"विकिपीडिया:तटस्थ दृष्टीकोन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४२:
 
विकिपीडियामध्ये कोणताही वाद अशा प्रकारे मांडला जाऊ नये की जणू एका छोट्या अल्पमतातील दृष्टिकोणाला सुद्धा बहुमतातील दृष्टिकोणाइतकेच महत्त्व आहे. एका अत्यल्पमतातील दृष्टिकोणाची मांडणी तेव्हांच केली जावी, जेव्हां तो लेख त्या दृष्टिकोणाबद्दलच असेल (उदाहरणार्थ सपाट पृथ्वी). लक्षणीय, तरी अल्पमतातील दृष्टिकोणाला अवाजवी वजन देणे, किंवा अत्यल्पमतातील दृष्टिकोणाचा समावेश करणे यामुळे वादाला दिशाभूल करणारे वळण मिळू शकते. एखाद्या विषयावरील निरनिराळ्या दृष्टिकोणांना विश्वसनीय स्रोतांमध्ये ज्या प्रमाणात जागा दिली गेली असेल, त्याच प्रमाणात विकिपीडियामध्ये त्यांना मांडणी मिळावी असे विकिपीडियाचे ध्येय आहे. हे केवळ लेखाच्या मजकुराबाबतच नाही, तर चित्रे, विकिलिंक्स, बाह्यलिंक्स, वर्गवारी आणि इतर साहित्याबाबत सुद्धा लागू आहे.
 
जिंबो वेल्स च्या सप्टेंबर, २००३ च्या पोस्टचा सारांश :
⦁ जर एक दृष्टिकोण बहुमताचा असेल, तर सर्वसाधारणपणॆ स्वीकारार्ह असलेल्या संदर्भांच्या सहाय्याने त्याचे पुष्टिकरण करणॆ सोपे असते.
⦁ जर एक दृष्टिकोण लक्षणीय अल्पमताचा असेल, तर त्याला पाठिंबा देणार्‍या कांही मान्यवर व्यतींची नांवे देणे शक्य असावे.
⦁ जर एक दृष्टिकोण खूपच अल्पमताचा असेल, तर तो विकिपीडियावर असता कामा नये, मग तो सत्य असला तरी, किंवा तो सिद्ध करता येत असला तरी; पण तो एखाद्या दुय्यम लेखात मांडला जाऊ शकतो.
 
हे लक्षात असू द्यावे की एखाद्या दृष्टिकोणासाठीचे योग्य वजन ठरवितांना, आपण तो किती विश्वसनीय स्रोतांमध्ये आणि किती प्रमाणात आहे, ते विचारात घेतो, विकिपीडियाच्या संपादकमंडळात किंवा सर्वसामान्य जनतेत त्याला किती महत्त्व आहे ते नाही.
 
जर तुम्ही असे कांही तरी सिद्ध करू शकत असाल, ज्याच्यावर सध्या तरी कोणाचाच विश्वास नाही किंवा फारच अपवादात्मक विश्वास आहे, तर विकिपीडिया ही त्याची सिद्धता सादर करण्याची जागा नाही. एकदा ते सादर होऊन विश्वसनीय स्रोतांमध्ये त्याच्यावर चर्चा झाली की मग त्याचा योग्य प्रकारे समावेश करायला हरकत नाही.
 
===Bias===