"कनक रेळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
आर्या जोशी (चर्चा | योगदान) शुद्धलेखन दुरुस्ती |
आर्या जोशी (चर्चा | योगदान) लेखात आवश्यक सुधारणा केली. |
||
ओळ २:
'''डॉ. कनक रेळे''' या एक मराठी नृत्यांगना आहेत. त्यांनी वयाच्या सहाव्या वर्षांपासून कथकली आणि मोहिनीअट्टम या नृत्यप्रकारांचे शिक्षण गुरु पांचाली करुणाकर पणीकर यांच्याकडून घेतले. [[मोहिनीअट्ट्म]] नृत्यप्रकाराची विशेष तालीम त्यांना कलामंडलम् राजलक्ष्मी यांच्याकडून मिळाली. डॉ. कनक रेळे गेली अनेक वर्षे नृत्यशिक्षणाचे काम करीत आहेत. त्यासाठी त्यांनी मुंबईत इ.स. १९६६ साली ’नालंदा डान्स ॲन्ड रिसर्च सेंटर’ आणि ’नालंदा नृत्यकला महाविद्यालय’ या संस्था स्थापन केल्या.
==नालंदा नृत्यकला महाविद्यालय==
गरीब घरातल्या
’नालंदा’ ही नृत्याला समर्पित संस्था उभी करण्यासाठी कनक रेळेंना खूप कष्ट करावे लागले. १९७२ साली मुंबई विद्यापीठात नृत्यावर स्वतंत्र पदवी सुरू करण्यासाठी सर्वाचा विरोध होता. वेश्यांसाठी पदवी सुरू करीत असल्याची वाईट प्रतिक्रियाही त्यांना ऐकावी लागली होती. मात्र नृत्यावरील प्रेमाखातर नृत्य हा अभ्यासाचा विषय म्हणून मुंबई विद्यापीठात रुजू करण्यासाठी रेळे यांनी पाठपुरावा केला.
कनक रेळे यांच्याकडे कायद्याची पदवी आहे. इंग्लंडमध्ये जाऊन ‘आंतरराष्ट्रीय कायदा’ या विषयात त्यांनी शिक्षण घेतले. पण कायद्याच्या क्षेत्रात मन न रमल्याने त्यांनी नृत्य हेच ध्येय ठेवले. ▼
भारतामध्ये शास्त्रीय नृत्यामध्ये ‘पीएचडी’ करणाऱ्या कनक रेळे या पहिल्या आहेत.
ओळ २४:
मुंबई विद्यापीठातील फाईन आर्ट्स विभागाच्या सुरवातीस डॉ कनक रेळे यांनी डीन म्हणून काम केले. १९६६ साली रेळे यांनी नालंदा नृत्य संशोधन केंद्र व १९७२ मध्ये नालंदा नृत्य कला महाविद्यालयची स्थापन केली. विद्यापीठात विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणारे नालंदा नृत्य संशोधन केंद्र, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे संशोधन संस्था म्हणून ओळखली जाते. डॉ कनक रेळे यांनी भारत सरकारच्या संस्कृती विभागाचे नवनियंत्रण आणि सल्लागार म्हणून देखील काम केले आहे आणि ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे अभ्यासक्रम, विकास संघ, भारतीय व परदेशी विद्यापीठांच्या सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.
▲कनक रेळे यांच्याकडे कायद्याची पदवी आहे. इंग्लंडमध्ये जाऊन ‘आंतरराष्ट्रीय कायदा’ या विषयात त्यांनी शिक्षण घेतले. पण कायद्याच्या क्षेत्रात मन न रमल्याने त्यांनी नृत्य हेच ध्येय ठेवले.
==संदर्भ==
|