"विकिपीडिया:तटस्थ दृष्टीकोन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नाव
No edit summary
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला !
ओळ ५१:
 
जर तुम्ही असे कांही तरी सिद्ध करू शकत असाल, ज्याच्यावर सध्या तरी कोणाचाच विश्वास नाही किंवा फारच अपवादात्मक विश्वास आहे, तर विकिपीडिया ही त्याची सिद्धता सादर करण्याची जागा नाही. एकदा ते सादर होऊन विश्वसनीय स्रोतांमध्ये त्याच्यावर चर्चा झाली की मग त्याचा योग्य प्रकारे समावेश करायला हरकत नाही.
 
समतोल राखणारे पैलू
विषयाच्या दुय्यम पैलूंना लेखात अवाजवी वजन दिलेले असू नये, तर लेखात असा प्रयत्न असावा की विश्वसनीय आणि प्रसिद्ध झालेल्या स्रोतांमध्ये ते ज्या प्रकारे हाताळलेले असेल, त्याच प्रमाणात दुय्यम पैलूंची मांडणी असावी. उदाहरणार्थ, एखाद्या विषयासंबंधीची तुरळक घटना, टीका, किंवा बातमीपत्रे पडताळता येण्यासारखे आणि निष्पक्ष असतील, पण तरी त्यांची चर्चा लेखाच्या विषयाच्या लक्षणीयतेच्या मानाने कदाचित अवाजवी असेल. हे त्याबाबतीत अधिक चिंताजनक असते, जेव्हां अलिकडील घटना बातम्यांमध्ये असतील.
 
"समान वैधता" देण्यामुळे खोटा समतोल निर्माण होऊ शकतो
कोणत्याही विषयाच्या बाबतीतील सर्व लक्षणीय दृष्टिकोणांचा समावेश करणे जरी महत्त्वाचे असले, तरी प्रत्येक अल्पमतातील दृष्टिकोण किंवा असाधारण दावा सुद्धा सर्वसामान्यपणॆ ग्राह्य असलेल्या विद्वत्तापूर्ण दृष्टिकोणांच्या बरोबरीने मांडले जावेत, असे विकिपीडियाचे धोरण सांगत नाही किंवा त्यातून तसे प्रतीत देखील होत नाही. जगात अशा कित्येक श्रद्धा आहेत, ज्यातील कांही लोकप्रिय आणि कांही फारच थोड्या लोकांना परिचित असतील, उदाहरणार्थ पृथ्वी सपाट असल्याचा दावा, किंवा अपोलोचे चंद्रावर उतरणे ही लबाडी होती, वगैरे. कटकारस्थानाची कथा, दांभिक विज्ञान, तार्किक इतिहास किंवा शक्यतेच्या परिघात असलेल्या, परंतु अजून तरी ग्राह्य नसलेल्या सिद्धांतांची तुलना, ग्राह्य असलेल्या विद्वत्तापूर्ण शैक्षणिक सिद्धांतांच्या बरोबर करून त्यांना मान्यता मिळवून देण्याचा प्रयत्न करू नये. ज्ञानकोशाचे लेखक या नात्याने आपण या बाबींवर त्यांच्या बाजूने किंवा विरुद्ध भूमिका घेत नाही; आपण फक्त ती माहिती गाळायची, जिचा समावेश केला तर तिला उगाचच अवाजवी मान्यता दिल्यासारखे होईल. अन्यथा, या संकल्पनांचा समावेश केलाच, तर प्रस्थापित विद्वत्तापूर्ण मांडणी आणि विस्तृत स्वीकारार्हता असलेल्या विचारांच्या पार्श्वभूमीवर त्यांचे वर्णन करावे.
 
उत्तम संशोधन
----------------
सर्वोत्तम, मान्यताप्राप्त आणि अधिकारी अशा स्रोतांमध्ये केलेल्या चांगल्या आणि निष्पक्षपाती संशोधनाची निष्पक्षपाती दृष्टिकोणासंबंधातील वादविवाद टाळण्यास मदत होते. सन्मान्य पुस्तके आणि जर्नल्स मधील लेख यांसाठी ग्रंथालयात जावे आणि इंटरनेटवर जाऊन जास्तीत जास्त विश्वसनीय स्रोत शोधावेत. तुम्ही ज्या लेखावर काम करत असाल, त्यासाठी जर तुम्हाला उत्तम गुणवत्तेचे स्रोत शोधण्यासाठी मदत हवी असेल, तर संवाद पानावर इतर संपादकांची मदत मागा किंवा संदर्भ खात्याला विचारा.
 
समतोल
---------
निष्पक्षपातीपणासाठी निरनिराळ्या दृष्टिकोणांना त्यांच्या त्यांच्या ठळकपणाच्या प्रमाणात महत्त्व (वजन) द्यावे. परंतु, जेव्हां सन्मान्य स्रोतांमध्येच असहमति असते आणि ते समान प्रमाणात ठळक असतात, तेव्हां त्या दोन्ही दृष्टिकोणांचे वर्णन करा आणि त्यांच्यात समतोल राखण्याचा प्रयत्न करा. यासाठी परस्पविरोधी दृष्टिकोण स्पष्टपणॆ वर्णन केले पाहिजेत आणि इतर दुय्यम व तिय्यम स्रोतांमधून माहिती मिळवावी, जी अधिक तटस्थ असेल.
 
निष्पक्षपाती सूर
------------------
विकिपीडिया वादविवादांचे वर्णन करतो. विकिपीडिया स्वत: वादविवादात भाग घेत नाही. वादविवादांचे निष्पक्षपाती सादरीकरण करण्यासाठी सर्व वेगवेगळे दृष्टिकोण सातत्याने निष्पक्षपातीपणे मांडले पाहिजेत; अन्यथा, लेखात जरी सर्व दृष्टिकोण मांडलेले असले, तरी तो पक्षपाती भाष्यासारखा वाटेल. जरी एखादा विषय सर्वस्वी वस्तुस्थितीचे वर्णन करत असला आणि मतमतांतरांचे नाही, तरी ज्या पद्धतीने वेगवेगळी तथ्ये लेखात निवडली, मांडली आणि लावली जातात, त्यानुसार लेखाचा सूर अयोग्य लागू शकतो. निष्पक्षपाती लेख अशा सुरात लिहिले जातात, जेणेकरून लेखात समाविष्ट केलेल्या सर्व दृष्टिकोणांचे एक तटस्थ, अचूक आणि प्रमाणबद्ध सादरीकरण दिसेल.
 
विकिपीडियातील लेखांचा सूर निष्पक्षपाती असला पाहिजे, जो कोणत्याही दृष्टिकोणाला दुजोरा देत नसावा किंवा नाकारत नसावा. तीव्र वादात सहभागी असलेल्यांचे म्हणणे जसेच्या तसे उद्धृत करू नका, तर त्यांचा सारांश देऊन त्यांचे म्हणणॆ निष्पक्षपातीपणॆ मांडा.
 
===Bias===