"नागली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
राईप्रमाणे दिसणारी आणि जोंधळयाच्या चवीची असणारी नाचणी (शास्त्रीय नाव - इल्युसाईन कोरॅकोना) म्हणजेच नागली हे [[तृणधान्य]] शरीरासाठी पौष्टिक समजले जाते. या तृणधान्यात कॅल्शियमबरोबरच [[लोह]], [[नायसिन]], [[थायमिन]], रिबोफ्लेविन ही महत्त्वाची पोषकद्रव्ये असतात. नाचणीत असणाऱ्या कॅल्शियमच्या विपुल साठ्यामुळे खेळाडू, कष्टाचे काम करणारे, वाडत्यावाढत्या वयाची मुले यांना नाचणीपासून बनवलेले पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर, आहारतज्ज्ञ देतात.
 
नाचणीचे हे पीक दुर्गम, आदिवासी भागातील हलक्या व वरकस जमिनीत घेतात. नागली हे दुर्गम भागातील लोकांचे प्रमुख अन्नधान्य आहे. ते सर्व प्रकारच्या जमिनींत येणारे हे पीक आहे. नाचणीचे बी मुठीने जमिनीवर फेकून लागवण करतात.
 
[[महाराष्ट्र]], [[कर्नाटक]] आणि [[आंध्र प्रदेश]] या राज्यांमध्ये नागलीचा वापर पुष्कळ प्रमाणात केला जातो आणि विशेष म्हणजे कष्टकरी वर्गात तो अधिक होतो त्यामुळे त्यांचे स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी मदतच होते.
"https://mr.wikipedia.org/wiki/नागली" पासून हुडकले