"वकील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''वकील''' (इंग्रजी: Lawyer/ लॉयर) हा कायद्याची प्रॅक्टीस करणारा व्यक्ती...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

२२:२८, ३ मे २०१८ ची आवृत्ती

वकील (इंग्रजी: Lawyer/ लॉयर) हा कायद्याची प्रॅक्टीस करणारा व्यक्ती असतो. वकील लोकांना कायदेशीर बाबींमध्ये मार्गदर्शन करतो. कायद्याचा (लॉ) अभ्यास केलेल्या व्यक्तींसाठी लॉयर ही पदवी असते. वकील हे विविध प्रकारचे असतात. ते कोणत्याही एका विषयात तज्ज्ञ असू शकतात. जसे, बिझनेस लॉयर, कमर्शियल लॉयर, अॅडमिनीस्ट्रेटिव्ह लॉयर, कॉन्ट्रॅक्ट लॉयर, कन्सट्रक्शन लॉयर आणि प्रोपर्टी लॉयर इत्यादी प्रकारचे वकील असतात.

वकील हा बॅरिस्टर हून भिन्न असतो. प्रत्येक वकील हा बॅरीस्टर असतोच असे नाही. पण प्रत्येक बॅरीस्टर हा वकील असतो.

भारतीय न्यायप्रक्रियेमध्ये बॅरीस्टर आणि वकील अश्या स्वतंत्र संज्ञा आढळून येत नाहीत. भारतामध्ये अॅडव्होकेट्स अॅक्ट, १९६१ नुसार जो व्यक्ती सन्मानीय न्यायालयामध्ये प्रॅक्टीस करण्यासाठी पात्र असतो त्याला अॅडव्होकेट म्हणले जाते आणि ज्याच्याकडे कायद्याची (लॉ) पदवी आहे त्याला लॉयर म्हणले जाते. अॅडव्होकेट्स अॅक्ट, १९६१ मध्ये अॅडव्होकेट या संज्ञेशिवाय न्यायालयात वकिली करणाऱ्यांसाठी वेगळा शब्द वापरला जात नाही.

हे सुद्धा पहा

संदर्भ