"कनक रेळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ७:
’नालंदा’ ही नृत्याला समर्पित संस्था उभी करण्यासाठी कनक रेळेंना खूप कष्ट करावे लागले. १९७२ साली मुंबई विद्यापीठात नृत्यावर स्वतंत्र पदवी सुरू करण्यासाठी सर्वाचा विरोध होता. वेश्यांसाठी पदवी सुरू करीत असल्याची वाईट प्रतिक्रियाही त्यांना ऐकावी लागली होती. मात्र नृत्यावरील प्रेमाखातर नृत्य हा अभ्यासाचा विषय म्हणून मुंबई विद्यापीठात रुजू करण्यासाठी रेळे यांनी पाठपुरावा केला.
 
पौराणिक कथेत नेहमीच दुय्यम महत्त्व दिल्या गेलेल्या व वेळप्रसंगी बंडखोरी करणाऱ्या पात्रांना शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून बोलते करण्याचे श्रेय ‘नालंदा नृत्य संशोधन केंद्रा’च्या संस्थापिका व संचालिका डॉ. कनक रेळे यांच्याकडे जाते. महाभारतातील अंबा, [[द्रौपदी]] व [[गांधारी]] या व्यक्तिरेखांवर झालेला अन्याय त्यांनी देशविदेशांमध्ये आपल्या शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवला आहे. २०१६ साली या पात्रांमध्ये एकलव्य व नंदनार यांची भर पडली आहे.
 
==सुरुवातीचे जीवन==
"https://mr.wikipedia.org/wiki/कनक_रेळे" पासून हुडकले