"भंते प्रज्ञानंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ५:
[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांना १४ ऑक्टोबर १९५६ रोजी धम्मदीक्षा देणाऱ्या पाच भन्तेंच्या पथकात भन्ते प्रज्ञानंद होते. ते डॉ. आंबेडकरांना पहिल्यांदा [[रंगून]], [[म्यानमार]] येथे झालेल्या धम्मसंगिनी परिषदेत भेटले.
 
प्रज्ञानंदांचा जन्म श्रीलंकेतील कॅण्डी येथे १८ डिसेंबर १९२७ रोजी झाला, येथेच त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. शिकत असतानाच त्यांना धर्मप्रसार करण्याचे महत्त्व कळू लागले. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक [[अनागरिक धम्मपाल]] यांनी त्यांनाप्रज्ञानंद यांना श्रीलंकेतून भारतात आणले. त्यांनी भारतात आल्यावर त्यांचा संपर्क [[उत्तर प्रदेश]]ातील लालकुंवा येथील बुद्ध विहाराचे संस्थापक भन्ते बोधानंद यांच्याशी झाला. उर्वरित शिक्षण उत्तर प्रदेशात पूर्ण करत त्यांनी 'त्रिपिटीकाचार्य' ही पदवी मिळवली. १९४२लाइ.स. त्यांनी१९४२ धम्मदीक्षामध्ये घेतधम्मदीक्षेनंतर बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी स्वत:ला वाहून घेतले. [[श्रामणेर]] दीक्षेनंतर त्यांना 'प्रज्ञानंद' हे नाव देण्यातधारण आलेकेले.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाशिकजवळील येवल्याला गेले असताना त्यांची बोधानंद व प्रज्ञानंद यांच्याशी भेट झाली. या भेटीमध्ये [[नागपूर]] येथे होणाऱ्या धम्मदीक्षा सोहळ्याचे स्वरूप ठरले. बोधानंदांनी प्रज्ञानंदांना आंबेडकरांच्या सोबत दिले. नंतर नागपूरच्या सोहळ्यात महास्थवीर चंद्रमणी यांच्या नेतृत्वातील पथकात प्रज्ञानंद सहभागी झाले. बोधानंद यांचे निधन झाले तेव्हा प्रज्ञानंद केवळ २५ वर्षांचे होते. तरुण वयातच त्यांच्याकडे उत्तर प्रदेशातील रिसालदार बुद्ध विहाराचे प्रमुखपद आले. आंबेडकरांनी दीक्षा घेतल्यानंतर देशातील अनेक भागांत लोक दीक्षेसाठी इच्छुक होते. देशभरातील असंख्य लोकांकडून धम्मदीक्षेसाठी मागणी येऊ लागली. त्यासाठी प्रज्ञानंद अनेक ठिकाणी गेले. उत्तर प्रदेशातील अलीगडला त्यांनी अडीच लाख लोकांना दीक्षा दिली. दीक्षा देण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित भिक्खू नसल्याने प्रज्ञानंदांनी भिक्खूंच्या प्रशिक्षणासाठी उत्तर प्रदेशातील श्रावस्तीला रेन चेन भिक्खू प्रशिक्षण केंद्र स्थापन केले. आज जगभरात या केंद्राचे नाव आदराने घेतले जाते.