"ख्रिश्चन धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
प्रसाद साळवे (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: २०१७ स्रोत संपादन |
||
ओळ २:
{{ख्रिश्चन धर्म}}
'''ख्रिस्ती धर्म''' किंवा '''ख्रिश्चन धर्म''' हा लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा धर्म असून त्याला जवळजवळ दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. [[पॅलेस्टाईन]] (सध्याचा [[इस्रायल]] देश) येथे ख्रिस्ती धर्माचा प्रारंभ झाला. [[येशू ख्रिस्त]] हा या धर्माचा संस्थापक मानला जातो. ख्रिस्तपूर्व ४ ते ६ च्या दरम्यान येशूचा जन्म बेंथलेहम गावी झाला.ख्रिस्ती शकारंभी बलाढ्य रोमन साम्राज्य अटलांटिक महासागरापासून तुर्कस्तान पर्यंत व जर्मन समुद्रापासून सहारा पर्यंत पसरले होते. पालेस्तीन हा या रोमन साम्राज्यातील एक सुभा होता. योग्य वेळ आली तेव्हा गालील प्रांतातील बेंथलेहम या गावी येशूचा जन्म झाला. त्या वेळी पालेस्तीन देशावर रोमन सत्ता अधिकार गाजवीत होती. सम्राट ऑगस्टस हा या साम्राज्याचा सम्राट होता. त्याने गालील प्रांताचा मांडलिक राजा म्हणून हेरोद राजाला नेमले होते. याच्याच अमदानीत येशूचा जन्म झाला.
'''''ख्रिस्ती धर्मपंथ''''' : ख्रिस्ती धर्मात मुखत्वे तीन धर्मपंथ आढळून येतात. १. [[रोमन कॅथोलिक]] २. [[ईस्टर्न ऑर्थोडॉक्स]],३. [[प्रोटेस्टंट]]. रोमन कॅथोलिक पंथ हा धर्मातील कर्मठ परंपराचे जतन करतो. रोमन कॅथोलिक पंथ रोमच्या पोपची धार्मिक सत्ता मान्य करते. हा ख्रिस्ती धर्मातील सुधारणावादी विचारांचे समर्थन करतो. रोमन कॅथोलिक पंथ आणि ईस्टर्न ऑर्थोडॉक्स पंथ यांच्याशिकवणुकीत व विचारात विशेष फरक नाही. फक्त ईस्टर्न ऑर्थोडॉक्स पंथ हा रोमच्या पोपची सत्ता मान्य करीत नाही तर त्याऐवजी कॉनस्तंटटीनोपलची सत्ता सर्वोच्च मानतात. या पंथांच्या धार्मिक श्रद्धा, धार्मिक विधी या बाबतीत बरीच मतभिन्नता असली तरी येशू ख्रिस्ताबाबत असलेले तीन घटक सर्वांनाच मान्य आहेत. ते तीन घटक खालीलप्रमाणे :
|