"मी टू मोहीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १०:
१६ ऑक्टोबर २०१७ रोजी अलिसा मिलानो या अभिनेत्रीने ट्विटर या संकेतस्थळावर #MeToo हा हॅशटॅग वापरून तिने हॉलीवूड चित्रपट सृष्टीमध्ये होणाऱ्या लैंगिक शोषणाविरुद्ध वाचा फोडली. जर तुम्हालाही असा अनुभव आला असेल तर मी टू हा हॅशटॅग वापरा असे तिने आवाहन केल्यावर, एका दिवसात सुमारे ४०००० लोकांनी, ज्यात बहुतांश स्त्रिया होत्या, #MeToo हा हॅशटॅग वापरला. <ref>http://www.chicagotribune.com/lifestyles/ct-me-too-campaign-origins-20171019-story.html</ref>
या नंतर अनेक अभिनेत्री आणि सामान्य स्त्रियांनी #मीटू वापरून आपल्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या कहाण्या सांगितल्या तसेच न्याय मागितला.
 
१८ ऑक्टोबर २०१७ ला ऑलिम्पिक जिमनॅस्टीक खेळाडू मॅकायला मरोनी हिने अमेरिकन जिम्नॅस्टिक्स टीमचे डॉक्टर लॅरी नास्सर यांच्या विरुद्ध लैंगिक शोषणाला वाचा फोडली. जवळपास ३० वर्षाहून अधिक काळ टीमचे डॉक्टर असंरे नास्सर सध्या बालकांच्या लैंगिक शोषणा संदर्भातील एका खटल्यात कारागृहात आहेत.
 
२९ ऑक्टोबर २०१७ रोजी अॅन्थोनी रॅप याने केव्हिन स्पेसी या ऑस्कर पारितोषिकप्राप्त अभिनेत्या विरुद्ध शोषणाचे आरोप केले. या नन्तर अनेक स्त्री तसेच बाल कलाकारांनी असेच आरोप केले आणि स्पेसी विरुद्ध जनमत तयार झाले.
 
यानन्तर अनेक व्यवसायातील बड्या धेंडानी केलेल्या लैंगिक शोषणाचा बळी ठरलेल्या स्त्री पुरुषांनी आवाज उठवला आणि अनेक प्रकरणात स्टुडीओ आणि कंपन्यांना अशा लोकांविरुद्ध कारवाई करावी लागली.
 
==मी टू ची निर्माती==