"विकिपीडिया:तटस्थ दृष्टीकोन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ८४:
विश्वसनीय स्रोतांबाबतच्या वादातील एक सर्वसाधारण मुद्दा असा असतो की एक स्रोत पक्षपाती आहे आणि म्हणून दुसर्‍या स्रोताला प्राधान्य द्यावे. कांही संपादक म्हणतात की पक्षपाती स्रोत वापरता कामा नये कारण त्यामुळे लेखात अयोग्य असा दृष्टिकोण येतो. परंतु, पक्षपाती स्रोत केवळ त्यांच्या झुकत्या कलासाठीच नाकारू नयेत. अर्थात, कदाचित तसे स्रोत दुसर्‍या कांही कारणांमुळे अवैध ठरू शकतात. स्रोतांमधील झुकता कल आणि इतर विश्वसनीय स्रोतांमध्ये मतांना ज्या प्रमाणात वजन आहे यांच्यात समतोल साधून लेखात निष्पक्षपाती दृष्टिकोण आणता येतो. त्यासाठी संपादकाच्या दृष्टिकोणाशी सहमत नसलेला स्रोत गाळू नये. अर्थात, याचा अर्थ असा नाही की कोणताही पक्षपाती दृष्टिकोण समाविष्ट करावा; कधी कधी तो गाळल्यामुळे लेख अधिक चांगला होऊ शकेल.
 
निष्पक्षपातीपणासंबंधातील वादविवाद कसे हाताळावेत
पक्षपाती विधाने आणि त्यांचा स्रोत दर्शविणे
पक्षपाती विधाने त्या विधानातच त्यांच्या स्रोतासहित द्यावीत. उदाहरणार्थ, "विनोद हा सर्वोत्तम क्रिकेट खेळाडू आहे" हे विधान एक मत दर्शविते आणि विकिपीडियात ते तसेच ठामपणॆ वस्तुस्थिति असल्यासारखे देता येत नाही. त्याऐवजी, ते एका मताचे वास्तविक विधान म्हणून देता येते : "विनोदच्या क्रिकेटमधील कौशल्याची स्तुति "क्ष" व "य" समीक्षकांनी केली आहे." मते पडताळण्याजोगी असली पाहिजेत आणि त्यांचा योग्य संदर्भ दिला पाहिजे.
 
आणखी एक मार्ग असा की वस्तुस्थितीला अनुसरून तपशील देऊन त्या विधानाचे पुष्टिकरण करणे. उदाहरणार्थ, "विनोदने २००७-०८ च्या कसोटी मोसमात ५० च्या सरासरीने १००० धावा केल्या आणि शिवाय २५ बळी सुद्धा घेतले." विनोद सर्वोत्तम क्रिकेट खेळाडू होता की नाही यावर लोक वाद घालू शकतील, परंतु या वस्तुस्थितिदर्शक विधानावर नाही.
 
पक्षपाती विधाने वेगळ्या आणि गोलमोल शब्दात देण्याचा मोह टाळावा. उदाहरणार्थ, कित्येक लोकांना असे वाटते की विनोद हा सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळाडू आहे." पण नक्की कोणाला असे वाटते आणि किती लोकांना असा आक्षेप स्वाभाविकपणे येऊ शकतो. यासाठी एकच अपवाद हा की जेव्हां "कित्येक लोकांना वाटते" यासाठी एखाद्या विश्वसनीय स्रोताचा आधार असेल, जसे की मतसर्वेक्षणाचा अहवाल.
 
दृष्टिकोणाला फाटे फोडणे
दृष्टिकोणाला फाटा फोडणे म्हणजे, निष्पक्षपातीपणाच्या धोरणाला वळसा घालण्यासाठी, जो विषय आधीच एका लेखात हाताळलेला असेल, त्या विषयावर एक दुसरा लेख बनविणे. याचा उद्देश असा असतो की सकारात्मक किंवा नकारात्मक दृष्टिकोण किंवा वस्तुस्थिति टाळणे. हे विकिपीडियात चालत नाही.
 
एखाद्या विषयाबाबतची सर्व वस्तुस्थिति आणि लक्षणीय दृष्टिकोण एकाच लेखात हाताळले पाहिजेत. अपवाद तेव्हांच असू शकतो जेव्हां एका लेखातून दुसरा उपलेख निघत असतो. कांही विषय एवढे मोठे असतात की एका लेखात त्या विषयाचे सर्व पैलू हाताळता येत नाहीत. उदाहरणार्थ, "उत्क्रांति - वस्तुस्थिति आणि सिद्धांत" हा "उत्क्रांति" या लेखाचा उपलेख आहे, आणि "निर्मिति की उत्क्रांति- एक वाद" हा "निर्मिति सिद्धांत" या लेखाचा उपलेख आहे. या प्रकारे फाटा फोडणॆ हे तेव्हांच चालते, जेव्हां ते निष्पक्षपाती दृष्टिकोणातून लिहिले जाते आणि तो दुसर्‍या एका लेखासंबंधातील सहमती टाळण्याचा प्रयत्न नसतो.
 
आवश्यक अशी गृहीते धरणे
लेख लिहितांना कधी कधी एखादा विषय मांडण्यासाठी कांही गृहीतके आवश्यक असतात. उदाहरणार्थ, उत्क्रांतीबद्दल लिहितांना, प्रत्येक पानावर निर्मिति-उत्क्रांति हा वाद आणण्याने कांही हेतु साध्य होत नाही. कोणाचाच आक्षेप नसेल अशी गृहीतके घेऊन विषय मांडणे किंवा अजिबात गृहीतके घ्यावी न लागता एखादा लेख लिहिणे जवळपास अशक्यच आहे. हे फक्त उत्क्रांतिसिद्धांतावर आधारित प्राणिशास्त्राबाबतच लागू आहे असे नाही, तर तत्त्वज्ञान, इतिहास, पदार्थविज्ञान वगैरेंसारख्या विषयांना सुद्धा लागू आहे.
 
याबाबतीत कोणताही नियम घालून देणे अवघड आहे, पण पुढील तत्त्वाचा उपयोग होऊ शकेल - एखाद्या विशिष्ट पानावर एका विशिष्ट गृहीतकाची चर्चा करणे योग्य नसेल आणि ते दुसर्‍या एखाद्या पानावर मांडणॆ अधिक योग्य असेल. तथापि, एक थोडका आणि फारसा डोळ्यात न येणारा उल्लेख योग्य असेल.
===Bias===
Neutrality requires views to be represented without [[bias]]. All editors and all sources have biases (in other words, all editors and all sources have a point of view) — what matters is how we combine them to create a निष्पक्ष लेख. Unbiased writing is the fair, analytical description of all relevant sides of a debate, including the mutual perspectives and the published evidence. Editorial bias toward one particular point of view should be removed or repaired.<ref name="see_also_uw">करिता more details, see the ''Undue Weight'' section in this policy.</ref>