका विशिष्ट गृहीतकाची चर्चा करणे योग्य नसेल आणि ते दुसर्या एखाद्या पानावर मांडणॆ अधिक योग्य असेल. तथापि, एक थोडका आणि फारसा डोळ्यात न येणारा उल्लेख योग्य असेल.
====वादग्रस्त विषय====
विकिपीडिया असे कित्येक विषय हाताळतो, ज्यांच्यावर जगात तसेच ज्ञानकोशाच्या संपादकांमध्ये तीव्र वादविवाद असतात. विकिपीडियाचा सर्वच विषयांबाबत निष्पक्षपाती दृष्टिकोण ठेवण्याचा प्रयत्न असतो, तरी अशा विषयांबाबत तो अधिक गरजेचा असतो.
=====अतिरेकी सिद्धांत आणि ढोंगी विज्ञान====
ढोंगी वैज्ञानिक सिद्धांत त्यांच्या समर्थकांकडून विज्ञान म्हणून मांडले जातात, पण ते विज्ञानाच्या प्रमाणांमध्ये आणि निकषांमध्ये कमी पडतात. उलटपक्षी, वैज्ञानिक सहमति हा एखाद्या विषयाबाबतचा शास्त्रज्ञांमधील बहुमताचा दृष्टिकोण असतो. तेव्हां, आपण जेव्हां ढोंगी विज्ञानातील एखाद्या विषयाबद्दल बोलत असतो, तेव्हां आपण दोन परस्परविरोधी दृष्टिकोण समान असल्याप्रमाणे त्यांचे वर्णन करू नये. कधी कधी, एखाद्या लेखात त्यासंबंधातील ढोंगी वैज्ञानिक दृष्टिकोण लक्षणीय असू शकतो, पण तरी, त्यामुळे शास्त्रज्ञांमधील बहुसंख्यांचा जो दृष्टिकोण असेल, तो धूसर होऊ नये. ढोंगी वैज्ञानिक दृष्टिकोणाचा समावेश करतांना त्यांना अवाजवी वजन देऊ नये. ढोंगी वैज्ञानिक दृष्टिकोण स्पष्टपणॆ तसाच सांगितला पाहिजे. ढोंगी वैज्ञानिक दृष्टिकोणाबद्दल शास्त्रज्ञांची प्रतिक्रिया काय आहे, ते ठळकपणे मांडले पाहिजे. यामुळे विविध दृष्टिकोणांचे वर्णन न्याय्य पद्धतीने करायला मदत होते. हे इतर अतिरेकी विषयांना सुद्धा लागू होते, उदाहरणार्थ, ऐतिहासिक सुधारणावादासाठी पुरावा नसतो किंवा ते जाणूनबुजून पुराव्याकडे काणाडोळा करतात, जसे की पोप जॉन पॉल १ चा खून झाला, किंवा अपोलोचे चंद्रावर उतरणे हे खोटे होते असे म्हणणे.
एखादा विषय ढोंगी विज्ञानात मोडतो की नाही हे ठरविण्यासाठी विकिपीडियाने ढोंगी विज्ञानासाठीची मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत.
===धर्म===
श्रद्धा आणि व्यवहार या विषयांवरील विकिपीडियातील लेखांमध्ये ज्या व्यक्ति कांही विशिष्ट श्रद्धा बाळगतात आणि त्यानुसार व्यवहार करतात, त्या तसे करण्यासाठी कशामुळे प्रवृत्त होतात याचाच फक्त समावेश न करता, अशा श्रद्धा आणि व्यवहार कसे विकसित झाले, याचा सुद्धा आढावा घेतला पाहिजे. इतिहास आणि धर्म यावरील विकिपीडियातील लेख धर्मग्रंथांमधून संदर्भ घेतात, तसेच आधुनिक पुरातत्त्व, ऐतिहासिक आणि वैज्ञानिक स्रोतांचा आधार घेतात.
एखाद्या धर्माचे अनुयायी त्यांच्या धर्मावरील टीकेला आक्षेप घेऊ शकतात कारण त्यांच्या मते, असे विश्लेषण त्यांच्या श्रद्धेच्या विरुद्ध असते. जर त्यांच्या दृष्टिकोणाला विश्वसनीय स्रोतांचा योग्य तो संदर्भ असेल, तर त्याचा उल्लेख करायला हरकत नाही. पण तरी याची खातरजमा करावी की कोणताही विरोधाभास नसावा. निष्पक्षपाती दृष्टिकोणाच्या धोरणाचा अर्थ असा की विकिपीडियाच्या संपादकांनी पुढील वाक्यासारखी वाक्ये लिहावीत : "हिंदुधर्मीयांचा अमुक विश्वास आहे आणि त्यांची अशी पण श्रद्धा आहे की हा विशिष्ट विश्वास हिंदु धर्मात अगदी सुरुवातीपासून आहे; तथापि, आधुनिक काळातील संशोधनातून (उदाहरणार्थ, डॉ. "क्ष" चा शोधनिबंध आणि प्रा."य" नी केलेले कार्बन डेटिंगचे काम) पुढे आलेल्या वस्तुस्थितीच्या परिणामस्वरूप, कांही हिंदुपंथांचा विश्वास आता वेगळा आहे."
