३४,४११
संपादने
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
==जन्म व कारकीर्द==
[[इ.स. १९५२]] साली [[अकोला जिल्हा|अकोला जिल्ह्यातल्या]] [[सिरसोली]] या छोट्याशा गावातील एका [[शिंपी]] कुटुंबात सत्यपाल चिंचोलीकरांचा जन्म झाला. त्यांचे कुटुंब गरीब होते. त्यांच्या आईचे नाव सुशीला, भाऊ उकर्डा व लहान बहीण वनमाला व वडिलांचे नाव विश्वननाथ
अकोला जिल्ह्यातील [[अकोट]] गाव हे सत्यपाल चिंचोलीकर यांचे निवासस्थान आहे. आतापर्यंत देशभरातील १४,०००हून अधिक गावांत समाजप्रबोधनपर कीर्तने त्यांनी केली आहेत. जेथे अस्वच्छता दिसते तेथे सत्यपाल महाराज स्वतः हातात झाड़ू घेऊन तो परिसर स्वच्छ करतात. सत्यपाल महाराज आपली खंजिरी वाजवून एखाद्या सार्वजनिक गावच्या ठिकाणी किंवा गावाच्या पारावर लोकांना एकत्र करतात आणि प्रबोधनाचे कीर्तन सुरू करतात. "सामाजिक विषयांना आध्यात्मिकतेची आणि साथीला वादन कलेची जोड दिली की तो विषय थेट लोकांना भिडतो," असे सत्यपाल चिंचोलीकरांचे म्हणणे आहे. ग्रामीण आदिवासी क्षेत्रातील अशिक्षित लोकांना संगीत व कलेची जोड देत मनोरंजनातून प्रबोधन करण्याचा त्यांचा मानस असतो.
|