"अतुल पेठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३०:
 
==विशेष==
* लेखक, अभिनेता, दिग्दर्शक, छायाचित्रकार, माहितीपटकार, निर्माता, प्रशिक्षक अशी अतुल पेठेंची ओळख आहे.त्यांची विचारशील प्रायोगिक नाटके राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवात गाजली.१९९० नंतरच्या मराठी रंगभूमीवर जोरकसपणे काम करून स्वतःची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. नाटक करायला अवघड आशा काळात त्यांनी हिमतीने महाराष्ट्रभर स्वतःचे नाटक नेले. त्यावर चर्चा झाल्या आणि नवे नाटक पुन्हा रुजले गेले. त्यांनी अनेक नाट्यकार्यशाळा घेतल्या, ज्यातून नवे रंगकर्मी तयार झाले.
* गावातील नाट्यगट, सांस्कृतिक मंडळे, काही संवेदनशील मंडळी आणि काही स्वयंसेवी संस्था यांच्याद्वारेच पेठे त्यांचे नाट्यप्रयोग घडवून आणतात. ते नाटकाबरोबरच इतर क्षेत्रांतील लोकांकरिता कार्यशाळाही घेत असतात. आरोग्य क्षेत्र आणि त्यातून ‘आरोग्य-संवाद’ या संकल्पनेवर काम करणारे महाराष्ट्रात अत्यंत वेगळ्या रीतीने काम करणारे डॉक्टर्स आणि त्यांच्या संस्था आहेत. त्यांच्याशी जोडले जाऊन अतुल पेठे यांनी त्यांच्या कार्यशाळा घेतल्या. नाटक या माध्यमाचा वापर करून समाजप्रबोधन आणि विचारप्रसार करणे हे ज्यांचे उद्दिष्ट आहे अशा समकालीन मित्रमैत्रिणींच्या संघटनांकरताही त्यांनी कार्यशाळा घेतल्या. या साऱ्या संस्था, संघटना आणि व्यक्ती या भारतीय राज्यघटनेला आणि लोकशाहीच्या मूल्यांना केंद्रस्थानी मानणाऱ्या होत्या. त्या धंदेवाईक उद्देशाने स्थापन झालेल्या नव्हत्या. त्यामुळे अशा स्वयंसेवी संस्थांबरोबर काम करून हुकूमशाही, एकाधिकारशाही, धर्माधता आणि दहशत असा विषयांवरची नाटके अतुल पेठे यांनी स्वीकारली आणि सादर केली. त्यांना या मार्गाने वंचित, पीडित, शोषितांचे प्रश्न तळमळीने सोडवायचे आहेत.
 
* ‘सत्यशोधक’ हे नाटक अतुल पेठे यांनी पुणे महापालिकेतील नट नसलेल्या सफाई कामगारांना घेऊन केले.
* ‘दलपतसिंग..’ हे माहितीचा अधिकार या विषयावरचं नाटक दुर्गम खेडय़ातील कलाकारांना घेऊन केले.
* कॉ. पानसरे आणि डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर अतुल पेठे यांनी ‘रिंगणनाट्य’ कार्यशाळा घेतल्या. त्यातून अडीचशे कार्यकर्त्यां कलावंतांनी १६ नाटके सादर केली. त्या नाटकांचे एक हजारच्या आसपास प्रयोग झाले.
 
==अतुल पेठे यांनी लिहिलेली नाटके==
"https://mr.wikipedia.org/wiki/अतुल_पेठे" पासून हुडकले