"दुर्गा भागवत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३९:
 
==कारकीर्द==
सुस्पष्ट पामाणिक विचार, छोटी छोटी वाक्ये, नादमय शब्द, आणि अर्थातील सुबोधता हे दुर्गाबाईंच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते. संस्कृत, पाली, प्राकृत, इंग्रजी, मराठी, फ्रेंच, हिंदी इत्यादी भाषांचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. दुर्गाबाईंच्या लेखनातीललेखनात आपल्याभारतातील सांस्कृतिक, पौराणिक, सामाजिक जीवनातले अनेक संदर्भ वाचकांना थक्क करून जातात. अभ्यास आणि लिखाण हे त्यांचे प्राण होते. म्हणूनच त्यांच्या लिखाणात संशोधन, विद्वत्ता आणि माहितीचा प्रचंड साठा या त्रयींचा अपूर्व संगम आढळतो. त्यांच्या लिखाणात स्पष्ट आणि प्रामाणिक विचारांबरोबरच कवी मनाची कोमलता आढळते. आणि "आपणाला जे जे ठावे ते इतरांना सांगावे" हा समर्थांचा विचार प्रत्यक्षात आणण्याची तळमळ दुर्गाबाईंमध्ये दिसून येते. आणीबाणीच्या विरोधात त्यांनी घेतलेल्या भूमिकेत हा ठामपणा दिसून येतो. लोकसाहित्याच्या व्यासंगात बुडलेल्या दुर्गाबाईंच्या लेखनात लोकसाहित्याचा जिवंत रसरशीतपणा, मोहक साधेपणा, बोलभाषेची मांडणी आढळते, तशीच व्यासंग-चिंतन-मनन यांतून आलेली गहिरेपणाची डूबही. दूर्गाबाईंच्यादुर्गाबाईंच्या लेखनातील मौलिकता, अस्सल भारतीयत्त्वभारतीयत्व, सनातनत्त्वाचासनातनत्त्वचा वेध घेण्याची शक्ती यांमुळे ललित निंबधाच्या क्षेत्रात त्यांनी एक नवा मानदंड निर्माण केला आहे. फ्रेंच, जर्मन, संस्कृत इत्यादी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी दोन वर्षे समाजशास्त्र विभागप्रमुख म्हणून काम पाहिले. मुंबईतील एशियाटिक सोसायटीच्या त्या क्रियाशील कार्यकर्त्या होत्या. भारतातील सन्माननीय लेखिका म्हणून रशिया भेटीचे निमंत्रण त्यांना मिळाले होते. [[कऱ्हाड]] येथे १९७५ साली झालेल्या ५१व्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. इंदिरा गांधींनी भारतावार लादलेल्या आणीबाणीच्या काळात त्यांनी लेखनस्वातंत्र्य आणि व्यक्तिस्वातंत्र्य यांविषयी ठाम जाहीर भूमिका घेतली, आणि त्यासाठी तुरुंगवास भोगला.
 
== अनुवादित साहित्य ==