"कनक रेळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात आवश्यक सुधारणा केली.
दुवा जोडला
ओळ १:
[[File:KanakRele.jpeg|thumb|180px|डॉ. कनक रेळे]]
 
'''डॉ. कनक रेळे''' या एक मराठी नृत्यांगना आहेत. त्यांनी वयाच्या सहाव्या वर्षांपासून [[कथकली]] आणि [[मोहिनीअट्टम]] या नृत्यप्रकारांचे शिक्षण गुरु पांचाली करुणाकर पणीकर यांच्याकडून घेतले. [[मोहिनीअट्ट्म]] नृत्यप्रकाराची विशेष तालीम त्यांना कलामंडलम्‌ राजलक्ष्मी यांच्याकडून मिळाली. डॉ. कनक रेळे गेली अनेक वर्षे नृत्यशिक्षणाचे काम करीत आहेत. त्यासाठी त्यांनी मुंबईत[[मुंबई]]त इ.स. १९६६ साली ’नालंदा डान्स ॲन्ड रिसर्च सेंटर’ आणि ’नालंदा नृत्यकला महाविद्यालय’ या संस्था स्थापन केल्या.
==नालंदा नृत्यकला महाविद्यालय==
गरीब घरातल्या नृत्यप्रेमी मुलींसाठी नृत्य शिकण्यासाठीचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांनी ‘नालंदा केंद्रा’चे शुल्कदेखील कमी ठेवले आहे. त्यामुळे आजही या संस्थेत आदिवासी भागातील कित्येक मुली नृत्याच्या प्रेमाखातर शिकण्यासाठी येतात. शिक्षणाचा गंध नसलेल्या या मुली ‘नालंदा’ मधून नृत्य शिकून आपल्या गावामध्ये नृत्याची शाळा सुरू करण्याची इच्छा व्यक्त करतात. या केंद्रात प्रशस्त अभ्यासिका व ग्रंथालयदेखील आहे. याव्यतिरिक्त या केंद्रात योगा व संस्कृतचे शिक्षणही दिले जाते. ‘नालंदा नृत्य संशोधन केंद्रा’स थेट भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान खात्याकडून वैज्ञानिक व औद्यागिक संशोधन केंद्र म्हणून ओळख मिळाली आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/कनक_रेळे" पासून हुडकले