Line १०७ ⟶ १०६:
धर्माच्या संबधातील अभ्यासांमध्ये कित्येक शब्दांना एक विशिष्ट असा आपला अर्थ असतो, परंतु कमी आधिकारिक संदर्भात, त्यांचा अर्थ वेगळा असतो. उदाहरणार्थ, रूढीवाद, पुराणे, वगैरे. धर्मावरील विकिपीडियातील लेखात असे शब्द वापरतांना विशेष काळजी घेतली पाहिजे आणि त्यांच्या आधिकारिक अर्थानेच ते शब्द वापरले पाहिजेत, जेणेकरून उगाच कोणाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत किंवा वाचकाचा कांही गैरसमज होऊ नये. उलटपक्षी, एखाद्या विशिष्ट दृष्टिकोणाला सहानुभूति म्हणून किंवा वाचकांचा आधिकारिक आणि अनाधिकारिक अर्थांमध्ये गोंधळ होऊ नये, केवळ एवढ्याचसाठी, जे शब्दप्रयोग सध्याच्या विश्वसनीय आणि समर्पक अशा स्रोतांमध्ये बहुमताने प्रस्थापित झालेले असतील, त्यांचा वापर करणॆ संपादकांनी टाळू नये.
====सर्वसाधारण आक्षेप आणि खुलासे====
विकिपीडियाच्या निष्पक्षपाती दृष्टिकोणाच्या धोरणाबाबत जे आक्षेप आणि चिंता व्यक्त केलेल्या आहेत, त्या खालीलप्रमाणे -
===तटस्थ असणे===
⦁ निष्पक्षपातीपणा असे कांही नसतेच
तत्त्वज्ञानाचा चांगला अभ्यास असलेल्या सर्वांना हे माहीत असते की आपणा सर्वांचे आपापले कल असतात. मग, आपण निष्पक्षपाती दृष्टिकोणासंबंधातील धोरण गंभीरपणे कसे घेऊ शकणार?
ओळ ११८:
या धोरणाच्या एका पूर्वीच्या विभागात, ज्याचा मथळा होता, "एक स्पष्ट मांडणी", त्यात असे म्हटले होते, "वस्तुस्थिति आणि वस्तुस्थितीबद्दलची मते ठामपणॆ मांडा, पण मते ठामपणॆ मांडू नका." याचा अर्थ काय?
===निरनिराळ्या दृष्टिकोणात समतोल साधणे===
⦁ विरोधकासाठी लिहिणे
"विरोधकासाठी लिहिणे" याबद्दल तुम्ही काय म्हणता, ते मला समजत नाही. मला विरोधकांसाठी लिहायचे नाही आहे. जी विधाने खोटी असल्याचे दाखवून देता येते, ती वस्तुस्थिति आहे असे ते सांगतात. तुम्हाला असे म्हणायचे आहे काय की लेख लिहितांना निष्पक्षपाती राहाण्यासाठी मी खोटे बोलले पाहिजे, जेणेकरून मी ज्या दृष्टिकोणाशी सहमत नाही, तो पण मांडला जावा?
ओळ १२४:
हॉलोकॉस्ट नाकारणे यासारख्या दृष्टिकोणांचे काय, जे बहुसंख्य वाचकांना नैतिकदृष्ट्या आक्षेपार्ह वाटतात, पण कांही लोकांचा तो दृष्टिकोण खरोखरच असतो? आपण त्याबाबत नक्कीच निष्पक्षपाती असायला नको?
===संपादकांमधील वाद===
⦁ पक्षपाती लेखकांना हाताळणॆ
निष्पक्षपातीपणाच्या धोरणाशी मी सहमत आहे, पण इथे असे कांही लोक आहेत, जे कमालीचे पक्षपाती आहेत. मला त्यांचे काम साफ करावे लागते. मी काय करावे?
ओळ १३०:
निष्पक्षपातीपणाबाबतचे सततचे आणि न संपणारे झगडे कसे टाळायचे?
===इतर आक्षेप===
⦁ आंग्ल-अमेरिकी भर
विकिपीडियाचा भर आंग्ल-अमेरिकी असल्यासारखे वाटते. हे निष्पक्षपाती दृष्टिकोणाच्या विरुद्ध आहे काय?
ओळ १३७:
निष्पक्षपाती दृष्टिकोणाचे धोरण नवीन लोकांना परिचित नसल्यामुळे आणि ते महत्त्वाचे असल्यामुळॆ त्याच्या बाबतचे सर्व मुद्दे यापूर्वी विस्तृतपणे हाताळलेले आहेत. जर तुम्हाला या वादविवादात कांही नवीन भर घालायची असेल, तर तुम्ही धोरणचर्चा या पानावर प्रयत्न करू शकता. विचारण्यापूर्वी खालील पाने पहा.
|